मालिकेत मध्यवर्ती भूमिका करणारा देव जोशी म्हणतो, “बालवीरचे मोहक आणि तेजस्वी रूप पडद्यावर साकारण्यासाठी मी स्वतः आनंदी आणि सकारात्मक राहणे गरजेचे आहे.”

सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड सोनी सबवरील बालवीर मालिकेत मध्यवर्ती भूमिका करणारा देव जोशी म्हणतो, “बालवीरचे मोहक आणि तेजस्वी रूप पडद्यावर साकारण्यासाठी मी स्वतः आनंदी आणि सकारात्मक राहणे गरजेचे आहे.”

सोनी सबने अलीकडेच आपल्या सर्वात गाजलेल्या सुपरहीरो बालवीर या फ्रँचाईजचा तिसरा सीझन नुकताच लॉन्च केला आहे. या सत्रात बालवीरचा उदय आणि अस्त दर्शविणारा प्रवास दाखवला आहे. सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना आकर्षित करेल असे या सत्राचे कथानक आहे. यातील कंटेन्ट सर्व कुटुंबियांसाठी अनुकूल असून त्यातील व्हिजुअल इफेक्ट आणि स्टंट उत्कृष्ट दर्जाचे व प्रभावी आहेत.
नव्या सत्राच्या निमित्ताने देव जोशीने आपली व्यक्तिरेखा, नव्या सत्राचे कथानक आणि आणखी या मालिकेत प्रेक्षकांना आकर्षित करणारे काय काय आहे, याविषयी सांगितले.

1. बालवीरचा तिसरा सीझन सुरू झाला आहे. देशातील इतर सुपरहीरोंच्या तुलनेत बालवीर कशामुळे वेगळा उठून दिसतो? आणि, प्रेक्षकांना तो इतका का आवडतो?

बालवीर हा एक भारतीय सुपरहीरो आहे. आणि या मालिकेवर भारतीय संस्कृती आणि मूल्यांचा प्रभाव आहे. मला वाटते की बालवीर खास आहे, कारण यात आपल्या मान्यतांचे संधान आधुनिक जगाशी आणि टेक्नॉलॉजीशी जुळवले आहे. ही व्यक्तिरेखा सत्य आणि न्याय या दोन मुख्य मूल्यांचा पुरस्कार करणारी आहे. बालवीर दुष्टांशी ज्या पद्धतीने लढतो, ते इतर मालिकांपेक्षा वेगळे आहे. यामुळे लोकांना तो आवडतो.

2. या पूर्वीच्या सत्रांच्या तुलनेत बालवीरच्या व्यक्तिरेखेत कोणते बदल प्रेक्षकांना दिसत आहेत?

बालवीरची व्यक्तिरेखा सर्वच सत्रांमध्ये उत्तम रेखाटलेली आहे, त्यामुळे लोकांना ती आवडली. कथानक आणि साहाय्यक अभिनेते बदलले तरी बालवीरचे शौर्य आणि त्याचे गुण जपणे महत्त्वाचे आहे, कारण प्रेक्षकांचे त्याच्याशी दृढ भावनिक नाते जुळले आहे. तिसऱ्या सत्रात आम्ही नवीन प्रांताचा शोध घेत आहोत. यात बालवीरच्या पुढे न भूतो न भविष्यति अशी संकटे येतील. त्यांच्यावर मात करताना बालवीरमधले नवीन गुण प्रेक्षकांपुढे येतील.

3. टेलिव्हिजनवर सुपरहीरो साकारताना सगळ्यात मोठे आव्हान कोणते असते?

टीव्हीवर सुपरहीरो पात्र साकारताना सगळ्यात अवघड गोष्ट असते, ती म्हणजे ती मालिका विकसित करणे. त्यासाठी एकच लक्ष्य ठेवून कसून मेहनत करणारी मोठी टीम लागते. टेलिव्हिजन आपल्या निष्ठावान प्रेक्षकांशी वारंवार संवाद साधण्याची संधी देतो. त्यामुळे त्यातील संदेश आणि सकारात्मक प्रभाव लोकांच्या दैनंदिन जीवनाला थेट स्पर्श करू शकतो.

4. बालवीरच्या सेट्सवरील एखादी संस्मरणीय आठवण किंवा अनुभव शेअर करशील का?

