Posts

Showing posts from July, 2023

सातारा जिल्ह्यातील २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या

Image
सातारा जिल्ह्यातील २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या ब्रेकिंग news कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी काढले बदल्यांचे आदेश सातारा , दि.२९,(प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढले आहेत. सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याअंतर्गत करण्यात आल्या असून बदलीच्या ठिकाणी संबंधीत अधिकाऱ्यांनी तत्काळ हजर राहून पूर्व अहवाल देण्याच्या सूचना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.  महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २२ पोटकलम ( २ ) अन्वये , जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून , जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार एकूण २० सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्हयाअंतर्गत प्रशासकीय कारणास्तव व विनंतीवरून करण्यात आल्या आहेत .   सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणावरून नव्याने नियुक्ती बदली करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचा तपशील पुढीलप्रमाणे- : सपोनि प्रशांत दतात्रय बधे (प्रभारी उंब्रज), स

सातारा सेतूमधील अपहाराची सातारा जिल्हाधिकारी यांनी घेतली गंभीर दखल सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

Image
सातारा सेतूमधील अपहाराची सातारा जिल्हाधिकारी यांनी घेतली गंभीर दखल सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला सातारा प्रांताधिकाऱ्याना दिले चौकशीचे आदेश  सातारा,(प्रतिनिधी ): सातारा तहसील कार्यालयातील सेतूमध्ये जुलै २२ ते जून २३ या वर्षाच्या कालावधीमध्ये करारानुसार ऑनलाईन ऐवजी ऑफलाइन प्रतिज्ञापत्र नोंद करून १४ लाख ७१ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत माहिती अशी की, शासनाने विविध प्रकारची प्रतिज्ञापत्रे, दाखले,प्रमाणपत्र, उतारे  अशी कागदपत्रे नागरिकांना एकाच छताखाली मिळावीत यासाठी नागरी सुविधा केंद्र म्हणजेच सेतूच्या माध्यमातून एक खिडकी योजना अंमलात आणली. त्यासाठी कराराने ठेकेदार नेमण्यात येऊन त्यांचेकडे सुविधा देण्याचे काम सोपविले.परंतु सातारा तहसील कार्यालयातील सेतू विभागाच्या ठेकेदाराने तज्ञ मनुष्यबळ, सक्षम यंत्रणा नसतानाही काम घेऊन येथील सुविधा पुरविताना हलगर्जीपण केला एवढेच नव्हे तर हे काम करत असताना शासनाची फसवणूक केले असल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त माहितीतून सिद्ध झाले.

सातारा मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजनांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई

Image
सातारा सहयाद्री वार्ता नेटवर्क कराड अस्लम मुल्ला मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजनांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज आढावा बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.* मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजना यांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथून पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. याआधी याच आठवड्यात गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे यासंदर्भात मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने सर्व खबरदारीचे उपाय योजले असून संभाव्य आपत्ती रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सतर्क आहे, असे यावेळी मा. ना. शंभूराद देसाई साहेबांनी स्पष्ट केले. तसेच आजच्या बैठकीत त्यांनी सर्व उपाययोजनांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. मुसळधार पाऊस ध्यानात घेऊन जिल्ह्यातील दुर्गम भाग, तसेच डोंगरी भागां

अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा कराड सत्र न्यायालयाचा निकाल

Image
 अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा  कराड सत्र न्यायालयाचा निकाल कराड:        संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या  (रुवले) सुतारवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून केलेप्रकरणी कराड सत्र न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा, पोक्सो कायदयाअंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व १ लाख रूपयाची दंडाची शिक्षा सुनावली. संतोष चंद्रु थोरात (वय ४१)व रा. सुतारवाडी (रूवले) ता. पाटण जि. सातारा असे शिक्षा प्राप्त युवकाचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी ही ८ वर्षापेक्षा कमी वयाची आहे, हे माहीत असताना सुध्दा चॉकलेटचे आमिष व खेळविणेचे उद्देशाने फुस लावुन जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच तिचा गळा दाबुन हत्या केली. तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने तेथेच असलेल्या ओघळीत, घाणेरीचे झुडपात ७० फुटखोल लपवुन ठेवले.   ढेबेवाडी पोलीस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासी अधिकारी ढेबेवाडी पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी आपल्या टीमसह रूवले तेथील नथूराम सुतार यांचे घरावरील सीसी टीव्ही फुटेजच्

*कराड विमानतळाच्या विस्ताराबाबत येत्या तीन महिन्यात उच्च स्तरीय मिटिंग घेतली जाणार*

