सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)भाजपा स्थापना दिनादिवशी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान :- सुदर्शन पाटसकर

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)

भाजपा स्थापना दिनादिवशी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान :- सुदर्शन पाटसकर 

भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी करण्यात आली,आज भाजपा चा ४३ वा स्थापना दिनानिमित्त भाजपा ज्येष्ठ  कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा गुरुवारी नगरपालिका शाळा नंबर ९ मंगळावर पेठ कराड येथे भाजपा नेते विष्णू काका पाटसकर यांच्या संकलपनेतून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन सुदर्शन विष्णू पाटसकर सरचिटणीस भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश यांनी केले, कार्यक्रमास प्रमुख राष्ट्रीय स्वयं सेवक संघ कोल्हापूर विभाग कार्यवाहक विजय राव जोशी यांची उपस्थिती लाभली होती. भाजपा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी सुदर्शन पाटसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलले की वचनबद्ध आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या प्रथमत: हार्दीक शुभेच्छा दिल्या.हिंदुत्व, हिंदु राष्ट्रवाद आणि अखंड मानवतावाद हे स्व. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांचे सिद्धांत घेऊन भारतीय जनता पार्टीची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयीच्या नेतृत्त्वात झाली, १९८४ सालच्या निवडणुकीत भाजपाचे २ खासदार निवडून आले. दोन खासदारापासून सुरु झालेले या प्रवासात असंख्य चढ उतार पक्षाने पाहिले या प्रवासात असंख्य नेते व कार्यकत्यांचे योगदान अतुलनीय आहे, आज २ खासदार ते ३०३ खासदार आहेत.देशात भारतीय जनता पार्टी ची अनेक राज्यात सत्ता आहे. असा हा पक्षाचा प्रवास आणि येथून पुढची वाटचाल ही केवळ आणि केवळ कार्यकर्ते यांची ध्येयशक्ती व निष्ठा या बळावरच आधारलेली असेल असे वक्तव्य केले.

यावेळी भरत पाटील,आनंदराव जगताप,प्रकाश शेवाळे, कृष्णत यादव, नाना सांवंत,सूर्यकांत पडवळ,अधिक सोमदे,राजेंद्र पवार,रामचंद्र उमाराणी, व्यकंटराव जगताप,विश्वास साळुंखे,शंकर पाटील, इलाही मुजावर,शिवाजी पानसकर,संदीप पाटील आदी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.



Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.