Posts

Showing posts from April, 2023

मन_की_बात १००वा कार्यक्रम सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

Image
मन_की_बात १००वा कार्यक्रम  सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला  देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मन_की_बात  जनतेशी संवाद करणारा कार्यक्रम रविवार दिनांक ३०.०४.२०२३ रोजी १०० वा भाग कराड मध्ये विठ्ठल रुखमाई मंदिर येथे संपन्न झाला आज चा १०० वा भाग हा देशाच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान वाटणारा व देशाचा गौरव वाढवणारा होता,भाजपा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. आजच्या शतकिय मन की बात भागाच्या कार्यक्रमाला  भाजयुमो प्रदेश महामंत्री सुदर्शन पाटसकर,भाजपा नेते विष्णू काका पाटसकर,प्रकाश शेवाळे,मोहन पुरोहित,उमर फारुक सय्यद,विशाल काळे,हरिष पाटील,सागर साळुंखे,विशाल हापसे,राजेंद्र चव्हाण संदीप शिंदे,व पदाधिकारी उपस्थित होते.

कराड शहरातील राजवीर ओहळ च्या कुटुंबीयास १ लाख रुपयांची आर्थिक मदत*

Image
 *कराड शहरातील राजवीर ओहळ च्या कुटुंबीयास १ लाख रुपयांची आर्थिक मदत*  सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मंजुरी पत्र वारसास प्रदान    *कराड :* शहरातील सूर्यवंशी मळा येथील कु. राजवीर राहुल ओहळ हा तीन वर्षाचा मुलगा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना २७ जून २०२२ रोजी घडली होती. या घटनेने कराड शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली होती. या घटनेची नोंद घेऊन या मुलाच्या कुटुंबीयास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून मृताच्या कुटुंबीयास एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली असून ते मंजुरीचे पत्र माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कुटुंबीयास वितरित करण्यात आले. यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहुल चव्हाण, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, गजानन आवळकर आदी उपस्थित होते.  सदर मंजूर अर्थसहाय्य रक्कम रु. एक लाख मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा इथून आपल्या नावे असलेल्य

पुणे न्युज सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड

Image
पुणे सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड *शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती १००८ यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन* *श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे स्वागत* पुणे : बद्रिनाथ ज्योर्तिमठ येथील परमाराध्य परमधर्माधिश अनंत श्री विभूषित उत्तराम्नाय ज्योतिष पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे मोठया उत्साहात मंदिरात स्वागत करण्यात आले. श्रीं ना अभिषेक करुन शंकराचार्यांनी आरती देखील केली.   यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब परांजपे, सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, राजाभाऊ पायमोडे आदी उपस्थित होते. यावेळी शंकराचार्यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील जाणून घेतली. पं. वसंतराव गाडगीळ, मिलिंद राहुरकर, नटराजशास्त्री यांनी अभिषेकाचे पौरोहित्य केले.

विजयाचा गुलाल आमचाच उंडाळे येथील सभेत उदयसिंह पाटील यांचे वक्तव्य कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला उंडाळे सभा उदयसिंह पाटील म्हणाले, सहकारातील संस्था काकांनी निस्पृहपणे उभा केल्या. त्यांनी तयार केलेली माणसं आयुष्यभर विसरणार नाहीत. बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचे इमान राखण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीला व्यापक स्वरूप आले आहे.  लोकनेते विलासराव पाटील - उंडाळकर रयत पॅनेलने सर्वसामान्य लोकांना संधी दिली आहे. आमच्याकडे धनदांडगे व कोणी मोठ्याचा मुलगा उभा नाही. विलासकाकांनी अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांना सत्तेमध्ये स्थान दिले. हे करत असताना काही प्रस्थापित मंडळी घुसली. आणि तीच मंडळी आपल्या समोर लोकशाहीला बगल देवून मतदारांवर दबाव आणत आहेत. प्रस्थापित मंडळींना सत्तेसाठी व काहींना आमदारकीसाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे. प्रस्थापित आणि सरंजामदार हे सूत्र बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आले आहे.  *सर्वसामान्य लोकांना गुलाम बनवण्याच्या विचारातून ही मंडळी कार्यरत आहेत.* त्यातून समाजाला वाचवण्यासाठी लढा उभा केला पाहिजे. या भूमिकेतून वाटचाल सुरू आहे.  *विलासकाकांनी संघर्ष केला. तो संघर्ष घेवून मी पुढे चाललो आहे. तुम्ही या संघर्षात या. बाजार समि

डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मधील विकास कामासाठी पाच कोटीचा निधी

Image
डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी ५२ गावांमध्ये रस्ता सुधारणेसह अन्य विकासकामे; ग्रामीण दळणवळणाला मिळणार चालना सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला : कराड दक्षिणमधील जवळपास ५२ गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे, कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कराड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील होते. त्यानुसार त्यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे पत्रव्यवहार करुन, या कामांसाठी निधी मिळावा अशी विनंती केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत कराड दक्षिणमधील ५ कोटी रुपयांच्या ५२ नवीन कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध करण्यात

