Posts

Showing posts from August, 2023

देशाला ऑलिम्पिकचे पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कराडच्या गोळेश्वरचे सुपुत्र पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Image
    देशाला ऑलिम्पिकचे पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कराडच्या गोळेश्वरचे सुपुत्र पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यशासनाचे आभार मानले आहेत. याविषयी त्यांनी पत्र लिहले आहे.     पै.खाशाबा जाधव यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पै.खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची तेथून घोषणा केली आहे. केली. या निर्णयाचे स्वागत खा. श्रीनिवास पाटील यांनी केले असून पत्राद्वारे राज्य शासनाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, ना.देवेंद्र फडणीस, क्रिडा मंत्री संजय बनसोडे यांना याविषयी पत्र लिहले आहे.  त्यात म्हंटले आहे,  माझ्या सातारा लोकसभा मतदार संघातील गोळेश्वर गावच्या छोट्या खेड्यात जागतिक ऑलिम्पिकमध्ये भारतात पहिले वैयक्तीक पदक मिळविणारे पै.खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोज

*परभणी येथे ‘शासन आपल्या दारी’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ*

Image
*परभणी येथे ‘शासन आपल्या दारी’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ* --- *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती* *जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्र्यांची ग्वाही* परभणी, दि.२७ (जिमाका): परभणी जिल्ह्यात पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न असून, ते सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शहरात ‘अमृत’ योजनेतून भूयारी गटार, काँक्रिटचे रस्ते, औद्योगिक वसाहत, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.  परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मैदानावर आज  ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री विक्रम काळे, अब्दुल्लाह खान अ. लतीफ खान उर्फ बाबाजानी दुर्राणी, विप्लव बाजोरिया, मेघना साकोरे-बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, रत्नाकर गुट्टे, बालाजी कल्याणकर, माजी मंत्री अर्जून खोत

कराड साळशीरंबे गावचे युवा नेते व कराड तालुका भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष, श्री.पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

Image
कराड साळशीरंबे गावचे युवा नेते व कराड तालुका भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष, श्री.पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि.25 ऑगस्ट रोजी 'कृष्णा हॉस्पिटल, कराड व डॉ.अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठान, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने साळशीरंबे, ता कराड येथे मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा येथील 120 विद्यार्थ्यांना वही, पेन, शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. हे आरोग्य शिबीर लक्ष्मी विष्णू मंदिर हॉल,साळशीरंबे याठिकाणी आयोजित केले होते. आणि यासाठी, मेडिसिन, सर्जरी, अस्थीरोग, हृदयरोग, दंतविकार, फिजिओथेरपी, बालरोग, कर्करोग, आणि कान-नाक-घसा यांवरील सर्व प्रकारच्या तपासण्या साळशीरंबे येथे करण्यात आल्या. या ठिकाणी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. साधारणपणे 150 ते 200 च्या आसपास रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये रुग्णांचे रक्तदाब, साखर, इ.सी.जी. तसेच कान,नाक,घसा व हाडांच्या, डोळ्यांच्या अशा सर्वच तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय रूग्णांना मोफत औषधे देखील देण्यात आली. कॅम्पमधील ज्या रुग्णांना यापुढील उपचाराची आव

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज कराड शहरात मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला

Image
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज कराड शहरात मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला . यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चीब, सहप्रभारी एहसान खान, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ते मा. दीपक राठोड, महासचिव श्रीनिवास नालमवार, प्रदेश सरचिटणीस तारिक बागवान, सातारा जिल्हा प्रभारी अनिकेत नवले, सातारा जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, कार्याध्यक्ष अमित जाधव, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अजित केंजळे, कराड उत्तर काँग्रेस कमिटी अध्यक्ष निवास थोरात, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, देवदास माने, गणेश उबाळे, राजेंद्र यादव, श्रीकांत मुळे, अभिजित चव्हाण, दिग्विजय सूर्यवंशी, मुबीन बागवान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  हा मशाल मोर्चा गेल्या 9 वर्षात मोदी सरकारने दिलेली खोटी आश्वासने, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, सरकारी नोकर भरती व स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण आदी फसव्या घोषणा यांचा