Image
 *कराड विमानतळाच्या विस्ताराबाबत येत्या तीन महिन्यात उच्च स्तरीय मिटिंग घेतली जाणार*  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानसभेतील प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर   *कराड:* महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे, या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले तालुका पातळीवरील विमानतळ स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उभारले होते. माझ्या मुख्यमंत्री काळात कराड विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर निध

सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या रस्त्यांसह, पुल व अन्य विकासकामांसाठी केलेल्या

Image
     सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या रस्त्यांसह, पुल व अन्य विकासकामांसाठी केलेल्या पाठपुरव्यातून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात सुमारे २७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागणार आहेत.       खटाव तालुक्यातील वडगाव ज.स्वामी येथे कुरणवस्ती रस्ता ग्रा.मा.२७९ वर नांदणी नदीवर मोठा पूल बांधणे कामासाठी ८ कोटी ५० लक्ष रूपये निधी मंजूर झाला आहे.     कोरेगाव तालुक्यातील सासपडे निसराळे तारगाव वाठार आर्वी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ किमी १६/०० ते १७/५०० ( भाग तारगाव पूल ते तारगाव रेल्वे स्टेशन) चे रुंदीकरण व सुधारणा करणे २ कोटी रूपये.        सासपडे निसराळे तारगाव वाठार आर्वी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ किमी २२/०० ते २५/०० (भाग वाठार ते इंगळे वस्‍ती) मधील लांबीचे रुंदीकरण व सुधारणा करणे ३ कोटी रूपये.      कराड तालुक्यातील रा.मा.१४८ रेठरे खुर्द आटके पाचवड कटपान मळा गोळेश्वर कापील गोळेश्वर कार्वे नाका रस्ता प्रजिमा ८१ किमी ७/०० ते ८/४०० या लांबीत रस्त्याच्या

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811

Image
*राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811 मुंबई, दि. १४:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग  *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे* गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे* वित्त व नियोजन हे खाते राहील.  *इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे:* छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास सुधीर सच्चिदानंद मुनगंट

Karad *रयत सेवक श्री शशिकांत माळी यांचा सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड असल्सम मुल्ला 9156992811

Image
Karad *रयत सेवक श्री शशिकांत माळी यांचा  सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड असल्सम मुल्ला 9156992811 सेवानिवृत्ततीनिमित्त सत्कार*       कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज मधील प्रयोगशाळा परिचर श्री शशिकांत यमाजी माळी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सील सदस्य अँड. रवींद्र पवार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने होते.      अँड. रवींद्र पवार म्हणाले, शशिकांत माळी यांनी 38 वर्षे 7 महिने अत्यंत प्रामाणिक पणे रयत सेवा करून संस्थेच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलेला आहे. तसेच रयत सेवकांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार रुजलेले आहेत. संस्थेत सेवा करण्याच्या संधीने सोने करणाऱ्या सेवकांचा सत्कार करणे ही संस्थेची संस्कृती आहे. त्यानंतर सत्कारमूर्ती सह त्यांचे सहकारी व प्राध्यापक, कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शशिकांत माळी यांचा मुलगा अँड. दिपक माळी यांनीही मनोगत व्यक्त करून आपले विचार मांडले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस. पाटील सर, प्रा.

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत आपल्यावर हात उचलणाऱ्या अश्विनला दीप्ती माफ करेल का?

Image
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत आपल्यावर हात उचलणाऱ्या अश्विनला दीप्ती माफ करेल का? सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) या एका विलक्षण महिलेची प्रेरणादायक कहाणी सांगितली आहे, जी आपला आशावादी स्वभाव आणि कधीही हार ना माणण्याची वृत्ती यांच्या बळावर जीवनातील सगळ्या अडचणींना धडाडीने तोंड देते. आपल्या मुलांचा दक्षतेने सांभाळ करत असतानाच ती स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी देखील प्रयत्नशील राहते. आपला अभ्यास असो किंवा आपल्या कुटुंबासाठी काम करणे असो ती अत्यंत  नेटाने काम करत राहते. तिच्या मनातील आशा कधीच मावळत नाही आणि उज्ज्वल आणि समाधानी भविष्यासाठी ती प्रयत्न करणे सोडत नाही. अन्यायाविरुद्ध ती खंबीरपणे उभी राहते आणि न्याय होईल याची खातरजमा करते. मालिकेतील आगामी कथानक पुष्पाचा मोठा मुलगा अश्विन (नवीन पंडिता) याच्याभोवती फिरणारे आहे. आपली पत्नी दीप्ती (गरिमा परिहार) हिचा वाढदिवस साजरा करणाऱ्या अश्विनच्या मनात विविध भावनांचा कल्लोळ माजला आहे. दीप्तीच्या परिवारासमोर त्याला न्यूनतेची भावना होते. तो दीप्तीला लागेल असे काही तरी बोलतो. आणि त्यानंतर तर रागाच्या