सह्याद्री वार्ता न्यूज नेटवर्क कराड असलम मुल्ला बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला  *दुष्ट आणि अभद्र युतीचा कराडच्या बाजार समितीवर डोळा : आ. पृथ्वीराज चव्हाण*  उंडाळेत कार्यकर्त्यांचा मेळावा ; मतदारांची अपूर्व गर्दी.  *कराड, प्रतिनिधी :* कराड तालुक्यातील विशिष्ट लोकांनी आयुष्यभर केवळ संस्था बळकावल्या. यातून त्यांनी स्वतःचे आर्थिक विश्व उभे केले. अशा लोकांच्या हातात कराडची बाजार समिती द्यायची का? असा सवाल करत विरोधकांनी दुष्ट व अभद्र युती करून बाजार समितीला गिळंकृत करण्यासाठी आखलेला डाव उधळून लावा. असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. उंडाळे (ता. कराड) येथे कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या लोकनेते स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या प्रचारार्थ विकास सेवा सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पॅनेलचे प्रमुख उदयसिंह पाटील - उंडाळकर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, एम. जी. थोरात, कराड नगरपालिकेच्य

चार चाकी गाडीचीदुचाकी गाडीला धडक उंडाळे शेवाळवाडी येथील नितीन शेवाळे यांचा दुर्दैवी मृत्यू

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला कारची दुचाकीला धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील सुट्टीवर आलेला सैन्यदलातीलजवान ठार झाला. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील मळाईदेवी पतसंस्थेसमोर बुधवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक कांही काळ विस्कळीत झाली होती.                    नितीन मोहन शेवाळे (वय २१ रा. उंडाळे शेवाळेवाडी नं. १ ता. कराड) असे आपघातात ठार झालेल्या सैन्यदलातील जवानाचे नाव आहे. तर (प्रथमेश दिपक शेवाळे वय १९ रा. उंडाळे शेवाळेवाडी नं. १ ता. कराड) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.                    अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीन मोहन शेवाळे हे भारतीय सैन्यदालात देशसेवेसाठी कर्तव्य बजावत होते. ते सुट्टीसाठी गावी शेवाळेवाडी येथे आले होते. त्याच्या चुलत भावाचे कृष्णा रूग्णालयात पायाचे अॉपरेशन झाले होते. त्यांना बघण्यासाठी ते व आक युवक दोघे दुचाकी ( क्रमांक एम एच ५० एफ ३८८०) वरून रूग्णालयात येत होते. पुणे-बंगळूर महामार्

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम  मुल्ला  स्टार प्रचारक म्हणून कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने माजी  मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिली जबाबदारी  *पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून दिली जबाबदारी*  कर्नाटक विधानसभेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.  कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायची या इराद्याने काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने देशातील तब्बल 40 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे.  कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार मोर्चेबांधणी करत असून काँग्रेससाठी अवघड वाटणाऱ्या मतदारसंघात

पुणे कष्टकऱ्यांच्या मुलांनी घेतला मनसोक्त आंबा खाण्याचा आनंद*

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811 *कष्टकऱ्यांच्या मुलांनी घेतला मनसोक्त आंबा खाण्याचा आनंद* बालगोपाळांसाठी आंबे खाणे स्पर्धा : प्रल्हाद गवळी मित्रपरिवार तर्फे आयोजन हरियाणातील महाबली हनुमान व २ वानर हे खास आकर्षण पुणे : पिवळाधम्मक रसाळ आंब्यांनी भरलेले हात आणि तोंड...हसत एकमेकांना चिडवत आंबे खाण्यासाठी सुरु असलेली चढाओढ..अशा आंबेमय झालेल्या वातावरणात वंचित, विशेष बालगोपाळांसह कष्टकऱ्यांच्या मुलांनी आंब्यावर मनसोक्त ताव मारला. हरियाणातील सुप्रसिद्ध महाबली हनुमान व दोन वानर वेशभूषेमध्ये कलाकारांनी यावेळी मुलांचा उत्साह वाढवला. यामध्ये शहराच्या पूर्व भागातील कष्टकरांच्या मुला मुलींसह, विविध सामाजिक संस्थांमधील १५०० हून अधिक चिमुकले सहभागी झाले होते. प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे रविवार पेठेतील संत नामदेव चौक येथे ही स्पर्धा झाली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, मनसे सरचिटणीस अजय शिंदे, वसंत मोरे, अभिनेता रमेश परदेशी, माजी नगरसेविका सुशीला नेटके, आशिष देवधर, गणेश भोकरे, आयो

