सर्व शासकीय, निमशसकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे अनिवार्य - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेशनागरिकांना मास्क वापरण्याचेही आवाहन

सर्व शासकीय, निमशसकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे अनिवार्य - जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी यांचे आदेश

नागरिकांना मास्क वापरण्याचेही आवाहन

 

सातारा दि . 3 : राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी व उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत.

            या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

            तसेच गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री . जयवंशी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.