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीवर हरीष पाटणे, चंद्रसेन जाधव तर साप्ताहिक राजसत्यचे संपादक गोरख तावरे यांची निवड

Image
पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीवर हरीष पाटणे, चंद्रसेन जाधव तर  साप्ताहिक राजसत्यचे संपादक गोरख  तावरे यांची निवड वृत्तपत्र क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती (अ‍ॅक्रीडेेशन) समितीवर पुणे विभागातून दै. ‘पुढारी’ साताराचे वृत्तसंपादक, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व दै. ग्रामोध्दारचे संपादक चंद्रसेन बापूसाहेब जाधव साप्ताहिक राजसत्य संपादक गोरख तावरे कराड यांच्यासह पाच जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यासह राज्यातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र शासनाने मंगळवारी राज्यस्तरीय व विभागीय अधिस्वीकृती समितीची रचना करुन नियुक्ती आदेश काढले. या समितीवर पुणे विभागातून गेली 24 वर्षे पत्रकारितेत कार्यरत असलेले दै.‘पुढारी’ सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष वसंतराव पाटणे, दै.ग्रामोध्दारचे चंद्रसेन बापूसाहेब जाधव, अमन सय्यद (पुणे), गोरख तावरे (कराड), सुमित भावेे(पुणे)  या पाच जणांची नियुक्ती करण्यात आली. हरीष पाटणे गेली 24 वर्षे सातारच्या पत्रकारितेत कार्

मलकापूर नगर परिषदेचे लाचखोर नगरअभियंत्यासह साथीदारास दोन दिवसाची पोलीस कोठडी

Image
मलकापूर नगर परिषदेचे लाचखोर नगरअभियंत्यासह साथीदारास दोन दिवसाची पोलीस कोठडी कराड मलकापूर नगरपरिषदेचे नगरअभियंता नगरअभियंता शशिकांत सुधाकर पवार (रा. कोयना वसाहत, मूळ रा. मंद्रुळकोळे) याच्यासह खासगी इसम सुदीप एटांबे यांना 30 हजार रूपयांची लाच स्वीकारताना सोमवारी मलकापूर नगरपरिषद परिसरात ताब्यात घेतले होते. त्यांनी कराडातील रस्त्याच्या कामाच्या बिलाची उर्वरीत रक्कम देण्यासाठी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर हा सापळा लाचलुचत प्रतिबंधक विभागाने रचला होता. मंगळवारी या दोन्ही संशयितांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली.   नगरअभियंता पवार याच्याकडे कराड नगरपरिषदेचा नगरअभियंता म्हणून तात्पुरता कार्यभार आहे. दरम्यान कराडच्या वाखाण भागातील सुनील पवार घर ते कलबुर्गी घर या रस्त्याच्या कामाचे बिलाची उर्वरित बिल मंजुरीसाठी नगरअभियंता शशिकांत पवारने तडजोडीअंती 30 हजार रूपये मागणी करून खासगी इसम सुदीप दीपक एटांबे (रा. माऊली कॉलनी, मलकापूर) याच्याकडे देण्यास

कराड शहरातील एकविरा कॉलनीमधील आरसीसी रस्ता बनवण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण

Image
कराड शहरातील एकविरा कॉलनीमधील आरसीसी रस्ता बनवण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण यांच्या मागणीनुसार माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे विद्यमान आमदार माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी वीस लाख रुपये मंजूर केले. आज दिनांक 9/7/ 2023 रोजी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा हस्ते करण्यात आले,कारेक्रमाचे आध्यक्ष झाकीर पठाण होते या वेळी पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा सत्कार मदार शैख यांच्या हस्ते करण्यात आला झाकीर पठाण यांचा सत्कार आल्ताफ मोमिन व शिवराज मोर यांचा सत्कार समीर डंगरे यानी केला यांच्यासोबत युवा नेते इंद्रजीत चव्हाण, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, ऋतुराज मोरे,श्रिकांत मुळे,जितेंद्र ओसवल, अमीर कटपुरे साहेबराव शेवाळे शिवराज इंगवले जावेद नाईकवडी सलिम बागवान यांचा ही सत्कार करण्यात आला,या वेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...................,हा कारेक्रम यशस्वी करण्या करिता कॉलनीतील आदम पठाण,आब्दुल मुल्ला,रफ़ीक शेख,उसमान शेख,आयुब बागवान,आली शैख यानी केले 