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला सातारा जिल्ह्याला प्रतिभेचा, पुरोगामी विचारांचा आणि प्रगतीचा वारसा आहे. विचारांचा वारसा घेऊन चालणारा हा मतदारसंघ असून एकमेकांशी समन्वय साधून नेत्यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला      सातारा जिल्ह्याला प्रतिभेचा, पुरोगामी विचारांचा आणि प्रगतीचा वारसा आहे. विचारांचा वारसा घेऊन चालणारा हा मतदारसंघ असून एकमेकांशी समन्वय साधून नेत्यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.      घोणशी (ता.कराड) येथे खासदार श्रीनिवास पाटील व माजी मंत्री आ.बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या अतंर्गत रस्त्यांचे क्रॉंकिटीकरण करणे कामाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पी.डी.पाटील बॅंकेचे संचालक सागर पाटील, पं.स.सदस्य प्रणव ताटे, संरपच सुवर्णा अडसुळे, सह्यादी कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.      सारंग पाटील म्हणाले, परंपरेने आपल्याला समृध्द वारसा मिळाला आहे, ही विचारांची, तत्वाची परंपरा जबाबदारीने पुढे नेली पाहिजे. स्व.चव्हाण साहेबांचे विचार पी.डी.पाटील साहेब, खा.श्रीनिवास पाटील यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. समाजसेवीची संधी मिळाल्यास ती लोकासांठीच कारणी लागली पाहिजे. खा.श्रीनिवास पाटील साहेब व आ.

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811 मलकापूर आगाशिवनगर येथे जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य अखंडीत ठेवण्यासाठी येथील *शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानच्या* वतीने शिवजयंती व रमजान महोत्सवाचे आयोजन केले.

Image
मलकापूर आगाशिवनगर येथे जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य अखंडीत ठेवण्यासाठी येथील *शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानच्या* वतीने शिवजयंती व रमजान महोत्सवाचे आयोजन केले. त्यावेळी परिसरातील मुस्लिम बांधव व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षस्थानी राजू भाई मुल्ला नगरसेवक मलकापूर नगर परिषद हे होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली दलित मित्र भगवानराव जाधव यांनी शिवजयंती व रमजान ईद चे महत्व सांगून प्रास्ताविक केले आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरंपैकी अजितदादा सांडगे, आदिल भैया, डॉ.सारिका ताई गावडे यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख मान्यवरांपैकी सुरज शेवाळे भाजपा शहराध्यक्ष, बापू जंत्रे भाजपा उपाध्यक्ष, डॉ.सारिका ताई गावडे भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, राहुल दादा यादव जिल्हा संघटक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, आदिल भैया मोमीन, डॉ.सतीश थोरवडे, वसीम भैया हे उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या शुभ हस्ते  पाणपोई उद्घाटन करण्यात आले आणि शीरखुर्मा व जिलेबी चे वाटप  करून कार्यक्रमाची सां
*कराडमध्ये शुक्रवारी शिधापत्रिका (रेशनकार्ड) कामकाज शिबीर* सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड  9156992811  कराड  तालुक्यातील नागरिकांकरिता शासकीय योजनांची जत्रा अभियाना अंतर्गत कराड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाकडून खराब, जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, शिधापत्रिकेतील नावे कमी करणे तसेच शिधापत्रिकेमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे.  तरी नागरिकांनी आपली प्रकरणे परिपूर्ण पुराव्यासह घेऊन उपस्थित रहावे, अशी माहीती उपविभागीय अधिकारी श्री.उत्तम दिघे व तहसीलदार श्री. विजय पवार  यांनी दिली. *शिबिराचे ठिकाण* :- तहसीलदार कार्यालय कराडच्या प्रशासकीय इमारतीतमधील पार्कींग जागेत . *शिबिराचा दिनांक व वेळ*:- शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत

मसूर येथे मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजानच्या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811 मसूर येथे मुस्लिम समाजाच्या पवित्र  रमजानच्या रोजा  इफ्तार पार्टीचे आयोजन मुस्लिम समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष *मा. सिकंदर शेख.व मसूर शहराध्यक्ष मा. जमीर मुल्ला* मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीसाठी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे माजी सभापती *मा. मानसिंगराव जगदाळे साहेब.* मसूर चे लोकनियुक्त सरपंच मा. पंकज दीक्षित. यांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय जितेंद्र निकम. सुरेश पाटील.  वसंत पाटोळे तात्या. रवी जाधव सर. व मसूर मधील सर्व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड

Image
.कराड सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला ...एन.डी.आर.एफ.टिमकडून तांबवेत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.....संभाव्य पुरपरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज तांबवेत दाखल झालेल्या राष्ट्रीय आपदा मोचन बल (N.D.R.F.)कडुन तांबवेतील विद्यार्थी व ग्रामस्थ यांना पुरपरस्थिती उदभवल्यास कसे सामोरे जायचे तसेच  सामना कसा करावयाचा याबाबत टिमप्रमुख राहुलकुमार रघुवंश यांच्या मार्गदर्शनाखाली एन.डी.आर.एफचे जवान विद्याकांत त्रिपाठी,योगेश साबळे,सनोज यादव, दिपक पाटील, कृष्णा मर्ढेकर, धनंजय कुमार, गणेश भालेराव, विकास बर्गे, दिपक सुर्यवंशी, अंशुमन शेखर, ढोली सखाहारी, अनिल कुमार यांचेसह डाॅग पिंकी यांनी प्रात्यक्षिक सादर करुन मार्ग दर्शन केले......