एक दशकापेक्षा जास्त काळापासून मी हे पात्र साकारत आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या खूप छान छान आठवणी माझ्या मनात आहेत. माझ्या आयुष्याचा खूप मोठा काळ मी बालवीरच्या सेटवर घालवला आहे. त्यामुळे या सेटवर आलेल्या अनुभवांची गणती करणे शक्य नाही. बालवीरच्या माध्यमातूनच मी शिकत गेलो. त्यात काही लक्षणीय अशी व्यावसायिक आणि जीवन कौशल्ये मी शिकलो आहे, त्याबद्दल मी या शोचा ऋणी आहे.

5. बालवीरची भूमिका करण्याचा तुझ्या व्यक्तिगत जीवनावर आणि कारकीर्दीवर काय परिणाम झाला आहे?

बालवीरच्या आशावादी व्यक्तिमत्त्वाने अनेक लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे आणि त्यांच्यात चांगला बदल घडवून आणला आहे. माझ्या बाबतीत सांगायचे तर, ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी केवळ एक भूमिका राहिलेली नाही. एक अभिनेता म्हणून एखादी व्यक्तिरेखा साकारण्यामागे काय जबाबदारी असते आणि सकारात्मक राहिल्याने प्रेक्षकांच्या मनावर कसा व्यापक आणि सखोल परिणाम होतो हे मी शिकलो. मी कुठेही गेलो तरी लोक मला सुपरहीरो म्हणून ओळखतात, त्यावेळी मला हा विचार करून अभिमान वाटतो की हे जग सुंदर बनवण्यात माझाही खारीचा का असेना, पण वाटा आहे.

6. या मालिकेच्या तिसऱ्या सत्रासाठी तू एखादे प्रशिक्षण / मार्गदर्शन घेतले आहेस का किंवा काही वेगळे केले आहेस का?

बालवीर सारखी व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, यात काहीच दुमत नाही. या भूमिकेच्या शरीरयष्टीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी नित्यनेमाने मार्शल आर्ट्सचा सराव करतो आणि सकस आहार घेतो. तसेच, बालवीर मोहक आणि तेजस्वी दिसला पाहिजे, त्यासाठी मला सेटवर सकारात्मक, आनंदी आणि प्रसन्न राहणे गरजेचे असते. शूटिंगच्या वेळेस मानसिकता सकारात्मक ठेवण्याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. त्यामुळे या व्यक्तिरेखेला मला अधिक समग्रतेने भिडता येते.

7. बालवीर आणि तुझ्या व्यक्तिमत्त्वात काही साम्य आहे का?

एक व्यक्ती म्हणून देव आणि पडद्यावर मी साकारत असलेला बालवीर यांच्यात मला बरेचसे साम्य दिसते. यांचे गुण, वैशिष्ट्ये यांच्यात साधर्म्य आहे. प्रदीर्घ अनुभवामुळे देव आणि बालवीर यांच्यात एक नाते निर्माण झाले आहे, जे केवळ पडद्यापुरते मर्यादित नाही. अर्थात माझ्यात बालवीरमध्ये असणाऱ्या सुपरहीरोच्या क्षमता नाहीत, पण मी देखील माझ्या दैनंदिन आयुष्यात लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो, माझ्या वागण्यातून असो किंवा अभिनयातून असो.

8. बालवीर या भूमिकेतून तू प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छितोस?

बालवीर समाजातील लोकांपुढे एक सकारात्मक उदाहरण सादर करतो. आपल्यात त्याच्यासारख्या सुपरहीरोच्या क्षमता नसतील, पण त्याच्यातील धैर्य, आत्मविश्वास, निष्ठा आणि इतरांबद्दलची करुणा हे गुण आपण अंगिकारू शकतो. एक माणूस म्हणून देखील महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या मनात एक बालवीर आणि दुष्ट प्रवृत्ती यांचा संघर्ष सुरू असतो. अशावेळी आपण जे निर्णय घेतो, त्याचा आपल्या जीवनावर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांवर लक्षणीय परिणाम होत असतो.

बघा, अॅक्शन-पॅक्ड साहसांनी भरलेली मालिका- बालवीर 3, शनिवारी आणि रविवारी रात्री 7:00 वाजता फक्त सोनी सबवर

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.