सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड( अस्लम मुल्ला) बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विजय नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच मानसिंगराव आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सातारा जिल्ह्याचे माजी सहकार व पालकमंत्री  बाळासाहेब पाटील कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल बाबा भोसले माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या विचाराच्या संयुक्त आघाडीतून होऊ घातलेल्या 2023 शेतीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सर्वसाधारण खुला गटातून 3/4/2023 रोजी. विजयनगर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच मानसिंगराव आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करतेवेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश दादा जगताप,संचालक दयानंद पाटील भाऊ, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, कराड मर्चंट चे अध्यक्ष माणिकराव पाटील, राष्ट्रवादीचे युवानेते उपसरपंच प्रशांत यादव, चरेगावचे संजय माने, दिलीपराव साळुंखे, सर्जेराव पाणवळ, वारुंजीचे युवा नेते अनुज पाटील, संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष निसार मुल्ला, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ आबा, भाजपचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष धनाजी काका पाटील, मलकापूरचे माजी नगरसेवक राजूभाई मुल्ला, प्रमोद शिंदे, चचेगावचे युवा नेते महादेव पवार, प्रा. हणमंतराव कराळे सर,राष्ट्रवादीचे सरचिटणीस अरविंद यादव, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, कोपर्डेचे युवा नेते नेताजी चव्हाण, इंद्रजीत भोपते, गिरीश यादव, अभिजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त