मालिकेत मध्यवर्ती भूमिका करणारा देव जोशी म्हणतो, “बालवीरचे मोहक आणि तेजस्वी रूप पडद्यावर साकारण्यासाठी मी स्वतः आनंदी आणि सकारात्मक राहणे गरजेचे आहे.”

Image
सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड सोनी सबवरील बालवीर मालिकेत मध्यवर्ती भूमिका करणारा देव जोशी म्हणतो, “बालवीरचे मोहक आणि तेजस्वी रूप पडद्यावर साकारण्यासाठी मी स्वतः आनंदी आणि सकारात्मक राहणे गरजेचे आहे.” सोनी सबने अलीकडेच आपल्या सर्वात गाजलेल्या सुपरहीरो बालवीर या फ्रँचाईजचा तिसरा सीझन नुकताच लॉन्च केला आहे. या सत्रात बालवीरचा उदय आणि अस्त दर्शविणारा प्रवास दाखवला आहे. सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना आकर्षित करेल असे या सत्राचे कथानक आहे. यातील कंटेन्ट सर्व कुटुंबियांसाठी अनुकूल असून त्यातील व्हिजुअल इफेक्ट आणि स्टंट उत्कृष्ट दर्जाचे व प्रभावी आहेत. नव्या सत्राच्या निमित्ताने देव जोशीने आपली व्यक्तिरेखा, नव्या सत्राचे कथानक आणि आणखी या मालिकेत प्रेक्षकांना आकर्षित करणारे काय काय आहे, याविषयी सांगितले. 1. बालवीरचा तिसरा सीझन सुरू झाला आहे. देशातील इतर सुपरहीरोंच्या तुलनेत बालवीर कशामुळे वेगळा उठून दिसतो? आणि, प्रेक्षकांना तो इतका का आवडतो? बालवीर हा एक भारतीय सुपरहीरो आहे. आणि या मालिकेवर भारतीय संस्कृती आणि मूल्यांचा प्रभाव आहे. मला वाटते की बालवीर खास आहे, कारण यात आपल्या मान्यतांचे संध

कराड सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क आशा शिंदे यांचे निधन

Image
आशा शिंदे यांचे निधन कराड, ः येथील रविवार पेठेतील आशा प्रभाकर शिंदे (वय ७५) यांचे निधन झाले. कराड जनता बँकेचे माजी अधिकारी कै. प्रभाकर शिंदे यांच्या त्या पत्नी तर दैनिक सकाळचे वरिष्ठ बातमीदार सचिन शिंदे आणि भाजपचे सरचिटणीस प्रमोद शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. माई म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी बुधवारी (ता. 19) सकाळी ९.३० वाजता कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ५ हजार किलो मिसळ व १ लाख नागरिकांना ताक वाटप*

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ५ हजार किलो मिसळ व १ लाख नागरिकांना ताक वाटप* *क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजन ; आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनविलेल्या मिसळ व ताकाचे मोफत वाटप* पुणे  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पुण्यात ५ हजार किलो मिसळ व १ लाख नागरिकांकरिता ताक तयार करून वाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने एकूण तब्बल १० हजार किलो मिसळ वाटप करण्यात आले.  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा  येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ व ताक तयार केले. शुक्रवारी पहाटे ३ पासून मिसळ व ताक करण्याकरिता तयारी सुरु झाली. पालक मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रमुखांच्या  उपस्थितीत सकाळी ८ वाजता भव्य अशा कढ

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला ग्रामपंचायत हजारमाची स. गड येथे महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली होत असलेल्या जलजिवन मिशन योजनेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज

*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला  ग्रामपंचायत हजारमाची स. गड येथे महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली होत असलेल्या जलजिवन मिशन योजनेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता श्री भोपळे साहेब तसेच या योजनेचे ठेकेदार श्री पाटील साहेब v त्यांचे सहकारी सरपंच सौ विद्याताई घबाडे उपसरपंच श्री प्रशांत यादव सदस्या सौ सीता माने सौ संगीता डूबल सौ जयश्री पवार सदस्य श्री जगन्नाथ काळे श्री विनोद डूबल श्री सोमनाथ सूर्यवंशी श्री पितांबर गुरव तसेच ग्रामविकास अधिकारी श्री चिंचकर व ग्राम पाणी पुरवठा कर्मचारी वर्ग उपस्थित होते या बैठकीत सदर योजनेची सर्व विस्तृत माहिती श्री भोपळे साहेब यांनी दिली ग्रामपंचायत सदस्यांनी सर्व ग्रामस्थांचे वतीने या योजनेच्या कामाबाबत सर्व शंका कुशंका उपस्थित केल्या या सर्व शंकांचे श्री भोपळे साहेब यांनी निराकरण केले तसेच ठेकेदार श्री पाटील यांनी हे काम लवकरात लवकर व ऊच्च प्रतीचे करण्याचे आश्वासन दिले*

