Posts

Showing posts from September, 2023

कराड नगरपरिषद कराड *इंडियन स्वच्छता लीग, 2.0,मेगा वॉकेथॉन* "स्वच्छता पंधरवडा" व "स्वच्छता ही सेवा"

Image
कराड नगरपरिषद कराड  *इंडियन स्वच्छता लीग, 2.0,मेगा वॉकेथॉन*   "स्वच्छता पंधरवडा" व "स्वच्छता ही सेवा" या अभियान अंतर्गत कराड नगरपरिषद व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिन आज निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले .सकाळी 6.30 वाजता रॅलीची सुरवात सह्याद्री हॉस्पिटल- जुना कोयना पूल - शाहू चौक- दत्त चौक - चावडी चौक मार्गे कृष्णाघाट या ठिकाणी संपन्न झाली. सह्याद्री हॉस्पिटलच्या स्टाफ ने प्रीतिसंगम बागे समोर पथनाट्य सादर केले त्या मध्ये आजच्या काळात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. हल्ली प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या आजाराला सामोरे जावे लागते.हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे लोकांना हृदयविकारांबाबत जागरूक करणे आहे. हृदय रोग टाळण्यासाठी गरजेपेक्षा फास्ट फूड जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे बंद करायला हवे.भरपूर व्यायाम करावा.भरभर चालणे,धावणे, पोहणे, सायकल चालवने यासारखा व्यायाम करावा. ज्यांना

कृष्णा हॉस्पिटल येथील सभागृहात महाविजय २०२४ अंतर्गत " मेरी माटी मेरा देश " या उपक्रम संदर्भात बैठक घेण्यात आली

Image
कृष्णा हॉस्पिटल येथील सभागृहात महाविजय २०२४ अंतर्गत " मेरी माटी मेरा देश " या उपक्रम  संदर्भात बैठक घेण्यात आली .नंतर बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना अगामी येणाऱ्या लोकसभा , विधानसभा निवडणूकीसाठी बूथ रचना कशी असावी . या संदर्भात कराड दक्षिण चे नेते मा० डॉ . अतुलबाबा भोसले यांनी अतिशय सविस्तर असे मार्गदर्शन केले . याप्रसंगी ज्या बूथ अध्यक्षांनी उत्तम काम केले आहे अशा व्यक्तींचा शाल बुके देऊन सत्कार करण्यास आला . त्यामधे शेणोली गावचे क्रं२९० च्या बूथचे अध्यक्ष मा चंदुआप्पा पाटील यांचा कराड शहर बूथ क़ 127चे अध्यक्ष श्री . शैलेंद्र गोंदकर यांचा दक्षिणचे लाडके नेते डॉ . अतुलबाबा भोसले यांचे हस्ते शहर अध्यक्ष एकनाथ बागडी व मंडल अध्यक्ष श्री धनाजी काका पाटील यांचे उपस्थितीत शाल बुके देवून सत्कार करण्यात आला .क्रं२९० च्या बूथचे अध्यक्ष मा चंदुआप्पा पाटील यांचा व  श्री गोंदकर यांनी त्यांच्या 127नं बुथवर पक्षाचे सर्व उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवले आहेत . वॉर्डमधील लोकांच्या सुख दु:खात सामील होणे. वाढदिवस शुभेच्छा देणे , विविध योजना लोकांपर्यत पोहचवणे असे अनेकविध

कराड शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते गणपती आरती

Image
 कराड शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते गणपती आरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी निमित्ताने कराड शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी  शहरअध्यक्ष एकनाथ बागडी, सरचिटणीस प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, नगरसेवक श्री पेंढारकर, नगरसेवक सुहास जगताप, नगरसेवक ओमकार मुळे,उपाध्यक्ष मुकुंद चरेगावकर ,युवा नेते आशुभाऊ जाधव, नितीन शहा, शैलेश गोंदकर, विश्वनाथ फुटाणे, विशाल कुलकर्णी, उमेश शिंदे, रमेश मोहिते, दिलीप जाधव, रुपेंद्र कदम, ओंकार ढेरे, शरद साळुंखे, सौरभ शहा,जनाबाई जाधव, आपले गणेश मंडळ, गजानन नाट्यमंडळ, विनायक घेवदे गणेश मंडळ, जयहिंद गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून स्पर्धेचे आयोजन. संजीवनी विद्यामंदिर येथे शिक्षक दिन साजरा.