पुणे *लोकमान्य टिळकांवर संत व वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव*

Image
- पुणे *लोकमान्य टिळकांवर संत व वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव*   *संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनमाला* पुणे : संतांचे कार्य काय आहे, हे लोकमान्य टिळकांना समजले होते. त्यामुळे गीतारहस्य या ग्रंथाची सुरुवात त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली होती. तसेच समारोप देखील तुकाराम महाराजांच्या अभंगाने केला. लोकमान्य टिळकांवर संत व वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्याच्या व सामाजिक चळवळीत संतपरंपरेतील पैलूंचा उपयोग केला, असे प्रतिपादन संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी केले.   श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनमालेत डॉ.सदानंद मोरे यांचे प्रवचन झाले. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे.   डॉ.सदानंद मोरे म्हणाले, वारकरी संप्रदायाचे दैवत हे श्री व

*किल्ले वसंतगडवर करण्यात आला झाडांचा सहावा वाढदिवस..

Image
*किल्ले वसंतगडवर करण्यात आला झाडांचा सहावा वाढदिवस.. .* टीम वसंतगड ने 2017 साली  वसंतगड वरती 350+ झाडे लावले होते. टीम फक्त झाडे लावून थांबली नाहि तर ती झाडे जपण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम करन्यात आले एक एक वेळेस तर किल्ले वसंतगड वरीलकृष्णा तलावातून पाणी बॉटल भरून भरून आणून पानी घातले गेले.. झाडे जागवण्यासाठी होणारी धडपड पाहून वसंतगड गावचे सरपंच व टीम चे मार्गदर्शक श्री. अमितदादा नलवडे यांच्या साह्याने किल्ले वसंतगड वरती झाडे जगवण्याकरिता सोलर पंप देण्यात आला जेणेकरून लावलेले झाडे जगण्याची इच्छाशक्ती अधिक वाढली. प्रत्येक रविवारी झाडांना पाणी घालण्याचे काम सुरळीत चालू झाले. पण हे वाटते तितके सोपे नव्हते प्रत्येक रविवारी जाऊन गडावर झाडांना पाणी घालने. त्या झाडांनाही कदाचित टीमच्या  जिद्दीला साथ देऊशी वाटली असेल असेच काही..कित्येक ऊन वारा पाऊस सहन करत ते ठाम उभे राहिले टीमच्या कष्टाची साक्ष देत.. झाडे जगवताना प्रत्येकांच्या डोळ्यां समोर एकच ध्येय असायचे गडावर येणाऱ्या लोकांना गारवा व रान मेवांचा मनसोक्त आनंद घेता यावा या विचाराने मनाशी जिद्ध धरून प्रत्येकाने केलेल

मसुरचे सुपुत्र श्री दिलिपकाका लंगडे निर्मित "सुविचार संग्रह भाग-१" (अर्थात मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा) या पुस्तकी संग्रहाचा प्रकाशन सोहळा

Image
*मसुरचे सुपुत्र श्री दिलिपकाका लंगडे निर्मित "सुविचार संग्रह भाग-१" (अर्थात मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा) या पुस्तकी संग्रहाचा प्रकाशन सोहळा राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते सिद्धेश मंगल कार्यालय मसूर येथे आज संपन्न झाला.* याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, लेखक व ग्रामीण कथाकार बबन पोतदार,  महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे(माई), बाळासो जगदाळे, बच्चूभाई शहा, आर.पी.साळुंखे, डॉ.रमेश थोरात, डी.ए. भोज, डॉ.रमेश लोखंडे, नरेश माने, ॲड.रणजीत जगदाळे, अनिल जेधे, विवेक भोज, मोहन सासवडे, निवास चव्हाण, दिनेश शहा तसेच इतर नागरिक उपस्थित होते.