चांद्रयान 3 चे यशस्वी मोहिमे नंतर कराड शहर भाजपच्या वतीने मिठाई वाटून , फटाके उडवून जल्लोष

Image
चांद्रयान 3 चे यशस्वी मोहिमे नंतर कराड शहर भाजपच्या वतीने मिठाई वाटून , फटाके उडवून जल्लोष सादर करण्यात आला यावेळी शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, मुकुंद चरेगावकर, शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे, युवा मोर्चा उपाध्यक्ष शैलेश गोंदकर, अनिल पवार, विश्वनाथ फुटाणे, अमोल पवार, यश पवार, सिद्धेश पवार सुशील बंगाली , सुमित पवार, अण्णा लावंड, निखिल पवार, अक्षय पाटील, विघ्नेश पवार, प्रशांत  तावरे, शशिकांत लावंड, आणि  असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

कोकणला जोडणारा कराड-चिपळूण राष्ट्रीय मार्ग क्र.१६१ वरील पाटण ते संगमनगर धक्का रस्त्याचे काम नव्याने

Image
      कोकणला जोडणारा कराड-चिपळूण राष्ट्रीय मार्ग क्र.१६१ वरील पाटण ते संगमनगर धक्का रस्त्याचे काम नव्याने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाकडून २१२.४९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी प्रशासकीय व केंद्रीय पातळीवर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यास यश आल्याने हा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.      कराड ते चिपळूण दरम्यानच्या म्हावशी ते संगमनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ह्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी गत वर्षापासून होती. तेव्हापासून या रस्त्याच्या कामाबद्दल खा.श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील होते. राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता व प्रादेशिक अधिकारी आणि केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री अशा तिन्ही स्तरावर खा.श्रीनिवास पाटील यांनी यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता.        खा.पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांना दि.२६ जानेवारी २०२३ रोजी लि

*महाराष्ट्राची राजधानी मुंबईच असावी हा यशवंतराव मोहिते भाऊंचा आग्रह होता - पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला भाऊंच्या आठवणींना उजाळा*

Image
 *महाराष्ट्राची राजधानी मुंबईच असावी हा यशवंतराव मोहिते भाऊंचा आग्रह होता - पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला भाऊंच्या आठवणींना उजाळा*    *कराड :* मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र 1960 साली अस्तित्वात आला. पण त्याआधी 1953 साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे विधेयक स्व. यशवंतराव भाऊंनी सर्वप्रथम मांडले व त्यावर ऐतिहासिक भाषण केले. महाराष्ट्राची राजधानी मुंबईच असावी, हा आग्रह त्यांनी केला होता. काँग्रेसमध्ये असूनही स्व. भाऊसाहेब हिरे यांनीे शेकाप आमदार असलेल्या भाऊंच्या भाषणाला पाठिंबा दिला होता. अशी आठवण आज यशवंतराव मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितली. त्यांनी आज स्व.यशवंतराव भाऊ यांच्या रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी भेट दिली व भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भाऊंचे सुपुत्र डॉ. इंद्रजित मोहिते, सोनहिरा सह साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, सनी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी, इंद्रजित चव्हाण, देवदास माने, राम मोहिते, बाबुराव मोटे, अशोकराव पाटील, वाठारचे जयवंत पाटील, बबन सुतार, आदी यावेळी उपस्थित होते. 

वाटेगाव येथे रविवारी पहिले शाहीरी लोककला संमेलन

Image
वाटेगाव येथे रविवारी पहिले शाहीरी लोककला संमेलन महाराष्ट्रातील दिग्गज शाहीर लोककलावंतांचे सादरीकरण: जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या हस्ते उदघाटन: अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई साठे, नातू सचिन साठे यांची प्रमुख उपस्थिती कराड प्रतिनिधी, दि.18: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकशाहीर वामनदादा कर्डक आणि लोकशाहीर अमर शेख यांचा वारसा पुढे नेण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव (ता.वाळवा) येथे दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी पहिले शाहिरी लोककला संमेलन आयोजित केलेले आहे. जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उदघाटन होणार असून अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई साठे, नातू सचिन साठे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, ही माहिती संमेलनाचे निमंत्रक डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.      कराड येथील पत्रकार परिषदेस रविंद्रकाका बर्डे, नवयान महाजलसाचे शाहीर सचिन माळी, ज्ञानदीप संस्था अध्यक्ष आनंदा थोरात, संतोष गोटल,  योगेश साठे उपस्थित होते.  यावेळी डॉ.भारत पाटणकर यांनी राज्यातील या पहिल्या लोकशाहिरी, लोककला संमेलनाचे स्वरूप आ

मसूर येथील मुख्य चौकात रोको आंदोलन करण्यात आले.