Image
दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून स्पर्धेचे आयोजन. संजीवनी विद्यामंदिर येथे शिक्षक दिन साजरा. सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क शेणोली ( ता. कराड) : शिक्षणातून चांगले संस्कार घ्या.आदर्शवादी जीवन जगल्यास समजात मान मिळतो.शालेय वयात चांगले वाईट समजून घेतले तर अडचणी निर्माण होत नाहीत असे मत संजीवनी विद्यामंदिर चे शिक्षक भाऊराव पोटकुले यांनी व्यक्त केले. ते संजीवनी विद्यामंदिर येथे आयोजित विविध बक्षीस समारंभ व शिक्षक दिनाच्या निमित्ताने बोलत होते.शाळेचे इयत्ता दहावी व ग्रामीण व कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांच्या वतीने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एस. निकम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्री पोटकुले म्हणाले,” शिक्षणातून चांगले संस्कार घ्या. चांगला विचार देण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करा. .मुख्याध्यापक व्ही.एस. निकम म्हणाले,” पूर्वीच्या काळी ची शिक्

कृष्णा हॉस्पिटल येथील सभागृहात महाविजय २०२४ अंतर्गत " मेरी माटी मेरा देश " या उपक्रम

Image
कृष्णा हॉस्पिटल येथील सभागृहात महाविजय २०२४ अंतर्गत " मेरी माटी मेरा देश " या उपक्रम  कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड  संदर्भात बैठक घेण्यात आली .नंतर बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना अगामी येणाऱ्या लोकसभा , विधानसभा निवडणूकीसाठी बूथ रचना कशी असावी . या संदर्भात कराड दक्षिण चे नेते मा० डॉ . अतुलबाबा भोसले यांनी अतिशय सविस्तर असे मार्गदर्शन केले . याप्रसंगी ज्या बूथ अध्यक्षांनी उत्तम काम केले आहे अशा व्यक्तींचा शाल बुके देऊन सत्कार करण्यास आला . त्यामधे शेणोली गावचे क्रं२९० च्या बूथचे अध्यक्ष मा चंदुआप्पा पाटील यांचा कराड शहर बूथ क़ 127चे अध्यक्ष श्री . शैलेंद्र गोंदकर यांचा दक्षिणचे लाडके नेते डॉ . अतुलबाबा भोसले यांचे हस्ते शहर अध्यक्ष एकनाथ बागडी व मंडल अध्यक्ष श्री धनाजी काका पाटील यांचे उपस्थितीत शाल बुके देवून सत्कार करण्यात आला . श्री गोंदकर यांनी त्यांच्या 127नं बुथवर पक्षाचे सर्व उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवले आहेत . वॉर्डमधील लोकांच्या सुख दु:खात सामील होणे. वाढदिवस शुभेच्छा देणे , विविध योजना लोकांपर्यत पोहचवणे असे अनेकविध उपक्र

कराड *इंडियन स्वच्छता लीग 2.0, स्वच्छता महाअभियान*

Image
 कराड *इंडियन स्वच्छता लीग 2.0, स्वच्छता महाअभियान*   कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड इंडियन स्वच्छता लीग 2.0 आणि स्वच्छतेचा पंधरावडा च्या ‘युथ वर्सेस गार्बेज’या थीम अंतर्गत कृष्णा नदी पात्रात कराड नगर परिषदेतर्फे प्रभारी मुख्याधिकारी श्री.संजय गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता महाअभियान घेण्यात आले. या वेळी जलनिस्सारण अभियंता श्री. अशोक पवार  यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य अभियंता श्री. आर.डी.भालदार यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन या अभियानास सुरुवात केली. इंडियन स्वच्छता लीग २.० ही स्पर्धा स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांसाठी तरुणांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग या अभियानात देशातील ३०८५ शहरांचा सहभाग असून महाराष्ट्रातील एकूण ४११ शहरांचा यात समावेश आहे.आपल्या कराड शहराची स्वच्छता ही उत्तम असली पाहिजे.आणि ती कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न कराड नगरपालिका करत असते. या महाअभियानासाठी कराड शहराने  "कराड सुपर जायंट्स" या नावाने स्पर्धेत स

