Posts

Showing posts from February, 2024

कराड वार्ता अस्लम मुल्ला आटकेटप्पा - #नारायणवाडी ते #कालेटेक अमर हिंदूस्तान सोसायटीपर्यंतच्या #रस्त्याच्या #डांबरीकरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून १ #कोटी ७५ #लाख रुपयांचा #निधी मंजूर झाला आहे तसेच ग्रामविकास कार्यक्रम २५-१५ योजनेअंतर्गत #नारायणवाडी येथे रस्ता सुधारणा कामासाठी १० लाख रुपयांचा #विकासनिधी मंजूर झाला आहे !!या विकासकामाचे भूमिपूजन मा.डॉ.अतुलबाबा भोसले व गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले.

Image

निवडणूक म्हणजे विचारधारा आणि तत्वाची लढाई असते. या लढाईत पाटणची जनता निष्ठा आणि पुरोगामी विचाराच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल असा विश्वास राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला.

Image
     निवडणूक म्हणजे विचारधारा आणि तत्वाची लढाई असते. या लढाईत पाटणची जनता निष्ठा आणि पुरोगामी विचाराच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल असा विश्वास राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला.       काळोली (ता.पाटण) येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मंजूर झालेल्या सभामंडप कामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाटण पं.समितीचे माजी सभापती एल.एम.पवार, पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, सरपंच कमल गुरव, उपसरपंच प्रियंका पवार आदींची उपस्थिती होती.      सारंग पाटील म्हणाले, सध्याच्या राजकिय पटलावर चाललेल्या अनपेक्षित व सर्व नितीमुल्य गुंडाळून ठेवलेल्या घडामोडीने समाजमन अस्वस्थ आहे. आपला सातारा जिल्हा व पाटण तालुका हा नेहमीच वाईट गोष्टींचा विरोध करत आला आहे. तो परोगामी विचाराने पुढे चालला आहे. येथील जनतेने कायमच चांगल्या गोष्टीला समर्थन केले आहे. वाईट भूमिकेला तीव्र प्रतिकार करत यशवंत विचाराची पाठराखण करणारा आपला जिल्हा आहे. विचाराचे आणि निष्ठेचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे खा.श्रीनिवास

शिंदे सरकारचे मराठा आरक्षण विधेयक ही मराठा समाजाची फसवणूकच - पृथ्वीराज चव्हाण

Image
शिंदे सरकारचे मराठा आरक्षण विधेयक ही मराठा समाजाची फसवणूकच - पृथ्वीराज चव्हाण         मराठा आरक्षणाबाबत सर्वांची एकवाक्यता असताना सुद्धा शिंदे सरकारने चर्चा होऊ दिली नाही. तसेच विरोधकांच्या एकाही प्रश्नाला सरकारने उत्तर दिले नाही. जरांगे पाटील यांची सगे-सोयरे अधिसूचनेबद्दल कोणतीही स्पष्ट भूमिका सरकारने घेतली.  तसेच जरांगे पाटील यांना सरकारने जी गुप्त आश्वासने दिली आहेत ती सरकारने पूर्ण केली आहेत का? त्याचे काय ? यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने एकप्रकारे फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.         या आधी गायकवाड समितीने वर्षभर अभ्यास करून सादर केलेला अहवाल सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला होता. तर आता पंधरा दिवसात तयार केलेला शुक्रे कमिटीचा अहवाल सुप्रीम कोर्ट कसा मान्य करेल याबाबत आम्हाला शंका वाटते. सरकार नक्की कोणते प्रयत्न करणार आहेत याची माहिती त्यांनी देणे आवश्यक आहे. तसेच मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असताना विरोधकांना विश्वासात घ्यायला सरकार का घाबरत आहे ? असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. तस