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) १९ एप्रिल २०२३ रोजी पुण्यात 'क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट' आयोजित करणार

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) १९ एप्रिल २०२३ रोजी पुण्यात 'क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट' आयोजित करणार स्टार्टअप्सची बदलती भूमिका, नावीन्यपूर्ण परिणामकारकता सुधारण्यात तंत्रज्ञानाची भूमिका, फूड एग्रीगेटर्सची वाढती मागणी आणि क्लाउड किचन व्यवसायाला चालना हे काही विषय कार्यक्रमादरम्यान विचारात घेतले जाणार आहेत. १२ एप्रिल २०२३, पुणे: नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI), रेस्टॉरंट उद्योगातील १९८२ पासूनची आघाडीची संघटना हे  बुधवार, १९ एप्रिल २०२३ रोजी डॉटपे द्वारे प्रस्तुत 'क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट' आयोजित करणार आहे. NRAI पुणे चॅप्टरच्या पुढाकाराने, ही एक दिवसीय शिखर परिषद मेफिल्ड इस्टेट, पुणे येथे आयोजित केली जाईल आणि क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी स्पेसमध्ये कार्यरत उद्योगातील प्रमुख लोक, रेस्टॉरंट प्लेयर्स आणि फूड एग्रीगेटर्स यांना  एकत्र आणतील. या समिटद्वारे, NRAI चे उद्दिष्ट आहे की बाजारपेठेतील घडामोडी जाणून घेणे, उद्योगातील प्रगतीच्या व्याप्तीवर चर्चा करणे, सर्व स्तरांवर व्यवसायांच्या प्रगतीसाठी सक्षम क

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी रु. ४ कोटी ७० लाख इतका भरघोस निधी मंजूर.*

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला  *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी रु. ४ कोटी ७० लाख इतका भरघोस निधी मंजूर.*   *कराड:* कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण च्या गावामधील विकासकामांसाठी स्थानिक विकास निधीतून ४ कोटी ७० लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गटर, सामाजिक सभागृह, संभामंडप, ग्रामपंचायतीच्या जागेत स्वच्छतागृह व स्वयंपाकगृह बांधणे, मागासवर्गीय वस्तीत पिण्याच्या पाण्याची टाकी, स्मशानभूमी सुधारणा व संरक्षक भिंत बांधणे अशी विविध विकासकामे केली जाणार आहेत. मंजूर निधीतून खालील कामे केली जाणार आहेत.  सैदापूर-राधाकृष्णनगर येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे.-रु. १० लाख, रेठरे खुर्द-अंतर्गत रस्ता खडीकरण व काँक्रीटीकरण करणे-रु.७ लाख, मुठ्ठलवाडी (भूरभूशी) येथे अंतर्गत गटर बांधणे- रु. ५ लाख, शिंदेवाडी, (कोळेवाडी) - अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे-रु. ५ लाख, दुशेर
Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड मो 9156992811 *महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून तयार केली ५ हजार किलो मिसळ* *क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजन ; आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनविलेल्या मिसळ चे मोफत वाटप* पुणे  : स्वातंत्र्यपूर्व काळात महापुरुषांनी लोकसहभागातून मोठी क्रांती केली. भारतातील महापुरुषांपैकी एक असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून पुण्यात ५ हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केली. मंगळवारी पहाटे ३ पासून मिसळ करण्याकरिता तयारी सुरु झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत  सकाळी ६ वाजता भव्य अशा कढई मध्ये सर्व पदार्थ व मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ वाजता संपूर्ण मिसळ तयार झाल

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड*जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आरोग्य शिबीर* *श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; शिबीरात ८५७ जणांची मोफत तपासणी*

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड *जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आरोग्य शिबीर*  *श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; शिबीरात ८५७ जणांची मोफत तपासणी* पुणे : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोतवाल चावडी, बुधवार पेठ येथे हे शिबीर घेण्यात आले. शिबारीत ८५७ जणांची मोफत तपासणी करण्यात आली.   शिबीराचे उद््घाटन अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पुणे मनपा आरोग्यप्रमुख डॉ.भगवान पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी येरवडा कारागृहाचे मानसोपचार तज्ञ डॉ.संदीप महामुनी, ससून रुग्णालयाचे डॉ.गिरीश बारटक्के, प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडाचे डॉ. शिवाजी शिंदे, डॉ.महादेव गिरी, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घ

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) सातारा -*“ *मोदीजी हटाओ , देश बचाओ , लोकशाही बचाओ “ * असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विविध प्रश्न विचारणारी पत्रे पाठविण्यास सातारा