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला  हणबरवाडी शहापूर उपसा सिंचन योजनेसाठी २८ डिसेंबर २०२२ ला मोटर पंप चालु करुन पाईपलाईन चाचणी झाली, तेव्हापासून आज अखेर ही योजना चालू नाही, योजना चालू करणेसाठी मसुरसह राजमाची, मेरवेवाडी, करवडी, वाघेरी, वडोली(नि), शहापुर, रिसवड, अंतवडी, माळवाडी, यादववाडी, चिखली, किवळ, खोडजाईवाडी, घोलपवाडी, वनवासमाची, निगडी, हणबरवाडी, वाण्याचीवाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने आज १८ रोजी मसूर येथील मुख्य चौकात रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी यांनी पालकमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार दिनांक 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पाणीटंचाईच्या मीटिंगमध्ये सदरचा विषय मंजूर करून दिनांक 22 ऑगस्ट रोजी हणबरवाडी-शहापूर योजनेचे पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. तद्नंतर  सदरचे रस्ता रोको आंदोलन आमदार बाळासाहेब यांच्या सूचनेनुसार स्थगित करण्यात आले, मात्र लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे दिनांक 22 ऑगस्ट सदर योजनेचे पाणी न सुटल्यास पुन्हा दिनांक 23 रोजी पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांनी

प्रत्येक रविवारी दिल्लीला जाणारी हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस रेल्वे आता सातारा व कराड येथे थांबणार

Image
      प्रत्येक रविवारी दिल्लीला जाणारी हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस रेल्वे आता सातारा व कराड येथे थांबणार   सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला आहे. यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याने सातारा जिल्ह्यातून उत्तरेत जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.      हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस मिरजेतून प्रत्येक रविवारी धावणार आहे. मात्र या गाडीला सातारा व कराड येथे थांबा नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना मिरज किंवा पुणे रेल्वे स्थानकावर जावे लागत होते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत असल्याने ही गाडी कराड येथे थांबावी अशी मागणी विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. तसेच गोपाळ तिवारी यांनी त्यासाठी पुढे प्रयत्न केले. या मागणीची दखल घेऊन खा.श्रीनिवास पाटील यांनी सदरची रेल्वे गाडी कराड आणि सातारा येथील रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात यावी अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्या पाठपुर

*कराड नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला शिरवळ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची भेट

Image
 *कराड नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला शिरवळ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची भेट सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात देशामध्ये आणि राज्य पातळीवर अव्वल कामगिरी करणाऱ्या कराड नगरपालिकेला देशपातळीवरील मानांकन मिळाले आहे.त्या अंतर्गत आज शिरवळ ग्रामपंचायत चे पदाधिकारी,सदस्य व सामाजिक संस्थेचे सदस्य यानीं आज कराड नगरपरिषदे च्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास व मलनिस्सारण प्रकल्पास भेट देऊन माहिती घेतली व सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. कराड नगरपरिषदे चे प्रभारी मुख्याधिकारी श्री संजय गायकवाड यांनी सर्वाचे स्वागत केले.यावेळी सरपंच शिरवळ रविराज मधुकर दुधगावकर,ताहरे अब्दुल रहीम कासी उपसरपंच,बबनराव धायगुडे (ग्रामसेवक),गुरुदेव बरदाडे मा. सभापती खंडाळा ,प्रदिप माने सातारा उपजिल्हा प्रमुख शिवसेना, समीर  काझी,राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शिरवळ,चंद्रकांत मगर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष,ज्ञानेश्वर भांडे शिवसेना शहर प्रमु,राहुल कांबळे RPI खंजळा युवा अध्यक्ष,गोपीनाथ बोडरे - सामाजिक, विजय गिरे शिवसेना शहर प्रमुख ब ठाकरे गट य