कराड : प्रतिनिधी         छत्रपती शिवरायांचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल आणि महिलांना आपोआपच सन्मान मिळेल. स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केल्यास ‘ती’ उंच भरारी घेण्यास सज्ज होईल असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या कर्तृत्वामुळे माझ्या लेकीबाळींना लोकमान्यता मिळावी असे उद्गार खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.        सातारा येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व युवा ३६०° आयोजित ‘कृषीलक्ष्मी साताऱ्याची’ महिला शेतकरी सन्मान व गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई पवार,राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा कृषि अधिक्षका भाग्यश्री फरांदे, श्रीनिवास पाटील फांऊडेशनच्या उपाध्यक्षा रचनादेवी पाटील, ॲड.वर्षाताई देशपांडेयांची प्रमुख उपस्थिती होती.      खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करीत आहे, प्रत्येक कामात हातभार लावत आहे. प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे योगदान अभिमानाची बाब असली तरी गाव, खेडे, झोपडपट्टी, शहरांचा काही भाग बघितला की मन अस्वस्थ होते. महिलांना योग्य वागणूक देणे, तिच्या कतृत्वाला प्रोत्साहन देणे म्हणजेच तिचा सन्मान करणे होय.     महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजा राममोहन रॉय आदींनी स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात स्त्रीला समानतेचा अधिकार बहाल केला. आपापल्या परीने महिलांचा विकास, हा ध्यास घेऊन कार्य करणे महत्त्वाचे आहे. तशी सुरुवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे.      सारंग पाटील म्हणाले, श्रीनिवास पाटील फाउंडेशन प्राधान्याने ग्रामिण भागातील विद्यार्थी आणि महिला यांच्यासाठी काम करत आहे. सध्या मुली शिक्षणात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे, त्याचा आनंद आहे. घरातील लक्ष्मीच्या परिश्रमाची किंमत कशातही मोजता येणार नाही. त्यामुळे स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक जीवनात मानाचे स्थान मिळावे.     दरम्यान श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने स्व.सौ.रजनीदेवी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा पहिला ‘स्व.सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील-स्मृती क्रीडा पुरस्कार-२०२४' हा आंतरराष्ट्रीय तिरंदाज पटू सुवर्णकन्या अदिती गोपीचंद स्वामी हिला खा.श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते यावेळी देण्यात आला.      प्रारंभी स्वागत रचनादेवी पाटील यांनी केले. आभार प्रसाद नेहे यांनी मानले. कृषि क्षेत्रात नाविन्यपूर्ण विविध प्रयोग करून इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार्‍या जिल्ह्यातील विविध शेतकरी महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी सविता ओरा, अल्पना यादव, संजना जगदाळे, अनिता जाधव, रजनी पवार, मेघाताई नलवडे, समिंद्रा जाधव, उर्मिला कदम, मनिषा पाटील, छायाताई शिंदे आदींसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुरस्काराने महिला गहिवरल्या...संसाराचा गाडा हकताना अपार कष्ट उपसणारी स्त्री शेतातही राबत असते. आजच्या एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सक्रिय सहभाग आहे आणि त्याचे कौतुक देखील केले जाते. मात्र पिढ्यान् पिढ्या कृषि क्षेत्रात स्त्रियांचा मोठा सहभाग असून देखील त्यांचे विशेष कौतुक केले जात नाही. अशा कष्टकरी, शेतकरी महिलांचा सत्कार सोहळा जाणीवपूर्वक आयोजित करून श्रीनिवास पाटील फाउंडेशनने त्यांच्या कष्टाला दाद दिल्याने उपस्थित माता-भगिनींना गहिवरून आले. सातारा : कृषीलक्ष्मी साताऱ्याची पुरस्काराच्या वितरण प्रसंगी खा.श्रीनिवास पाटील, सौ.सुनंदा पवार, सारंग पाटील व इतर

Image
        छत्रपती शिवरायांचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल आणि महिलांना आपोआपच सन्मान मिळेल. स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केल्यास ‘ती’ उंच भरारी घेण्यास सज्ज होईल असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या कर्तृत्वामुळे माझ्या लेकीबाळींना लोकमान्यता मिळावी असे उद्गार खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.         सातारा येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व युवा ३६०° आयोजित ‘कृषीलक्ष्मी साताऱ्याची’ महिला शेतकरी सन्मान व गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई पवार, राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा कृषि अधिक्षका भाग्यश्री फरांदे, श्रीनिवास पाटील फांऊडेशनच्या उपाध्यक्षा रचनादेवी पाटील, ॲड.वर्षाताई देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.       खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करीत आहे, प्रत्येक कामात हातभार लावत आहे. प्रत्य

यापुढे आम्हाला गृहीत धरू नका*डिपीडीसी निवडीवरून प्रहारच्या मनोज माळी यांचा ईशारा

Image
*यापुढे आम्हाला गृहीत धरू नका* डिपीडीसी निवडीवरून प्रहारच्या मनोज माळी यांचा ईशारा सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी प्रहार जनशक्ती पक्षाचा एक सदस्य घेण्याची सुचना आमदार बच्चू कडू यांनी केली होती. मात्र केवळ भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते व कार्यकर्त्यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तर घटकपक्ष असलेल्या प्रहारला डावलण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात यापुढे घटकपक्ष म्हणुन आम्हाला गृहीत धरू नये असा ईशारा प्रहारच्या मनोज माळी यांनी दिला आहे. दरवर्षी कोठयावधी रूपयांचे बजेट असलेली जिल्हा नियोजन समिती (डिपीडीसी) ग्रामिण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण आहे. त्यामुळे  जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी मातब्बरांचे प्रयत्न सुरू असतात. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गुरूवारी सातारा जिल्हा नियोजन समिती घोषणा करण्यात आली. यात केवळ भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते व कार्यकर्त्यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. वास्तवीक घटकपक्ष म्हणुन प्रहार जनशक्ती पक्षाचा एक सदस्य जिल्हा नियोजन समितीत घे

50 कोटी निधी कराड साठी

Image
50 कोटी निधी कराड साठी कराड  शहरावरती जीवापाड प्रेम करणारे व नेहमीच संकटाची काळात धावून येणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य व सातारा लोकसभा प्रभारी माननीय अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कराड शहरासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी कराड शहराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी कराड शहराचे अध्यक्ष एकनाथ बागडी,सातारा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सरचिटणीस किसन चौगुले,  मुकुंद चरेगावकर ,किरण मुळे, रमेश मोहिते, सुधाकर कांबळे, उमेश शिंदे ,इतर पदाधिकारी उपस्थित होते

कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला *संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