Image
*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) सातारा -*“ *मोदीजी हटाओ , देश बचाओ , लोकशाही बचाओ “ * असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विविध प्रश्न विचारणारी पत्रे पाठविण्यास सातारा जिल्हाध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली या “ *PostCard Campaign ची सुरूवात करण्यात आली . यावेळी प्रदेश कार्यकारी सदस्य अजितराव पाटील चिखलीकर, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, सातारा महिला काँग्रेसच्या प्रवक्त्या सौ छायदेवी घोरपडे, प्रदेश प्रतिनिधी अन्वर पाशाखन, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, मनोजकुमार तपासे, कल्याणराव पिसाळ,सुशमराजे घोरपडे, रजिया शेख, मालन परळकर आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांनी आज  पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले, यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांनी सांगितले की, जिल्हा काँग्रेस कमिटी चे वतीने 1 लाख पत्र पाठवले जाणार आहेत त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात खालीलप्रमाणे मुद्दे मांडण्यात आले आहेत.        मोदीजी आपणदिलेल्या आश्वासनांची पुर्तता करणेबाबत आणि आर्थिक घोटाळ्यांबाबत. *  आदरणी

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)भाजपा स्थापना दिनादिवशी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान :- सुदर्शन पाटसकर

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) भाजपा स्थापना दिनादिवशी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान :- सुदर्शन पाटसकर  भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी करण्यात आली,आज भाजपा चा ४३ वा स्थापना दिनानिमित्त भाजपा ज्येष्ठ  कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा गुरुवारी नगरपालिका शाळा नंबर ९ मंगळावर पेठ कराड येथे भाजपा नेते विष्णू काका पाटसकर यांच्या संकलपनेतून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुदर्शन विष्णू पाटसकर सरचिटणीस भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश यांनी केले, कार्यक्रमास प्रमुख राष्ट्रीय स्वयं सेवक संघ कोल्हापूर विभाग कार्यवाहक विजय राव जोशी यांची उपस्थिती लाभली होती. भाजपा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सुदर्शन पाटसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलले की वचनबद्ध आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या प्रथमत: हार्दीक शुभेच्छा दिल्या.हिंदुत्व, हिंदु राष्ट्रवाद आणि अखंड मानवतावाद हे स्व. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दिनदयाळ उपाध्

सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क( अस्लम मुल्ला) माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण उद्या 7 एप्रिल रोजी आटके गावाला भेट देणार

Image
सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क( अस्लम मुल्ला)  माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण उद्या 7 एप्रिल रोजी आटके गावाला भेट देणार  आटके गावला पवारांच्या वस्ती पासून फिराकडुन जाणारा रस्त्यासाठी,  मा. पृथ्वीराज चव्हाण,बाबा,मा. मुख्यमंत्री सर्वांचे लाडके नेते यांच्या निधीतून पहिल्यांदाच डांबरीकरणासाठी पाच कोटी. मंजूर केले आहेत तेव्हा ते उद्या पहाणी करायला ऐनार आहे त्या रस्त्याची  उद्या वार शुक्रवार ,ता 7/4/2023,  सायंकाळी पाच वाजता ऐनार आहे त   त्या त्याबरोबर   मा.  उदयसिंह विलासराव पाटील , दादा.     महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आय काॅग्रेस    मा.मनोहर शिंदे  मलकापूर नगराध्यक्ष कराड हे हजर असणार आहेत   प्रथम आटके ग्रामपंचायत मध्ये गावाच्या वतीने सत्कार समारंभ होईल  नंतर नवीन दवाखान्याच्या इमारती ची पहाणी   पवार वस्ती ते पिराच्या पर्यंत पहाणी    साहेबराव पाटील यांच्या वस्ती वर चहा पाणी      शेवटी आपल्या गावचे आधार स्थान असलेले श्री मुकुंद महाराज मंदिराची पहाणी करणार  त्यांनी आपल्या ला मंडळासाठी पंचवीस लाख मंजूर केले आहेत  तरी सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की उद्या पाच वाजता ग्रामपंचायत कार्

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड महाराष्ट्र शासनाने निश्चित केले वाळू विक्रीचे दर; आता एक ब्रास वाळू मिळणार ‘एवढ्या’ रुपयांना*

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड   महाराष्ट्र शासनाने निश्चित केले वाळू विक्रीचे दर; आता एक ब्रास वाळू मिळणार ‘एवढ्या’ रुपयांना* -------- मुंबई – राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये (रुपये 133 प्रति मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्‍चित करण्यात आलेला आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनीज प्रतिष्ठाण निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इ.खर्च देखील आकारण्यात येतील. वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रीया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची विक्री करण्यात येईल. जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक

*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराडशासकीय योजनांची जत्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे* *- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी*

*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड शासकीय योजनांची जत्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे*   *- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी*  सातारा,  मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियानांतर्गत जिल्हयात शासकीय योजनांची जत्रा आयोजित करण्यात येत आहे. ही जत्रा यशस्वी करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी तसेच प्रांताधिकारी यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केल्या.  शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात  येणाऱ्या योजनांचा एकाच दिवशी किमान 75 हजार लाभार्थ्याना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांच्या जत्रेचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यात संपन्न होणार आहे.  या विषयी मार्गदर्शनासाठी कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह येथे महसूल कर्मचारी व अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्यमंत्री सहायता कक्षाचे गजानन पाटील, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सतीश  जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे आदी उपस्थित होते. *महसूल विभागातर्फे लोकांना विविध प्रकारचे दाखले दिले जातात, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हण

सर्व शासकीय, निमशसकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे अनिवार्य - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेशनागरिकांना मास्क वापरण्याचेही आवाहन

सर्व शासकीय, निमशसकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे अनिवार्य - जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी यांचे आदेश नागरिकांना मास्क वापरण्याचेही आवाहन   सातारा दि . 3 : राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी व उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत.             या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.             तसेच गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री . जयवंशी यांनी केले आहे.