कृष्णा महिला पतसंस्थेतर्फे कराड येथे शुक्रवारी महिला स्नेहमेळावा

Image
कृष्णा महिला पतसंस्थेतर्फे कराड येथे शुक्रवारी महिला स्नेहमेळावा सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला कराड, ता. १६ : येथील कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या ओगलेवाडी (ता. कराड) येथील नूतन शाखेचा शुभारंभ शुक्रवारी (ता. १८) भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सकाळी ११ वाजता महिला स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे २३ जानेवारी २००४ रोजी कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. या पतसंस्थेच्या तालुक्यात ४ शाखा असून, ओगलेवाडी येथे नवीन शाखा सुरू करण्यात येत आहे. या नव्या शाखेचे उद्घाटन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ११ वाजता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत टाऊन हॉल येथे होणाऱ्या महिला स्नेहमेळाव्यासाठी पतसंस्थेच्या मार्गदर्श

*कराड उत्तर विधानसभेच्या भाजपा सोशल मीडिया वॉर रूम चे उद्घाटन*

Image
*कराड उत्तर विधानसभेच्या भाजपा सोशल मीडिया वॉर रूम चे उद्घाटन* .सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला  *स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वाँररूम कार्यान्वीत*. *भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरातील विधानसभाक्षेत्र निहाय सोशल मीडिया वॉर रूम संघटीत करण्यात आली आहे. या वाँररूम च्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी निवडणूकीची तयारी करण्यासाठी सज्ज झाली आहे.पक्षाची ध्येय धोरणे लोकांच्या पर्यंत पोहचवणे आणि लोकांची मते आणि समस्या संघटनेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही वाँररूम सेतूचे काम करणार आहे.या वाँररूम चे*  *उदघाटन उपमुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष मा चंद्रशेखर जी बावनकुळे व इतर मान्यवरांच्या हस्ते आज  करण्यात आले*.        *259 कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील वाँररूम वर्धन हाईटस,ओगलेवाडी रोड सैदापूर,ता.कराड येथे* *साकारण्यात आली आहे. याचे लोकार्पण आज भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षी करण्यात आले*.   *यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम दादा, भाजपा नेते मा. मनोज घोरपडे दादा, कराड उत्तर  विधान