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीच्या परिस्थितीचा घेतला आढावा*

Image
कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीच्या परिस्थितीचा घेतला आढावा*    *पुसेसावळी:* पुसेसावळी येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीस भेट दिली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच मंडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष झाकीर पठाण, फारूक पटवेकर, पुसेसावळी गावचे सुरेशबापू पाटील, माजी सरपंच दत्तात्रय रुद्रके, सोसायटी चेअरमन रवी कदम, तंटा मुक्ती अध्यक्ष अरविंद लवळे, माजी सरपंच सुरेश पाटील, मंडल अधिकारी, पोलीस पाटील सुरज दळवी, उपसरपंच विजय कदम आदिसह दोन्ही समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांशी सं
बातमी प्रसिद्धीसाठी *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीच्या परिस्थितीचा घेतला आढावा*   *पुसेसावळी:* पुसेसावळी येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीस भेट दिली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच मंडल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष झाकीर पठाण, फारूक पटवेकर, पुसेसावळी गावचे सुरेशबापू पाटील, माजी सरपंच दत्तात्रय रुद्रके, सोसायटी चेअरमन रवी कदम, तंटा मुक्ती अध्यक्ष अरविंद लवळे, माजी सरपंच सुरेश पाटील, मंडल अधिकारी, पोलीस पाटील सुरज दळवी, उपसरपंच विजय कदम आदिसह दोन्ही समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज

कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड प्रशासनाची विनंती मान्य करत शनिवारी निघणारा मूक मोर्चा रद्द*

*प्रशासनाची विनंती मान्य करत शनिवारी निघणारा मूक मोर्चा रद्द* सातारा दि.15  पुसेसावळी ता. खटाव येथील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मूक  मोर्चा  प्रशासनाने केलेल्या विनंती नुसार रद्द करण्याचा निर्णय संबंधित सामाजिक संघटनांनी घेतला आहे. पुसेसावळी येथे घटनेच्या निषेधार्थ अनेक सामाजिक संघटनानी मुक मोर्चा काढण्याची भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समिर शेख यांनी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन गणेशोत्सवाचा सण तोंडावर असल्याने कोणत्याही प्रकारचे सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये. यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. संघटनांनी मोर्चा काढू नये, अशी विनंती केली होती. या विनंतीला  सकारात्मक प्रतिसाद देत संघटनांनी उद्या शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मूक मोर्चा रद्द केला आहे.

' *कराड दक्षिण' मध्ये काँग्रेसची निघणार गावागावात जनसंवाद पदयात्रा*

Image
कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड ' *कराड दक्षिण' मध्ये काँग्रेसची निघणार गावागावात जनसंवाद पदयात्रा*  कराड: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा निघाली आहे. उद्यापासून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात जनसंवाद पदयात्रेला सुरुवात होत आहे. "यात्रा संवादाची, बांधिलकी लोक भावनेची" असा गजर करत काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी जाणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात संपन्न होत आहे. त्यानुसार आ. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मध्ये १६ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यावेळी कराड दक्षिणच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यां

खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुचवलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या कराड व पाटण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामावरील स्थगिती

Image
     खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुचवलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या कराड व पाटण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामावरील स्थगिती राज्य शासनाकडून उठवण्यात आली आहे. त्यानुसार कराड व पाटण तालुक्यातील १६ कामांसाठी सुमारे ५ कोटी ८१ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित असणा-या सदर कामांचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.       सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या जलसंधारणाच्या कामासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला होता. मात्र संबंधित कामांवर स्थगिती आल्याने ही कामे प्रलंबित राहीली होती. आता राज्य शासनाने कामावरील स्थगिती उठवल्याने त्या कामांना गती प्राप्त झाली आहे.       यामध्ये कराड तालुक्यातील वहागाव व तळबीड येथे सिमेंट कॉंक्रिट बंधारा बांधणे ह्या दोन कामासाठी ५९ लक्ष ५० हजार ३६३ रूपये निधी मंजूर झाला आहे. अंतवडी (खिंड शिवार), अंतवडी (पोळ खडी शिवार), अंतवडी (रत्नकर शिवार), अंतवडी (टेक शिवार), अंतवडी (नाईकबा मंदीर शेजारी), डिचोली बाबरमाची (विठ्ठल कोळेकर विहिर), आबईचीवाडी येथील