Image
कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला  *संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन मुंबई दि.15:- थोर समाजसुधारक, क्रांतीकारी, बंजारा समाजाचे आद्य गुरु श्रीसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, दिनेश चव्हाण, कक्ष अधिकारी तुषार राठोड, शिवाजी चव्हाण, निलेश जाधव यांच्यासह मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून श्रीसंत सेवालाल महाराजांना अभिवादन केले. *****

कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंद (ता.खंडाळा) येथील रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी ६५ कोटीच्या

Image
कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला       खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंद (ता.खंडाळा) येथील रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी ६५ कोटीच्या अंदाजपत्रकास केंद्राच्या सेतू बंधन योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.        लोणंद येथील सईबाई हाउसिंग सोसायटी येथे रेल्वे उड्डाणपूल व्हावा यासाठी परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून मागणी करत होते. तसेच त्यांनी यासाठी आंदोलने देखील केली होती. दरम्यान संबंधित नागरिकांनी खासदार पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन खा.श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाशी वेळोवेळी संपर्क साधून पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून तसेच लोकसभेत अति महत्त्वाच्या प्रश्नोत्तराच्या काळात हा मुद्दा उपस्थित करून सदर रेल्वे उड्डाणपूलाच्या मागणीसाठी आग्रही राहिले होते.         खा.श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आ

परमार्थ निकेतन ऋषिकेश तर्फे जागतिक विश्वविक्रमवीर योगा* *डाॅ.जान्हवी इंगळे यांना इंटरनॅशनल योगिणी* *पुरस्कार 2024 प्रदान कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला कराड

Image
*परमार्थ निकेतन ऋषिकेश तर्फे जागतिक विश्वविक्रमवीर योगा*     *डाॅ.जान्हवी इंगळे यांना इंटरनॅशनल योगिणी* *पुरस्कार 2024  प्रदान   परमार्थ निकेतन आणि eduglife यांच्या तर्फे देण्यात येणार्या🏆🏅 International Yogini Awards2024🏅🇮🇳🧿🏆हा पुरस्कार स्वामी चिदानन्द सरस्वतीजी अध्यक्ष परमार्थ निकेतन साध्वी भगवती सरस्वतीजी परमार्थ निकेतन यांच्या आशीर्वादाने सुबोध तिवारी जी सीईओ कैवल्यधाम लोणावळा Secretary, Indian Yoga Association Dr. Manoj Thakur सीईओ, VYASA सिंगापुर गंगा नंदिनीजी परमार्थ निकेतन यांच्या हस्ते  जागतिक विश्वविक्रमवीर योगा डाॅ.जान्हवी इंगळे यांना  मला प्रदान करण्यात आला या वेळी  Dr.RH Lata Mam ,Dr. Shashi Thakur राष्ट्रीय महिला आयोग की सलाहकार एवं पूर्व संयुक्त संचालक मप्र स्वास्थ्य विभाग आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

निकेतन ऋषिकेश तर्फे जागतिक विश्वविक्रमवीर योगा* *डाॅ.जान्हवी इंगळे यांना इंटरनॅशनल योगिणी* *पुरस्कारपरमार्थ 2024 प्रदान

Image
* निकेतन ऋषिकेश तर्फे जागतिक विश्वविक्रमवीर योगा*     *डाॅ.जान्हवी इंगळे यांना इंटरनॅशनल योगिणी* *पुरस्कारपरमार्थ 2024  प्रदान   परमार्थ निकेतन आणि eduglife यांच्या तर्फे देण्यात येणार्या🏆🏅 International Yogini Awards2024🏅🇮🇳🧿🏆हा पुरस्कार स्वामी चिदानन्द सरस्वतीजी अध्यक्ष परमार्थ निकेतन साध्वी भगवती सरस्वतीजी परमार्थ निकेतन यांच्या आशीर्वादाने सुबोध तिवारी जी सीईओ कैवल्यधाम लोणावळा Secretary, Indian Yoga Association Dr. Manoj Thakur सीईओ, VYASA सिंगापुर गंगा नंदिनीजी परमार्थ निकेतन यांच्या हस्ते  जागतिक विश्वविक्रमवीर योगा डाॅ.जान्हवी इंगळे यांना  मला प्रदान करण्यात आला या वेळी  Dr.RH Lata Mam ,Dr. Shashi Thakur राष्ट्रीय महिला आयोग की सलाहकार एवं पूर्व संयुक्त संचालक मप्र स्वास्थ्य विभाग आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

*परमार्थ निकेतन ऋषिकेश तर्फे जागतिक विश्वविक्रमवीर योगा* *डाॅ.जान्हवी इंगळे यांना इंटरनॅशनल योगिणी* *पुरस्कार 2024 प्रदान

