चार चाकी गाडीचीदुचाकी गाडीला धडक उंडाळे शेवाळवाडी येथील नितीन शेवाळे यांचा दुर्दैवी मृत्यू
कारची दुचाकीला धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील सुट्टीवर आलेला सैन्यदलातीलजवान ठार झाला. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील मळाईदेवी पतसंस्थेसमोर बुधवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक कांही काळ विस्कळीत झाली होती.
नितीन मोहन शेवाळे (वय २१ रा. उंडाळे शेवाळेवाडी नं. १ ता. कराड) असे आपघातात ठार झालेल्या सैन्यदलातील जवानाचे नाव आहे. तर (प्रथमेश दिपक शेवाळे वय १९ रा. उंडाळे शेवाळेवाडी नं. १ ता. कराड) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीन मोहन शेवाळे हे भारतीय सैन्यदालात देशसेवेसाठी कर्तव्य बजावत होते. ते सुट्टीसाठी गावी शेवाळेवाडी येथे आले होते. त्याच्या चुलत भावाचे कृष्णा रूग्णालयात पायाचे अॉपरेशन झाले होते. त्यांना बघण्यासाठी ते व आक युवक दोघे दुचाकी ( क्रमांक एम एच ५० एफ ३८८०) वरून रूग्णालयात येत होते. पुणे-बंगळूर महामार्गावर दुचाकी येथील मळाईदेवी पतसंस्थेसमोर आली असता. पाठिमागून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कार (क्रमांक एम एच १२ सी के १२३९) ची जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघेही महामार्गावरच फरपटत गेले. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. आपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक व युवक अपघातस्थळी धावले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग डी पी जैन विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा यांनी कराड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसंना खबर दिली. खबर मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार खलील ईनामदार व प्रशांत जाधव यांच्यासह कर्मचारी व महामार्ग पोलिस तातडीने अपृघातस्थळी दखल झाले. जखमींना रूग्णवाहिकेने कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र जवान नितीन शेवाळे यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर गभीर युवकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही खबर समजताच संपूर्ण शेवाळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. कराड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ए ए ईनामदार व प्रशांत जाधव यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. आपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
Comments
Post a Comment