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड( अस्लम मुल्ला) बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विजय नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच मानसिंगराव आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Image
सातारा जिल्ह्याचे माजी सहकार व पालकमंत्री  बाळासाहेब पाटील कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल बाबा भोसले माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या विचाराच्या संयुक्त आघाडीतून होऊ घातलेल्या 2023 शेतीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सर्वसाधारण खुला गटातून 3/4/2023 रोजी. विजयनगर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच मानसिंगराव आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करतेवेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश दादा जगताप,संचालक दयानंद पाटील भाऊ, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, कराड मर्चंट चे अध्यक्ष माणिकराव पाटील, राष्ट्रवादीचे युवानेते उपसरपंच प्रशांत यादव, चरेगावचे संजय माने, दिलीपराव साळुंखे, सर्जेराव पाणवळ, वारुंजीचे युवा नेते अनुज पाटील, संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष निसार मुल्ला, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ आबा, भाजपचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष धनाजी काका पाटील, मलकापूरचे माजी नगरसेवक राजूभाई मुल्ला, प्रमोद शिंदे, चचेगावचे युवा नेते महादेव पवार, प्रा.

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड*उद्योजकांना ताकद दिली तर महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम उभे राहतील* *महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत ; महाराष्ट्रातील १११ महिलांना आटा चक्की मशिन देऊन आत्मनिर्भर करण्याकरिता निरंजन सेवाभावी संस्थेचा पुढाकार*

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड *उद्योजकांना ताकद दिली तर महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम उभे राहतील*  *महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत ; महाराष्ट्रातील १११ महिलांना आटा चक्की मशिन देऊन आत्मनिर्भर करण्याकरिता निरंजन सेवाभावी संस्थेचा पुढाकार*                                                                                                                          पुणे : अनेक संस्था राजकारणाचा विचार करुन कार्यक्रम करतात. आमदार, खासदार यांच्या देखील संस्था निवडणूक आली की काही कार्यक्रम घेतात. आपण परिघाच्या बाहेर जाऊन काम करायला हवे. शासनाच्या एक पाऊल पुढे जाऊन निरंजन सेवाभावी संस्थेसारख्या संस्था आज कार्यरत आहेत. त्यांना उद्योजकांकडून सीएसआर च्या माध्यमातून चांगली साथ मिळत असून उद्योजकांना ताकद दिली, तर महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम उभे राहतील, असे मत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे घोले रस्त्यावरील पं.जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १११ गरजू महिलांना आटा चक्की मशिन देण्यात आले. यावेळी आ

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड केशवराव पवार इंग्लिश स्कूलचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उज्ज्वल यश* कराड: येथील रयत शिक्षण संस्थेचे केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत परीक्षेत उज्वल यश संपादित केले. शाळेच्या दोन विद्यार्थ्यानी राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. यामध्ये कु श्रावणी जगताप (इयत्ता ६ वी ) हिने ८६ गुण प्राप्त करून सिल्व्हर मेडल तर सार्थक जगताप (इ ५ वी) याने ७७ गुण प्राप्त करून ब्राँझ मेडल मिळविले.

Image
*केशवराव पवार स्कूलचे इंडियन टॅलेंट ऑलिम्पयाडमध्ये उज्ज्वल यश* कराड: येथील रयत शिक्षण संस्थेचे केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पयाड परीक्षेत उज्वल यश संपादित केले.        शाळेच्या पाच विद्यार्थ्यानी राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. यामध्ये सार्थक जगताप (४ था) श्रावणी जगताप (४ थी), रुद्रनील महाडिक (१४ वा ) आरव खरात (१७वा), श्रेयस पाटील (१७ वा) आदी विद्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.       यशस्वी विद्यार्थ्याना विभागप्रमुख श्री दत्तात्रय पोळ यांचे मार्गदर्शन लाभले.          या यशाबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड  रवींद्र पवार (भाऊ) , जनरल बॉडी सदस्य ॲड सत्यजीत पवार (बाबा) , माजी सहाय्यक विभागीय अधिकारी अब्बास मणेर, मुख्याध्यापक श्री एस व्ही राठोड, प्रशासकीय अधिकारी श्री आर टी पाटील यांनी अभिनंदन केले.