Image
**परमार्थ निकेतन ऋषिकेश तर्फे जागतिक विश्वविक्रमवीर योगा*     *डाॅ.जान्हवी इंगळे यांना इंटरनॅशनल योगिणी* *पुरस्कार 2024  प्रदान  परमार्थ निकेतन आणि eduglife यांच्या तर्फे देण्यात येणार्या🏆🏅 International Yogini Awards2024🏅🇮🇳🧿🏆हा पुरस्कार स्वामी चिदानन्द सरस्वतीजी अध्यक्ष परमार्थ निकेतन साध्वी भगवती सरस्वतीजी परमार्थ निकेतन यांच्या आशीर्वादाने सुबोध तिवारी जी सीईओ कैवल्यधाम लोणावळा Secretary, Indian Yoga Association Dr. Manoj Thakur सीईओ, VYASA सिंगापुर गंगा नंदिनीजी परमार्थ निकेतन यांच्या हस्ते  जागतिक विश्वविक्रमवीर योगा डाॅ.जान्हवी इंगळे यांना  मला प्रदान करण्यात आला या वेळी  Dr.RH Lata Mam ,Dr. Shashi Thakur राष्ट्रीय महिला आयोग की सलाहकार एवं पूर्व संयुक्त संचालक मप्र स्वास्थ्य विभाग आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.  परमार्थ निकेतन आणि eduglife यांच्या तर्फे देण्यात येणार्या🏆🏅 International Yogini Awards2024🏅🇮🇳🧿🏆हा पुरस्कार स्वामी चिदानन्द सरस्वतीजी अध्यक्ष परमार्थ निकेतन साध्वी भगवती सरस्वतीजी परमार्थ निकेतन यांच्या आशीर्वादाने सुबो

चचेगाव - विंग - काले रस्ता सुधारणेसाठी १३ कोटींचा निधी मंजूर

Image
चचेगाव - विंग - काले रस्ता सुधारणेसाठी १३ कोटींचा निधी मंजूर शेखर चरेगावकर व डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश  सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्यूज नेटवर्क अस्लम मुल्ला कराड, ता. १४ : महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर व भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून चचेगाव - विंग - धोंडेवाडी - बेंदमाळा – डाळींबीची बाग - काले रस्ता या १५ किलोमीटरच्या प्रमुख जिल्हा मार्ग रस्ता सुधारणेसाठी १३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या निधीमुळे ग्रामीण विकासाला गती मिळणार आहे. कराड दक्षिण मतदारसंघातील चचेगाव - विंग - धोंडेवाडी - बेंदमाळा - डाळींबीची बाग - काले रस्ता प्रजिमा १२० या मार्गासाठी शेखर चरेगावकर व डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण व उच्चशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ना. चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत

मसूर येथे भाजपा किसान मोर्चा ग्राम परिक्रमा यात्रेचा शुभारंभ

Image
*मसूर येथे भाजपा किसान मोर्चा ग्राम परिक्रमा यात्रेचा शुभारंभ   कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला       *भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांची उपस्थिती* कराड/प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारजी चाहर  यांच्या उपस्थितीत मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश येथून झाला. देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एलईडी स्क्रीनवर लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आला यावेळी सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर येथे भाजपा परिक्रमा यात्रेचा शुभारंभ भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांची उपस्थिती करण्यात आला यावेळी  सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री रामकृष्ण  वेताळ साहेब, प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सुशांतभैय्या निंबाळकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पवार सूर्यकांत पडवळ, सुरेशतात्या पाटील,  प्रशांत भोसले, रामदासजी शिंदे, गणेश गायकवाड, शंकरराव शेजवळ, रुक्मिणी ताई जाधव, प्रमोद गायकवाड, विश्वास सावंत ,सुनील शिंदे, चंद्रकांत मदने, सुरेश क

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर

Image
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर  सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे रस्त्याचे होणार चौपदरीकरण; फूटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही होणार निर्मिती कराड शहराच्या प्रगतीला चालना देणाऱ्या प्रकल्पासाठी भाजपचे पाठबळ; शहराच्या वैभवात पडणार भर कराड, ता. १३ : कराड दक्षिण मतदारसंघाच्या व विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या ५० कोटींच्या निधीतून कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथ व स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही निर्मिती होणार असल्याने, या नव्या प्रकल्पामुळे कराड शहराच्या प्रगतीला चालना मिळणार आहे.  भाजपा महायुती सरकारने गेल्या वर्षभरात

*कराड नगर परिषद शाळा क्र. ३ चा पालक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन् सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला

Image
*कराड नगर परिषद शाळा क्र. ३ चा पालक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन् सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला आज कराड येथील नगर परिषद शाळा क्र. ३ कडून यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे आयोजित पालक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.  यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी कराड नगर परिषदेच्या ग्रंथालयाचीही पाहणी केली. १८५७ साली स्थापन झालेले हे ग्रंथालय नीटनेटके असून त्यात विविध विषयांवरील सुमारे १ लाख १८ हजार पुस्तके आहेत. ग्रंथसमृद्ध असे हे ग्रंथालय पाहून आनंद वाटल्याची भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केली. तसेच यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी शाळा क्र. ३ च्या वाटचालीचा आढावा घेऊन उपस्थित पालक व विद्यार्थ्यांशी स

सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटन १४ रोजी स्वप्नपूर्ती सोहळा

Image
सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटन १४ रोजी स्वप्नपूर्ती सोहळा  कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेली अनेक वर्षे पाहिलेल्या हृदयस्पर्शी अशा एका स्वप्नाची पूर्तता झाली असून या स्वप्नपूर्तीचा दिमाखदार सोहळा बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सातार्‍यात गोडोली येथील साईबाबा मंदिराजवळ व हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर होत आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने  पत्रकार भवन समितीने साकारलेल्या ‘सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे’ उद्घाटन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते होत असल्याची माहिती पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली. १०० वर्षांहून अधिक दिमाखदार पत्रकारितेची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात पत्रकारांचे हक्काचे सातारा जिल्हा पत्रकार भवन नव्हते. सातार्‍यात जिल्हा पत्रकार भवन व्हावे, अशी मनोमन इच्छ

