सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड केशवराव पवार इंग्लिश स्कूलचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत उज्ज्वल यश* कराड: येथील रयत शिक्षण संस्थेचे केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत परीक्षेत उज्वल यश संपादित केले. शाळेच्या दोन विद्यार्थ्यानी राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. यामध्ये कु श्रावणी जगताप (इयत्ता ६ वी ) हिने ८६ गुण प्राप्त करून सिल्व्हर मेडल तर सार्थक जगताप (इ ५ वी) याने ७७ गुण प्राप्त करून ब्राँझ मेडल मिळविले.

*केशवराव पवार स्कूलचे इंडियन टॅलेंट ऑलिम्पयाडमध्ये उज्ज्वल यश*

कराड: येथील रयत शिक्षण संस्थेचे केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पयाड परीक्षेत उज्वल यश संपादित केले.
       शाळेच्या पाच विद्यार्थ्यानी राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. यामध्ये सार्थक जगताप (४ था) श्रावणी जगताप (४ थी), रुद्रनील महाडिक (१४ वा ) आरव खरात (१७वा), श्रेयस पाटील (१७ वा) आदी विद्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.
      यशस्वी विद्यार्थ्याना विभागप्रमुख श्री दत्तात्रय पोळ यांचे मार्गदर्शन लाभले.
         या यशाबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड  रवींद्र पवार (भाऊ) , जनरल बॉडी सदस्य ॲड सत्यजीत पवार (बाबा) , माजी सहाय्यक विभागीय अधिकारी अब्बास मणेर, मुख्याध्यापक श्री एस व्ही राठोड, प्रशासकीय अधिकारी श्री आर टी पाटील यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त