सातारा स्वतःच्या चुकीचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्याची विरोधकांना सवयच : शिक्षक नेते बलवंत पाटील

Image
सातारा स्वतःच्या चुकीचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्याची विरोधकांना सवयच : शिक्षक नेते बलवंत पाटील  शिक्षक बँकेच्या रविवारच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर बलवंत पाटील यांची विरोधकांवर टीका सातारा,(प्रतिनिधी): अनावश्यक नोकर भरती करून यापूर्वीच्या संचालक मंडळातील काही जबाबदार घटकांनी बेजबाबदारपणा केला, मात्र न्यायालयाच्या आदेशाने कमी केलेल्या २६ पैकी २५ कर्मचाऱ्यांना त्यांनी परत कामावर हजर करून घेतले व त्यामुळे संबंधित कर्मचारी कामावर हजर नसताना १८ महीन्याचा पगार त्यांना देण्यात आला त्यामुळे बँकेला कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला, त्याचा बोजा सभासदांवरच पडला, मात्र स्वतः केलेल्या चुकांचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्याची विरोधकांना सवयच आहे, अशी खोचक प्रतिक्रिया शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व शिक्षक नेते बलवंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.  रविवार दि.१० सप्टेंबर रोजी शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा साताऱ्यात होत असून त्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या संचालक मंडळातील काही जबाबदार व्यक्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.     

वडगांव ज.स्वा.ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकास आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन.

Image
*वडगांव ज.स्वा.ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकास आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन. * ब्रिटिश सरकार विरोधात निघालेल्या वडूज तहसील कार्यालयावरील मोर्चात जयराम स्वामी वडगाव, पुसेसावळी आणि उंचीठाणे येथील 9 क्रांतीकारकांना हौतात्म्य आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडगाव ज.स्वा. येथील हुतात्मा स्मारकास प्रतिवर्षीप्रमाणे *राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.आमदार बाळासाहेब पाटील* यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. प्रारंभी सर्व हुतात्म्यांच्या निवासस्थानी आमदार बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, खटाव तालूका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रदादा पवार, प्रा.बंडा गोडसे, सी.एम.पाटील, सुरेश पाटील, सुहास पिसाळ, अनिल माने, सौ.सुनीता मगर, संभाजी थोरात, प्रांताधिकारी सौ.उज्वला गाडेकर, तहसीलदार प्रशांत जाधव, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील,

सातार्‍यात लवकरच पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळाएस. एम. देशमुख : अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद सातार्‍याला हे परिषदेसाठीही भूषणावह

Image
सातार्‍यात लवकरच पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा एस. एम. देशमुख : अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद सातार्‍याला हे परिषदेसाठीही भूषणावह सातारा : मराठी पत्रकार परिषद ही शतक महोत्सव गाठणारी  संघटना आहे. पत्रकारितेसाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी पत्रकार संघटना टिकली पाहिजे. संघटनात्मक कामगिरीमुळे राज्यात पत्रकारांची मोठी ताकद निर्माण झाली आहे. पत्रकारांसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा घ्यावी, असा आग्रह राज्यातील डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा आहे. मात्र सातार्‍यातील पत्रकार उत्साहाने काम करत असून ते आपुलकीने परिषदेकडे पाहतात. त्यामुळे ही कार्यशाळा सातार्‍यातच घेतली जाईल. पुणे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद सातार्‍याला व हरीष पाटणे यांना मिळाले हे परिषदेसाठी भूषणावह आहे, असे गौरवोद्गार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी काढले.   मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने एस. एम. देशमुख सातार्‍यात होते. यावेळी डिजिटल मिडिया परिषदेच्यावतीने राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून एस. एम. देशमुख व पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्य

*मराठा आंदोलकांवरच्या हल्ल्याची जबाबदारी घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण*

Image
 *मराठा आंदोलकांवरच्या हल्ल्याची जबाबदारी घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण*   *मुंबई:* जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा  निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यापुढे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे. मराठा आरक्षण देण्याबाबत भाजप ने कायमच पोकळ घोषणा आतापर्यंत केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प