मुंबई येथे दलित पँथरच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या

Image
मुंबई येथे दलित पँथरच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दलित पँथरचे संस्थापक कवी पद्मश्री कालकथित नामदेव ढसाळ यांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि उपस्थितांशी संवाद साधला.  गेली पाच दशके दलित पँथरची वाटचाल जोमाने सुरू आहे, याचा आनंद आहे, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात आकारास आलेली शिवसेना-दलित पँथरची शिवशक्ती-भीमशक्ती यापुढेही कायम राहील. तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सर्व समाजघटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. सुखदेवतात्या सोनवणे, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष मा. आबासाहेब पाटील यांच्यासह दलित पँथरचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्

गडचिरोलीत "शासन आपल्या दारी" या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदेजी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Image
गडचिरोलीत "शासन आपल्या दारी" या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदेजी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानिमित्तानं अजितदादा पवार यांनी नागरिकांना संबोधित केलं. सरकार हे जनतेसाठी असतं. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, त्यांचे हेलपाटे कमी व्हावेत आणि लाभ हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महायुती सरकारचं आजचं हे कार्यक्रम आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शासनाचा पहिला महत्त्वाचा कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात पार पडतोय. यावेळी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आगेकूच करतोय. गेली ९ वर्षे देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता मोदी साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी काम करत आहेत. अशावेळेस केंद्र सरकार व राज्य सरकार एकाच विचाराचं असलं तर केंद्रासह राज्याच्या योजना जनतेपर्य

*पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा बैठक घेतली.*

Image
*पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा बैठक घेतली.* पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विभागाकडील सामान्य विकास व पद्धती सुधारण्यासाठीची कामे, सार्वजनिक बांधकामकडील कामे, ग्रामपंचायत, ग्रामीण रस्ते विकास, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, अंगणवाडी व शाळा दुरुस्ती, जलजीवन मिशन, कोयना पुनर्वसन आदी विषयांतील कामांच्या सद्यस्थितीचा मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा करण्यात आला असून यामधील कामे विहीत मुदतीत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्याबाबत यावेळी त्यांनी निर्देश दिले. कामांची निवड करत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, तसेच जे ठेकेदार विहीत मुदतीत व गुणवत्तापूर्ण काम करत नसतील अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले. याशिवाय जलजीवन मिशन अं

सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनांच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा सौदा करून आपली क्षमता सिद्ध करू शकेल का?

Image
सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनांच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा सौदा करून आपली क्षमता सिद्ध करू शकेल का? सोनी सबवरील वंशज मालिकेत एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील संघर्ष, राजकीय डावपेच आणि गुंतगुंतीची नाती यामध्ये गुंफलेल्या कथानकाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. कथा उलगडत जाताना, महाजन कुटुंबातील एक धडाडीची तरुणी युविका (अंजली तत्रारी) महाजन ऑफिसमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू पाहात आहे आणि त्यासाठी आपली क्षमता सिद्ध करण्याची धडपड करत आहे. तिला पावलोपावली एक नवी अडचण सामोरी येत आहे. मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करून युविका हा सौदा कसा पूर्णत्वाकडे नेते ही बघणे रोचक असेल. सत्य शोधून काढण्यासाठी युविकाला अनेक अडथळ्यांवर मात करावी लागणार आहे, त्यात डीजेचे सतत तिचा तिरस्कार करणे हा सर्वात मोठा अडथळा आहे. युविकाने ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्याचे पाहताच डीजे (माहिर पांधी) तिला मजुरीची आणि किचकट कामे देऊन तिच्या नाकी दम आणतो. ती ऑफिसात टिकू नये असाच त्याचा प्रयत्न आहे. पण, मि. सेनगुप्ताच्या रूपात तिला मोठा दिलासा मिळतो. महाजनांच्या ऑफिसमधून प्रत्येक जण मि. स

झाडांच्या वाढदिवसाला सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री समीर शेख साहेब

Image
झाडांच्या वाढदिवसाला सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री समीर शेख साहेब आणि अप्पर पोलीस अधिकारी श्री बापूसाहेब बांगर साहेब यांना टीम वसंतगड च्या वतीने आग्रहाचे निमंत्रण पत्रिका देण्यात आली.  त्यावेळी आपल्या SP साहेब यांनी टीम करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन गौरव उदगार काढले. आणि वाढदिसाच्या कार्यक्रम ला नक्कीच येणारं आहे असे आवर्जून सांगितले.

मुबई सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती

Image
मुबई सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमानं बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील पात्र गिरणी कामगारांना मुख्यमंत्री महोदय मा. एकनाथ शिंदेजींच्या प्रमुख उपस्थितीत घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व  उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी उपस्थित होते.