योगाचे शास्त्र आणि स्वामींचे वस्त्र जीवनाला लाभलेला महत्त्वाचा पैलू - डाॅ.जान्हवी इंगळे सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला (प्रतिनिधी अक्कलकोट, ) - - योग अभ्यास आणि सध्याची जीवनशैली यांचा मेळ साधण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो, हा मुळात लोकांचा गैरसमज आहे. आज वयाच्या या वळणावरही नियमितपणे माझा संपूर्ण वेळ योग अभ्यासाला देत असल्याने अनेक कठीण प्रसंगांना तोंड देताना योगाभ्यासाने राग, लोभ आणि अस्वस्थतेपासून दूर ठेवले. अर्थात योग हे शास्त्र आहे, आरोग्यरक्षणाचा, ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. त्यामुळे त्याला कोणताही धर्म नाही, असे मला वाटते. आज योग शिकवताना अनेक देशांमधले विद्यार्थी. तसेच निरनिराळी माणसे भेटतात, वेगवेगळे धर्म, पंथ आणि वर्णाच्या या लोकांमध्ये वावरताना जरादेखील शंका मनात निर्माण होत नाही. कारण, आपण माणसांना जगणं शिकवणारे शिक्षक आहोत, हे आता मनाशी पक्के झाले आहे. ज्यांना विकार आहेत, त्यांचे विकार बरे करण्यासाठी योग आहे. ज्यांना विकार नाहीत, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग आहे. तो कोणत्या धर्माचा नाही, कोणत्या जातीचा नाही. हे पटवून देताना मी अनेकांना सांगत असते एखादे आसन किंवा ध्यानधारणा करताना प्रार्थनेचा प्रश्न येतो. तेव्हा तुम्हाला आवडेल ती प्रार्थना म्हणा, यासाठी भाषा आणि धर्म गरजेचा नाही. जिथे मन एकाग्र होते, ती शाश्वत आनंद प्राप्त करण्याची शैली योग अभ्यासातून प्राप्त होते. यास अनुसरून माझी भक्ती आणि निष्ठा येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांवर आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने व योगाभ्यासाने माझे मन एकाग्र होते. ते माझ्या जीवनातील शाश्वत आनंद आहे. म्हणून आज येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर लाभलेले स्वामींचे वस्त्र व योगाचे शास्त्र हे 'योगशास्त्र आणि स्वामींचे कृपा वस्त्र म्हणजे माझ्या जीवनाला लाभलेला महत्त्वाचा पैलू आहे असे मनोगत साताऱ्याच्या रहिवासी व अमेरिकेतील ग्रेस लेडी ग्लोबल अकॅडमीकृत मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित असलेले डाॅ.जान्हवी इंगळे यांनी व्यक्त केले. त्यांनी नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी डॉ जान्हवी इंगळे बोलत होत्या . मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे यांनी डाॅ.जान्हवी इंगळे यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याच बरोबर *श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्री अमोलराजे भोसले यांनी देखील स्वामींचे कृपा वस्त्र स्वामींची प्रतिमा, श्रीफळ देऊन अन्नछत्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला*. यावेळी *अमोलराजे यांनी योग कार्याचे जागतिक विश्वविक्रमाचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या*..... याप्रसंगी महेश इंगळे यांनी सांगितले डॉ जान्हवी इंगळे या एक उच्च विद्याविभुषीत संगणक अभियंता आहेत. शिक्षणाबरोबरच त्यांनी आरोग्य शिक्षणाचा ध्यास गांभीर्याने घेतला आहे, त्यामुळे नियमित योगासन करण्याचा छंद त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जोपासलेला आहे. या योगा क्षेत्रात आता त्या गेल्या पंधरा वर्षांपासून योग साधना करत आयुष मिनिस्ट्री गव्हर्नमेंट सर्टिफाईड योगा शिक्षिका व योगा डिप्लोमा धारक आहेत. योग शाळेच्या माध्यमातून त्या ऑनलाइन माध्यमातून देश विदेशातील नागरिकांना विद्यार्थ्यांना मोफत योगाभ्यासाचे महत्त्व पटवून प्रात्यक्षिक व धडे देत आहेत. जान्हवी यांनी १३ सप्टेंबर २०२० रोजी सिद्धासन आसनामध्ये ५ तास १ मिनिट १७ सेकंद आसनस्थ राहून नवीन विश्वविक्रम केला. या विक्रमाची नोंद योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. २०२१ मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये १ तास १९ मिनिट ३४ सेकंदामध्ये १० हजार वेळा महिलांना उपयुक्त भद्रासन करून दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करीत तो समस्त महिलांना समर्पित केला. तिसरा विश्वविक्रम 8 तास 13 मिनिटे सुप्तबद्धकोनासन मध्ये केला.तसेच त्या राष्ट्रीय ब्रॅण्ड अम्बेसिडर आहेत.अशा या विश्वविक्रम वीर जान्हवी यांना योगाभ्यासाने सुदृढ आरोग्य तर लाभलेले आहेच परंतु स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांना जीवनात सुख समृद्धी व ऐश्वर्य लाभू दे याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी त्यांच्या प्रति नेहमीच प्रार्थना असतील अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, मनोज कामनुरकर, संतोष जमगे, अविनाश क्षीरसागर, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.फोटो ओळ - डाॅ.जान्हवी इंगळे यांचा देवस्थान कार्यालय आणि अन्नछत्र येथे सत्कार करताना देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे आणि अन्नछत्र चे विश्वस्त श्री अमोलराजे भोसले हे दिसत आहेत.