*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश " राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क

Image
*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश  "  राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क  बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये रात्री उशीरा जागण्याचा कल वाढत असल्याचं दिसून येत असल्याने त्यात सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप होत नाही आणि परिणामी मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत असल्याने तसेच अनेक पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात यामुळे खूपच त्रास व गैरसोयी ला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाजबाबा सुतार यांनी या समस्येला प्रकाश झोतात आणले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शिक्षणमंत्री दिपक केसरकर साहेब यांकडे सदर गैरसोय दुर करावी म्हणून निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली होती तसेच मेलद्वारे स्मरण करून देऊन पाठपुरावा केला होता. राज्य शासनाकडे या आशयाचे मागणीचे अनेक संस्था व नागरिक पालक सुद्धा टाहो फोडत होते.   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाजबाबा सुतार

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हासातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक फेब्रुवारी रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाडे फाटा जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका दुचाकीस धडक देऊन दुचाकी वरील दोघांना जखमी केल्याप्रकरणी स्विफ्ट कार क्र. एमएच 11 बीव्ही 9218 वरील चालक विकास जाधव रा. सदर बाजार, सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.सायकलची चोरीसातारा : गोडोली येथून अज्ञात चोरट्याने 3 हजार रुपये किंमतीची सायकल चोरुन नेल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 6 फेब्रुवारी रोजी घडली असून याप्रकरणी विनोद उत्तमराव घाडगे (वय 47, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हासातारा : एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाईगिरी कोण करतो, या कारणातून दोघांनी एकाला मारहाण केली. प्रशांत सावंत व माहील सावंत (दोघे रा. सातारा) यांच्या विरुध्द रोहिदास विठ्ठल साळुंखे (वय 44, रा. कोडोली, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 6 जानेवारी रोजी झेंडा चौक, एमआयडीसी येथे घडली आहे. लोखंडी सळई मारहाण करुन दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हासातारा : एका वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव ता.सातारा येथे पादचारी सौ.नंदा संपत निकम (वय 68, रा. तासगाव) यांना दुचाकी वाहनाची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजय बाळासो देशमुख (वय 29, रा. धामणेर ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 6 फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता.

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा सातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक फेब्रुवारी रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाडे फाटा जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका दुचाकीस धडक देऊन दुचाकी वरील दोघांना जखमी केल्याप्रकरणी स्विफ्ट कार क्र. एमएच 11 बीव्ही 9218 वरील चालक विकास जाधव रा. सदर बाजार, सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत. सायकलची चोरी सातारा : गोडोली येथून अज्ञात चोरट्याने 3 हजार रुपये किंमतीची सायकल चोरुन नेल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 6 फेब्रुवारी रोजी घडली असून याप्रकरणी विनोद उत्तमराव घाडगे (वय 47, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा सातारा : एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलि

शरद पवारांच्या पक्षावर दरोडा घालणाऱ्यांचा धिक्कारराष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला निषेध

Image
शरद पवारांच्या पक्षावर दरोडा घालणाऱ्यांचा धिक्कार राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला निषेध .. सातारा / प्रतिनिधी आले शंभर गेले शंभर पवारसाहेबच एक नंबर, पवारसाहेब अंगार है.. बाकी सब भंगार है., या भाजपाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, पवार साहेबांच्या पक्षावर दरोडा घालणाऱ्या पक्षाचा धिक्कार, असो अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात महिलांनी निषेध आंदोलन केले. या आंदोलनामध्ये हातात काळ्या रेबीन बांधून निवडणूक आयोगाने दिलेल्या निणर्याचा निषेध नोदंवण्यात आला. यावेळी प्रा. कविता म्हेत्रे यांनी जोरदारपणे भाजपावर टीका केली. सातारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, संमिद्रा जाधव, मोहिनी मिसाळ, प्रज्ञा गायकवाड, नूपुर नारनवर, सौ. मेघा नलावडे, डॉ. प्रियांका माने, रुपाली ननावरे, अनुराधा तरटे, नलिनी जाधव, तेजस्विनी केसरकर, शैलजा कदम आदी महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा निषेध नोदंवला. प्रा. कविता म्हेत्रे या म्हणाल

सर्व श्रमिक संघटनेची साताऱ्यात निदर्शनं

Image
सर्व श्रमिक संघटनेची साताऱ्यात निदर्शनं सातारा दि ८ ( प्रतिनिधी ) इपीएस ९५ योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, किमान ९ हजार रुपये पेन्शन दरमहा मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. इपीएस ९५ योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, किमान ९ हजार रुपये पेन्शन दरमहा मिळावी, पेन्शनला महागाई भत्ता देण्यात यावा. पेन्शनर व जोडीदाराला रेशन, प्रवास सवलत व वैद्यकीय सुविधा मोफत देण्यात यावी. प्रोराटा हिशोबाची पद्धत रद्द करावी. ११.४ कलम रद्द करून ११.३ कलम पुनर्स्थापित करण्यात यावे. पेन्शन पत्र वेतनासाठी असणारी ६० महिने सरासरीच्या पद्धत रद्द करण्यात यावी. इपीएस विभागीय कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत यासह अन्य मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली.  यावेळी प्रमोद परमने, शंकर पाटील, धनाजी देशमुख, बजरंग वंजारी, उदय कदम, विजय शिंदे, उत्तम फडतरे आदी उपस्थित होते.