बाजार समिती निवडणूक कराड उत्तर काँग्रेस व भाजप नेते यांच्या उपस्थितीत 3 एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल होणार

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) ऊद्या दि.03.05.2023 वार सोमवार रोजी स.10.वाजता कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे निवडणुकी करता मा.आ.श्री.पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र, युवा नेते मा.श्री. उदय दादा पाटील, मा.श्री.धैर्यशील दादा कदम,चेअरमन वर्णन एग्रो साखर कारखाना , मा.श्री.मनोज घोरपडे दादा ,को चेअरमन माण खटाव सह.साखर कारखाना , मा.श्री. रामकृष्ण वेताळ, मा.श्री.वसंतराव जगदाळे आबा चेअरमन कोयना दुध संघ, मा.श्री.अजितराव पाटील  चिखलीकर  आप्पा,  मा. प्रा.काटकर सर,  मा.श्री मनोहर शिंदे नगराध्यक्ष मलकापूर, मा.श्री.इंद्रजित चव्हाण , श्री.नंदकुमार जगदाळे मसूर , मा.श्री.निवास दादा थोरात , मा.श्री. रामचंद्र साळुंखे  भाऊ किवळ, मा.श्री.भिमराव डांगे आप्पा शामगाव,                यांचे प्रमुख उपस्थितीत आपले उमेद्वार  मा.श्री.वामनराव साळुंखे चेअरमन वि.का.स.सोसायटी किवळ.  आणि  मा.श्री.शैलेश चव्हाणJ वि.का.स.सो.कोपर्डे,  यांचे व आपले रयत पॅनलचे सर्व उमेदवारांचे उमेदवारी भरणे करता आपल्या सर्व सहकारी यांचेसह स.10 वा. बाजार समिती आवार कराड येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

हॉटेल महाराजा लॉजिंग उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)

Image
 हॉटेल महाराजा लॉजिंग उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते  सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)  कराड-चांदोली रोड लोहरवाडी, ता.कराड जि.सातारा येथे निसर्गाच्या सानीद्यात, हॉटेल महाराजा & लॉजिंग या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, युवा नेते, मा.श्री.साम्राटजी महाडीक (बाबा) व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक, युवा नेते, मा.सत्यजितजी देशमुख (भाऊ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले, आमचे नेते, भाजपा सातारा लोकसभा प्रभारी, कृष्णा सहकारी बँक अध्यक्ष, युवा नेते, मा.डॉ.अतुलजी भोसले (बाबा) यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी य.मो.कृष्णा साखर कारखाना संचालक, मा.दयानंद पाटील (भाऊ) कराड कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती, मा.सुनील पाटील (दादा), व्हा.चेअरमन वारणा मोरणा पतसंस्था, मा.शिवाजी जाधव, कराड माजी जिल्हा परिषद सदस्य, मा.आनंदराव पाटील (राजाभाऊ), मा.पै.नानासाहेब पाटील, पाटण माजी पंचायत सदस्य मा.नानासाहेब सावंत, य.मो.कृष्णा साखर कारखाना माजी संचालक, मा.पांडुरंग होनमाणे, कृष्णा बँक संचालक, मा.प्रमोद पाटील (आबा), मा.आण्णासाहेब जा

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड सोनी सबवरील मालिका ‘ध्रुव तारा - समय सदी से परे’मध्‍ये ध्रुव ताराला पोलिसांपासून वाचवेल का?

Image
सोनी सबवरील मालिका ‘ध्रुव तारा - समय सदी से परे’मध्‍ये ध्रुव ताराला पोलिसांपासून वाचवेल का?  सोनी सबवरील ‘ध्रुव तारा - समय सदी से परे’ या मालिकेने ध्रुव (ईशान धवन) आणि ताराप्रिया (रिया शमा्र) यांच्‍यामधील अनोख्‍या रोमँटिक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्व प्रेक्षकांनी या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. आपल्‍या स्‍वत:च्‍या काळात परत जाण्‍यामध्‍ये अनेक संकटांचा सामना करत असलेल्‍या ताराच्‍या व्‍यथेने प्रेक्षकांना त्‍यांच्‍या आसनांवर खिळवून ठेवले आहे. आगामी एपिसोड्समध्‍ये ध्रुव पुन्‍हा एकदा आणखी एका मोठ्या संकटात ताराच्‍या मदतीस धावून येणार आहे.   सुशीला (नीलिमा सिंग) ध्रुव कॅनडाला जाण्‍यापूर्वी त्‍याचा विवाह करण्‍याचे ठरवते, ज्‍यामुळे आणखी एक मोठी समस्‍या निर्माण होते. ध्रुव सतत सुशीलाला सांगतो की, त्‍याची विवाह करण्‍याची इच्‍छा नाही. याबाबत तिच्‍या मनात शंका निर्माण होतात आणि ती त्‍याला तिने निवडलेल्‍या मुलीला भेटण्‍यास दबाव टाकते. आपला मुद्दा सिद्ध करण्‍याचा प्रयत्‍न करत असताना अखेर ध्रुवला नवरंग व्‍हॅन दिसते आणि तो आनंदित होतो. त्‍याला ताराला याबाबत सर्वकाही सांगायचे असत