डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मधील विकास कामासाठी पाच कोटीचा निधी

डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी

५२ गावांमध्ये रस्ता सुधारणेसह अन्य विकासकामे; ग्रामीण दळणवळणाला मिळणार चालना

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
: कराड दक्षिणमधील जवळपास ५२ गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे, कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

कराड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील होते. त्यानुसार त्यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे पत्रव्यवहार करुन, या कामांसाठी निधी मिळावा अशी विनंती केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत कराड दक्षिणमधील ५ कोटी रुपयांच्या ५२ नवीन कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे कराड दक्षिणमधील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. तसेच या कामांमुळे ग्रामीण दळणवळणाला अधिक चालना मिळणार आहे. 

यामध्ये कोयना वसाहत, येळगाव, कालवडे, गोंदी, आटके, जुळेवाडी, दुशेरे, खुबी, गोळेश्वर, सवादे, वाठार, कोडोली, मुंढे, गोटे, रेठरे खुर्द, विंग, आणे, खोडशी, मालखेड, शेणोली, बेलवडे बुद्रुक, नांदगाव, काले, संजयनगर शेरे, कासारशिरंबे, शिंदेवाडी (विंग), जिंती, कार्वे, कापील, नारायणवाडी, वडगाव हवेली, वहागाव, घोणशी, वारुंजी, वनवासमाची, विजयनगर, तुळसण, तारुख, शेरे, चचेगाव, येरवळे, किरपे, कुसूर या गावांमध्ये अंतर्गत रस्ते सुधारीकरण व काँक्रीटीकरणासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विठोबाचीवाडी, लोहारवाडी, ओंडोशी, कालेटेक, पवारवाडी (नांदगाव) व बांदेकरवाडी (सवादे) या गावांमध्ये अंतर्गत रस्ते सुधारीकरणासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय ओंड व रेठरे बुद्रुक येथील विठ्ठल मंदिर सभामंडप बांधकामासाठी अनुक्रमे १० लाख व २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर येवती येथे १० लाखांच्या निधीतून स्मशानभूमी शेडची उभारणी केली जाणार आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या सहकार्यामुळे आणि डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी हा निधी मंजूर झाला असून, या विकासकामांना लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. याबद्दल जनतेकडून राज्य शासनाचे आभार मानले जात आहेत. 

Comments

Popular posts from this blog

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त

*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश " राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क