चित्र म्हणजे मनान निर्विकार होणे :शिंदेदीपलक्ष्मी पतसंस्थेत चित्रकला कार्यशाळा उत्साहात

Image
चित्र म्हणजे मनान निर्विकार होणे :शिंदे दीपलक्ष्मी पतसंस्थेत चित्रकला कार्यशाळा उत्साहात सातारा दि ८ ( प्रतिनिधी ) चित्रकलेचा विचार, चित्रकाराच्या मानसिकतेतून केला तर समोर असणाऱ्या रित्या कॅनव्हास वर भरलेलं ,कोंडलेलं, दबलेलं मन कॅनव्हास वर झोकून देऊन स्वतः निर्विकार होणे असते ,असे उद्गार जेष्ठ चित्रकार अभिजीत शिंदे यांनी काढले . साहित्य कला वर्तक (साकव) तर्फे दीपलक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी जेष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे,सचिन प्रभुणे, बाबा भोरे ,डॉक्टर राजश्री देशपांडे, एॅड. सीमांतिनी नुलकर ,मुकुंद फडके यांनी अभिजीत शिंदे यांच्याबरोबर संवाद साधत चित्रकले संदर्भातील मूलभूत सिद्धांत बाबत चर्चा केली. मधुसूदन पतकी यांनी सूत्रनिवेदन केले   अभिजीत शिंदे पुढे म्हणाले, प्रत्येक कलाकृतीत ताल ,तोल आणि लय याचा अविष्कार पाहायला मिळतो. याचा प्ररमोच्चबिंदू म्हणजे गोल्डन रेशो असतो. ज्या बिंदूमध्ये ताल तोल आणि लय याचे नितांत सुंदर मिश्रण झालेले आपल्याला पाहायला मिळते. अर्थात हे चित्र पाहताना लहान मुलाच्या निर्भेळ मानसिकतेतून पाहिले. पाहिजे मन जेवढे ताजेतवाने, टटवीत

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लवकरच सातारा औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित होणार

Image
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लवकरच सातारा औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित होणार  सरकारी दूध संघाच्या 10 एकर जागेपैकी चार एकर जागा मंजूर ,माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांची माहिती  सातारा दिनांक 9 प्रतिनिधी कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क 9021358931 पोवई नाक्यावरील तब्बल पन्नास वर्ष भाड्याच्या इमारतीत असणारे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लवकरच सातारा औद्योगिक वसाहतीतील सरकारी दूध महामंडळाच्या जागी स्थलांतरित होणार आहे . येथील चार एकर भूखंडाचा ताबा सातारा एमआयडीसी औद्योगिक विभागाने कामगार आयुक्त कार्यालयाला दिला आहे . येथे कामगार सुरक्षा मंडळ तसेच सर्व प्रकारच्या कामगारांसाठी ईएसआय हॉस्पिटल उभारले जाणार आहे अशी माहिती माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली  यावेळी त्यांचे चिरंजीव अभिजीत येळगावकर उपस्थित होते . येळगावकर पुढे म्हणाले शासकीय दूध योजना यांच्या नावे असणारा सातारा एमआयडीसी मधील 29 हजार 997 चौरस मीटर पैकी चार हजार चौरस मीटर जागा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयासाठी देण्यात आलेली आहे सहाय्यक कामगार आयुक्त रे मु भिसले

श्री क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*

Image
*श्री क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश* कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला 9021358931 *पर्यटन विकास आराखड्यात मुळ वास्तूचे सौंदर्य अबाधित राहील अशी कामे प्रस्तावित करा*   *-उपमुख्यमंत्री अजित पवार* मुंबई दि.८:- पर्यटन विकास आराखड्यामध्ये श्रीक्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यानुसार कामे करताना मुळ वास्तू आणि परिसराच्या सुशोभिकरणाची कामे करताना नैसर्गिक रंग वापरून, बांधकामाचे  साहित्य देखील पर्यावरण पूरक वापरण्यावर भर द्यावा, या परिसराचे मूळ सौंदर्य अबाधित राहील अशी कामे प्रस्तावित करावीत. प्रशासनाने हे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात श्री क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्या बाब

सातारा *एका आईला व पत्नीला करावा लागणार प्रत्येक त्याग रमाई ने बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी केला*

Image
सातारा *एका आईला व पत्नीला करावा लागणार प्रत्येक त्याग रमाई ने बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी केला* साताऱ्यात रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य रथातून मिरवणूक त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२६व्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्क कार्यालय ते शाहू चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते राजवाडा या मार्गे पोलीस मुख्यालय पोवई नाका या रस्त्यावरून अशृवरूडी रथातून महामाता रमाई यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांची व कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती असंख्य कार्यकर्ते मोटरसायकल व फोर व्हीलर मध्ये उपस्थित होते तसेच भव्य दिव्य अशा रथामध्ये माता रमाई यांची प्रतिमा ठेवून त्यामध्ये रिपाईच्या महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्या बसल्या होत्या माता रमाईच्या नावाच्या जयघोषाच्या घोषणा व बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले की , विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची सहचरणी म्हण