Image
योगाचे शास्त्र आणि स्वामींचे वस्त्र जीवनाला लाभलेला महत्त्वाचा पैलू - डाॅ.जान्हवी इंगळे                                                                                                                (प्रतिनिधी अक्कलकोट, ) -                   - योग अभ्यास आणि सध्याची जीवनशैली यांचा मेळ साधण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो, हा मुळात लोकांचा गैरसमज आहे. आज वयाच्या या वळणावरही नियमितपणे माझा संपूर्ण वेळ योग अभ्यासाला देत असल्याने अनेक कठीण प्रसंगांना तोंड देताना योगाभ्यासाने राग, लोभ आणि अस्वस्थतेपासून दूर ठेवले.  अर्थात योग हे शास्त्र आहे, आरोग्यरक्षणाचा, ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. त्यामुळे त्याला कोणताही धर्म नाही, असे मला वाटते. आज योग शिकवताना अनेक देशांमधले विद्यार्थी. तसेच निरनिराळी माणसे भेटतात, वेगवेगळे धर्म, पंथ आणि वर्णाच्या या लोकांमध्ये वावरताना जरादेखील शंका मनात निर्माण होत नाही. कारण, आपण माणसांना जगणं शिकवणारे शिक्षक आहोत, हे आता मनाशी पक्के झाले आहे. ज्यांना विकार आहेत, त्यांचे विकार बरे करण्यासाठी योग आहे.  ज्यांना विकार नाहीत, त्यांच्या चांगल्या आर

राष्ट्रपती पोलिसपदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे**उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

Image
*राष्ट्रपती पोलिसपदक, शौर्यपदक विजेत्या पोलिसांचे* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला *जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी असलेल्या* *महाराष्ट्राच्या पोलिसांचा राज्याला अभिमान* *-उपमुख्यमंत्री अजित पवार* मुंबई, दि. 14 :- राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील 76 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा तपास, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य, नागरिकांशी संवाद-सौहार्द अशा अनेक आघाड्यांवर जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची क्षमता, गुणवत्ता, दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. पदकविजेत्या पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलं असून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पदक’ विजेत्या प्रवीण साळुंखे, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलीस अधिकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अ

पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

Image
*पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.* *मंजूर कामे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी निर्देश दिले.* पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा बैठक घेतली. पाटण विधानसभा मतदारसंघात शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते ३० जून २०२३ रोजी ई-भूमिपूजन संपन्न झाले होते. या विकासकामांचा आढावा मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी घेतला. सध्या पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व कामे सुरू करावीत, अशी सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली. ही विकासकामे करत असताना त्यांची गुणवत्ताही राखावी, झालेल्या कामांची छायाचित्रे अपलोड करावीत, तसेच टंचाईला सामोरे जावे लागू नये अशा पद्धतीने जलजीवन मिशनची कामे कालबद्ध वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी दिले.  कांदाटी खो

सह्याद्री न्युज नेटवर्क कराड राज्य विधिमंडळ :: पावसाळी अधिवेशन*आज दिव्यांगांच्या शाळांसंदर्भात विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी शासनाची भूमिका मांडली.*

Image
सह्याद्री न्युज नेटवर्क कराड  राज्य विधिमंडळ :: पावसाळी अधिवेशन *आज दिव्यांगांच्या शाळांसंदर्भात विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी शासनाची भूमिका मांडली.* आज विधानसभेत लक्षवेधी सूचनांवरील चर्चेदरम्यान दिव्यांगांच्या शाळांच्या संदर्भात सन्माननीय सदस्य मा. आशीषजी जैस्वाल, मा. बच्चूजी कडू, मा. विनयजी कोरे, मा. नरेंद्रजी भोंडेकर यांनी विविध उपप्रश्न उपस्थित केले. यासंदर्भात मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी शासनाची भूमिका सभागृहात मांडली. सन २०१५ साली दिव्यांगांच्या १२३ शाळांना अनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात आली. २०१८ साली या शाळांतील २,४६४ पदांना मान्यता दिली आहे. सन २०१५ पूर्वी ९३२ अनुदानित शाळांना मान्यता देण्यात आली असून त्यांत ४६,४६६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर विनाअनुदानित तत्त्वावर ८५६ शाळा असून त्यांत ३३,८०२ विद्यार्थी शिकत आहेत. तसेच दिव्यांगांच्या काही शाळांना विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे, परंतु अशा शाळांतील पदनिर्मितीला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही, अशी माहिती मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी या अन