Posts

Showing posts from November, 2023

कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर*

Image
 *कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर* माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याने शासनाकडून निधी मंजूर   *कराड:* येथील एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारिकरणांबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते कि, महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. या आ. चव्हाण यांच्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षते

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला**खेड-आळंदी मतदारसंघातील कामांचा आढावा

Image
दि. २८ नोव्हेंबर २०२३  *उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला* *खेड-आळंदी मतदारसंघातील कामांचा आढावा* *तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर*  *रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे* *- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश* *चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना* मुंबई, दि.२८: राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के.एच. ग

दिल्ली कराड वार्ता न्युज

Image
दिल्ली कराड वार्ता न्युज  भारत गौरव पुरस्काराने प्रा पै अमोल साठे सन्मानित  नवी दिल्ली - दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड (Gov. Of Delhi ) आणी कालीरमण फाउंडेशन यांच्यावतीने हरितक्रांतीचे जनक सर छोटू राम यांचे स्मृती प्रित्यर्थ विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भारतातील 30 लोकांना भारत गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. .           इंडियन इस्लामिक कल्चरल  सेंटर, लोधी रोड नवी दिल्ली या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा,  खासदार जयंत चौधरी, सौरभ भारद्वाज आरोग्य मंत्री दिल्ली सरकार, माजी विधानसभा अध्यक्ष डॉ योगानंद शास्त्री, अध्यक्ष परदीप अग्रवाल दिल्ली पॅरा मेडिकल बोर्ड, उपमहापौर डॉ. आले इक्बाल तसेच u प चे DSP हिंदकेसरी जगदीश कालीरमण यांची प्रमुख उपस्थिती होती.  भारतातून अनेक महान व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये कला क्रीडा तंत्रज्ञान शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय अशा महान व्यक्तींना भारत गौरव पुरस्कार देऊन गौरविण