महिलांसाठीचा वस्तू प्रदर्शन उपक्रम स्तुत्य : डॉ. अतुल भोसलेसुहास जगताप व मैत्री फौंडेशनच्या प्रदर्शनास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Image
महिलांसाठीचा वस्तू प्रदर्शन उपक्रम स्तुत्य :   डॉ. अतुल भोसले सुहास जगताप व मैत्री फौंडेशनच्या प्रदर्शनास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कराड :वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी घेतलेला सुहास जगताप यांचा उपक्रम कौतुकास्पद असून पुढील काळात यापेक्षा देखील मोठे प्रदर्शन घेण्यासाठी आपण सहकार्य करणार आहे. या प्रदर्शनामुळे महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. बचत गटाचे उत्पादन बाजारपेठेपयर्र्त पोहोचवण्याचे साधन या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. माजी नगरसेवक सुहास जगताप व मैत्री फाऊंडेशन यांच्यावतीने गृहउद्योग करणार्‍या महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिलांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीचे प्रदर्शन व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुहास जगताप, माजी नगराध्यक्षा

सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : याशनी नागराजन नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पदभार स्वीकारला

Image
सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार :  याशनी नागराजन  नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पदभार स्वीकारला  सातारा कराड वार्ता न्युज सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला  : सातारा जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे.  आरोग्य, शिक्षण यामध्ये स्मार्ट पीएचसी, मॉडेल स्कूलसाठी विशेष काम केले जाईल.लोकांमध्ये मिसळून, सातारकरांना काय हवे आहे, त्यानुसार काम करण्यास प्राधान्य देणार आहे.सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली. सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मंगळवारी सकाळी पावणे नऊलाच जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर अकराच्या सुमारास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन विविध विभागांचा आढावाही घेतला.राज्य शासनाने सोमवारी राज्यातील काही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग

कराड दक्षिणेतील १३१ कोटी ५५ लाखांच्या १०० विकासकामांचे बुधवारी भूमीपूजन

Image
कराड दक्षिणेतील १३१ कोटी ५५ लाखांच्या १०० विकासकामांचे बुधवारी भूमीपूजन  सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कराडच्या दौऱ्यावर; विविध कार्यक्रमांचे आयोजन कराड, ता. ६ : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण बुधवारी (ता. ७) कराड दक्षिण मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कराड दक्षिणमध्ये भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे १३१ कोटी ५५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच ना. चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ७) सायंकाळी ५ वाजता कापील वि. का. स. सेवा सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यास ना. रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते शताब्दी महोत्सव गौरव विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच कापील (ता. कराड) येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या आटके – कटपानमळा ते कापील रस

सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित पोलीस स्टेशनचा प्रश्न लवकरच सोडविणार : आयजी सुनिल फुलारी

Image
जिल्ह्यातील प्रस्तावित पोलीस स्टेशनचा प्रश्न लवकरच सोडविणार : आयजी सुनिल फुलारी सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्यूज नेटवर्क अस्लम मुल्ला  सातारा शहरालगत असणाऱ्या एमआयडीसीत लहान मोठे चोऱ्या होवू लागल्या आहेत. त्याचा परिणाम उद्योगधंदे वाढीवर होत आहे. त्याचबरोबर तेथील स्थानिकांचे मुलभूत प्रश्न सुटण्यात यावे, लोकांचा वेळ अन पैसा वाचावा यासाठी पोलिस ठाणे करण्याबाबत यापूर्वीच प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तो यापुढे गतीमान करण्यात येईल, याचबरोबर जिल्ह्यातील अजून दोन तीन पोलिस ठाण्याबाबत डिव्हीजनचे प्रस्ताव पेंडीग आहेत, ते ही लवकरच मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले. सातारा पोलिस दलाची वार्षिक तपासणी करण्याबाबत सातारा येथे आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, एकंदरीत आयजीकडून जिल्ह्याचे पोलीस व्यवस्थापन कसे चालते, गुन्हे दाखल करणे, प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे, कायदा व सुव्यवस्था, व्हीआयपी सिक्युरीटी, कम्युनिटी पोलिसिंग, नागरिका सोबतचे संवाद व वाहतूक व्यवस्थापन अन वेळोवेळी येणार

यशिनी नागराजन सातारा जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

Image
यशिनी नागराजन सातारा जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग पुणे येथे बदली सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची १६ महिन्याच्या सेवेनंतर पुणे येथे बदली करण्यात आली असून इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग येथे संचालक म्हणून त्यांची वर्णी लागली आहे.२०१९ च्या प्रशासकीय सेवेच्या प्रशासकीय अधिकारी यशिनी नागराजन यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदी नियुक्ती झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी श्रीमती नागराजन या पांढरकवडा येथे आयटीडीपीच्या प्रकल्प संचालक तसेच यवतमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्यांचे हे दुसरे पोस्टिंग आहे.यापूर्वी दिल्लीच्या परकीय मंत्रालयांमध्ये वरिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ज्ञानेश्वर खिलारी यांनी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सातारा जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारला होता.स्मार्ट पीएचसी, ग्रामपंचायतच्या कारभ