मुबई *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कोअर कमिटीची बैठक, मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली

Image
मुबई *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कोअर कमिटीची बैठक, मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे इतर नेतेमंडळीच्या उपस्थितीत झाली.* महाराष्ट्राच्या बदलत्या चालू घडा मोडी वर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कोअर कमिटीची बैठक, गरवारे क्लब हाऊस, वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, बसवराज पाटील, नसीम खान, सरचिटणीस देवानंद पवार, प्रवक्ते अतुल लोंढे आदि मान्यवर नेतेमंडळी उपस्थितीत संपन्न झाली. ▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

पाटण कोयना नवजा समिती आणि वन विभाग यांची सकारत्मक बैठक*

Image
*पाटण कोयना नवजा समिती आणि वन विभाग यांची सकारत्मक बैठक*        आज कोयना वन्यजीव कार्यालय राहण्यासाठी येथे नवजा जनवन समिती आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक व संरक्षण श्री गवारे साहेब आणि वनक्षेत्रपाल श्री अजित शिंदे साहेब आणि पाटणचे वनक्षेत्रपाल श्री शिशुपाल पवार यांच्या सोबत बैठक पार पडली यामध्ये प्रामुख्याने निसर्ग पर्यट नाचे व्यवस्थापननवजा समितीची च्या अधिकाराखाली यावे अशी प्रमुख मागणी नवजा समितीची होती त्यामध्ये चर्चा करताना असे ठरले की या अगोदर व्यवस्थापन समितीकडे द्यावे त्यासाठी लागणारा प्रस्ताव बनवण्यात आला नव्हता तो प्रस्ताव लवकरात लवकर बनवून त्याला मान्यता घेतली जाईल आणि त्यानंतर निसर्ग पर्यटनाचे व्यवस्थापन नवजा समितीकडे देण्यात येईल आणि त्याचा पाठपुरावा वन विभाग आणि समिती एकत्रितपणे करेल असे ठरले त्यानंतर त्याला लागणारा कालावधी जर तीन महिन्यापेक्षा जास्त झाला तर मात्र पुन्हा एकदा हा वाद होऊ शकतो त्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रस्ताव बाबत काय ठरले याची चर्चा करण्यासाठी वन क्षेत्र पाल यांच्या अधिकाराखाली बैठक घेतली जाईल असे ठरले

पुणे *पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.

Image
पुणे *पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. * महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री गणरायाची मनोभावे आरती केली. राज्यातील जनतेला उत्तम आयुरारोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, अशी प्रार्थना त्यांनी श्री गणरायाचरणी केली. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

Karad पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस पलटी

Image
Karad  पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस  पलटी होऊन भीषण अपघात झाला.  या अपघातात चालक व क्लिनर गंभीर जखमी झाला असून पंधरा ते वीस प्रवासी  जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.   गुरुवार दि.६  रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस  विजापूर ते सातारा जात होती.  या अपघातातून  तसेच १५ ते २० प्रवासी बचावले.     याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महामार्गावर शिवडे तालुका कराड गावचे हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर  विजापूर ते सातारा जाणारी एसटी बस पलटी झाली. या बसमधून सुमारे पंधरा ते वीस  प्रवासी प्रवास करत होते. अचानक बस पलटी झाल्याने प्रवासांना मार लागला. तसेच या अपघातात चालक व क्लीनर गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य केले. दरम्यान उंब्रज पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची पंचना

पुणे दगडूशेठ गणपती मंदिरात अतिरुद्र महायज्ञाला प्रारंभ**श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह १२५ ब्रह्मवृंदांचे पौरोहित्य*

Image
पुणे दगडूशेठ गणपती मंदिरात अतिरुद्र महायज्ञाला प्रारंभ* *श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह १२५ ब्रह्मवृंदांचे पौरोहित्य*   पुणे : महा सुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम, विष्णू सहस्त्रनाम अर्चना, रुद्र होम आणि गणेश याग यांसह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी व अकरा दिवसीय अतिरुद्र महायज्ञाला दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ झाला. जगाच्या कल्याणा करिता, महाराष्ट्र  सुजलाम सुफलाम व्हावा आणि आरोग्यसंपन्न समाजाकरीता एकाच वेळी १२५ ब्रह्मवृंद सहभागी होत, हा याग करीत आहेत. शनिवार, दिनांक १५ जुलै पर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरु आहेत.   श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अतिरुद्र महायज्ञ मंदिरात करण्यात येत आहे. राजू सांकला व रंजना सांकला यांच्या हस्ते संकल्प झाला. वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह १२५ ब्रह्मवृंद होम, विधी करीत आहेत. रुद्र होम, गणेश याग यांसह विविध अभिषेक असे धार्मिक विधी याअंतर्गत केले जात आहेत. गणपती मंदिरात सभामंडपात