शहर काँग्रेसचा 'एक बूथ दहा युथ' उपक्रम प्रभावी - श्रीरंग चव्हाण*

Image
कराड वार्ता सहयाद्री वार्ता  शहर काँग्रेसचा 'एक बूथ दहा युथ' उपक्रम प्रभावी - श्रीरंग चव्हाण*   *कराड :* कराड शहर काँग्रेसचा एक बूथ दहा युथ हा उपक्रम आगामी निवडणुकामध्ये प्रभावी ठरणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस तथा जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी केले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरु आहे. प्रत्येक तालुक्यात बूथ कमिटी पासून मंडल कमिटी पर्यंत संघटना बांधणी सुरु आहे. यामध्येच कराड शहर काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऋतुराज मोरे यांच्या प्रयत्नातून व युवकांच्या बांधणीमुळे आज कराड शहरात काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत असल्याचे दिसते. हे त्यांनी यशस्वीपणे राबविलेल्या एक बूथ दहा युथ या उपक्रमामुळेच. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव व प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी संपूर्ण जिल्ह्याचा तीन दिवस दौरा करून सर्व तालुक्याचा संघटनात्मक आढावा घेतला तिसऱ्या दिवशी नुकताच त्यांचा कराड दौरा संपन्न झाला असून या दौऱ्यात त्यां

*जनतेने भरभरून प्रेम दिले : सारंग पाटील

Image
*जनतेने भरभरून प्रेम दिले : सारंग पाटील  सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला       निस्वार्थ भावनेतून लोकसेवा करणारे तसेच एक संवेदनशील नेतृत्व म्हणून खा.श्रीनिवास पाटील यांना ओळखले जाते. समाजासाठी असलेल्या समर्पित वृत्तीमुळे त्यांना जिल्हावासिंयानी भरभरून प्रेम दिले. असे मत राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले.     रेठरे (ता.कराड) विभागातील गोळेश्वर, कापिल, वडगाव हवेली, कोडोली, दुशेरे, शेरे, गोंदी, शेणोली, जुळेवाडी, खुबी, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक याठिकाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विकासकामा संदर्भात कार्यपूर्ती संपर्क दौऱ्यातील गावभेटी प्रसंगी ते बोलत होते.      सारंग पाटील म्हणाले, खा.श्रीनिवास पाटील यांचा प्रशासनातला गाढा अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून शेवटच्या टोकापर्यंत केलेले काम आणि सामान्य माणसांशी जुळलेली नाळ यामुळे त्यांचा सामाजिक प्रभाव मोठा आहे. प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने लोकांची कामे केली की लोक दखल घेतात. त्यामुळे एखाद्या नेत्यावर सामान्य माणूस किती प्रेम करतो हे खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाहि

कराड दक्षिणमधील १० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक ॲपचे होणार मोफत वितरणडॉ. अतुलबाबा भोसले यांचा पुढाकार; सोमवारी विद्यार्थी-पालक स्नेहमेळाव्याचे आयोजन

Image
कराड दक्षिणमधील १० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक ॲपचे होणार मोफत वितरण डॉ. अतुलबाबा भोसले यांचा पुढाकार; सोमवारी विद्यार्थी-पालक स्नेहमेळाव्याचे आयोजन कराड, वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क   : कराड दक्षिणमधील इयत्ता ५ वी ते १० वीच्या सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना ‘सहज शिक्षा लर्निंग’ या शैक्षणिक ॲपचे मोफत वितरण केले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीचे डॉ. अतुलबाबा भोसले यांनी याकामी पुढाकार घेतला असून, सोमवारी (ता. ५) सकाळी १० वाजता कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह (टाऊन हॉल) येथे विद्यार्थी – पालक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  शिक्षण हा सर्वांचा जिव्हाळ्याचा व अत्यंत आवश्यक घटक आहे. पारंपारिक शिक्षणाबरोबरच डिजीटल साधनांचा वापर करुन शिक्षण मिळाले, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला अनुसरून, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, यासाठी ‘सहज शिक्षा लर्निंग’ ॲप्लिकेशन बनविण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने म

शेतकऱ्यांना पिकाची उत्पादकता व उत्पादन वाढीसाठी कृषिविषयक अद्ययावत माहिती मिळणे गरजेचे

Image
उंडाळे : प्रतिनिधी       शेतकऱ्यांना पिकाची उत्पादकता व उत्पादन वाढीसाठी कृषिविषयक अद्ययावत माहिती मिळणे गरजेचे आहे. उंडाळे येथील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येईल. असा विश्वास व्यक्त करून माजी मंत्री स्व.विलासराव पाटील यांनी कायम लोकहितासाठी कार्य केले, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला.       उंडाळे ता.कराड येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रयत सह.साखर कारखान्याचे चेअरमन ॲड.उदयसिंह पाटील, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडल कृषी अधिकारी शितल नांगरे, उदयआबा पाटील, सचिन काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.      सारंग पाटील म्हणाले, सहकारी चळवळीला दिशा देणार्‍या स्व.विलासराव पाटील काकांच्या उंडाळे गावी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून हे काम होत असल्याचा आनंद आहे. ह्या दोन नेत्यांमध्ये ऋणानुबंध व अनोखे नाते राहिले आहे. स