Posts

Showing posts from May, 2023

*लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे ६ जून रोजी प्रकाशन

Image
*लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे ६ जून रोजी प्रकाशन* *- राजभवन येथे ६ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता महामहीम राज्यपाल मा. रमेशजी बैस यांच्या हस्ते प्रकाशन* *- मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रमुख उपस्थिती* *- ज्येष्ठ पत्रकार-संपादक मधुकर भावे चरित्रग्रंथाचे लेखक* *मुंबई :* महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून देणाऱ्या 'दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई' चरित्रग्रंथाचे प्रकाशन मंगळवार, ६ जून २०२३ रोजी होत आहे. महामहीम राज्यपाल मा. रमेशजी बैस यांच्या शुभहस्ते आणि मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राजभवन येथे सायंकाळी ५ वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दिली.  महाराष्ट्राच्या गृह, सार्वजनिक बांधकाम, कृषी, शिक्षण आदी महत्त्वाच्या ख

लोकराजा खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांना,लोकराजा उपाधी का मिळाली

Image
लोकराजा खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांना,लोकराजा उपाधी का मिळाली याचे उत्तम उदाहरण म्हणजे,आज  उर्दू शाळा कराड समोरील दरवेशी सामाज वस्ती मध्ये,एक लग्न समारंभ होता,आणि तेथील माझे परिचयाचा एक छोटा कार्यकर्ता,ज्याचा व्यवसाय हा मासेमारी आहे,त्याने मला विनंती केली की साहेब,माझे बंधूंचे लगणाला येतील का,मी साहेबांना ते हजर नसताना,फक्त पत्रिका दिली,पण साहेब तेवढी निमंत्रण पत्रिका पाहून आज सहा वाजता,लग्नास हजर राहिले,साहेब खरेच आपण लोकराजा आहात,याचा प्रत्यय पदोपदी येतो आहे ,आम्हाला आपण खासदार म्हणून मिळाला,हे आमचे परम भाग्य आहे,आपणास मानाचा मुजरा,🙏🙏🙏🙏🙏

मलकापूर नगरपरिषद् हद्‌दीतील आगाशिवनगर, आझाद कॉलनी, Z.P कॉलनी, सर्वोदय सोसायटी येथे वेळेत कचरा गाडी येत नाही

Image
मलकापूर नगरपरिषद् हद्‌दीतील आगाशिवनगर, आझाद कॉलनी, Z.P कॉलनी, सर्वोदय सोसायटी येथे वेळेत कचरा गाडी येत नाही

मलकापूर नगरपरिषद् हद्‌दीतील आगाशिवनगर, आझाद कॉलनी, Z.P कॉलनी, सर्वोदय सोसायटी येथे वेळेत कचरा गाडी येत नाही

Image
 - मलकापूर नगरपरिषद् हद्‌दीतील आगाशिवनगर, आझाद कॉलनी, Z.P कॉलनी, सर्वोदय सोसायटी येथे वेळेत कचरा गाडी येत नाही वरील ठिकाणी उल्लेख केलेल्या विभागामध्ये *कचरा संकलन करण्यासाठी सकाळी 7 ते 9  येणाऱ्या गाड्या सकाळी या वेळेत येणेच्या बंद झाल्या असून त्या दुपारी अवेळी येतात.* या विभागातील लोक नोकरी व्यवसायानिमित्त सकाळी बाहेर पडत असतात,त्यामुळे दुपारच्या वेळी कचरा टाकण्यास नागरीकांची मोठी गैरसोय होते. तरी या बाबत योग्य निर्णय घेवून योग्य ती कार्यवाही करावी व *सकाळी 7 ते 9 या वेळेत कचरा गाड्या (घंटा गाडी) पुर्वत सुरू कराव्यात हि विनंती…* आज दि.31/5/2023  रोजी मा.मुख्याधिकारीसो मलकापूर नगरपरिषद  सर यांना निवेदन दिले..

महाराष्ट्रतील आपत्तीच्या परिस्थितीत विशेषतः पूर, वादळ या आपत्तीमध्ये एसडीआरएफ, #NDRF बरोबरीनेच लष्कर, नौदल, हवाई दलांनी वेळोवेळी विशेष सहकार्य करीत आहेत. त्यांनी उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री - एकनाथ संभाजी शिंदे यांनी मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत कौतुक केले. राज्याचे पोलिस दलही अशा आपत्तीच्यावेळी प्रतिसाद देण्यात सर्वात पुढे राहत असल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

Image
महाराष्ट्रतील आपत्तीच्या परिस्थितीत विशेषतः पूर, वादळ या आपत्तीमध्ये एसडीआरएफ, #NDRF बरोबरीनेच लष्कर, नौदल, हवाई दलांनी वेळोवेळी विशेष सहकार्य करीत आहेत. त्यांनी उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री - एकनाथ संभाजी शिंदे यांनी मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत कौतुक केले. राज्याचे पोलिस दलही अशा आपत्तीच्यावेळी प्रतिसाद देण्यात सर्वात पुढे राहत असल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.  लष्कर, नौदल, हवाई, तटरक्षक दल, एनडीआरएफ, रेल्वे यांनीही पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व ती तयारी केली आहे. एनडीआरएफची १८, एसडीआरएफची सात पथके, नौदलाची १० पथके, तटरक्षक दलाची ६ पथके, हवाई दलाची मिग ७० हेलिकॉप्टर्स, तसेच या सर्वच पथकांकडे बोटी,उपकरणे अनुषंगिक गोष्टींची सज्जता ठेवण्यात आली आहे. - *मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे*

मौजे पोतले ता.कराड येथे कै. चि.शरद पाटील यांच्या स्मरणार्थ कै.चि.शरद पाटील युथ फाऊंडेशन तर्फे आयोजित

Image
*मौजे पोतले ता.कराड येथे कै. चि.शरद पाटील यांच्या स्मरणार्थ कै.चि.शरद पाटील युथ फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत बजाज अलियाजची कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी रू १० लाख रुपयांची विमा पॉलिसी ५०%सवलती मध्ये फक्त २००/- रु मध्ये करण्यात आली. या कार्यक्रमास श्रीमती रेखा दुधभाते (सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड ), तसेच भारतीय डाक विभागाचे श्री धनेश यादव (डाक निरीक्षक कराड पुर्व),श्री महेश माळी (डाक आवेक्षक कराड), श्री विशाल कुंभार (बी पी एम पोतले),श्री दिलीप राऊत (बी  पी एम तारुख),श्री प्रकाश पाखले(बी पी एम घारेवाडी) श्री अविनाश कदम (डाक पाल हेळगाव)  व शरद पाटील मित्र परिवार उपस्थित होते. यावेळी गावातील सुमारे १५० विमाधारकांनी याचा लाभ घेतला. फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. फाऊंडेशन च्या वतीने यापुढेही गावातील सामाजिक,शैक्षणिक, तसेच गोर- गरीब कुटुंबांना सहकार्य करण्यात येईल.विविध उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.* 🙏🙏 *कै.चि.शरद पाटील युथ फाऊंडेशन

सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू - छगन भुजबळ**महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे - विरोधी पक्षनेते अजित पवार*

Image
*सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू - छगन भुजबळ* *महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे - विरोधी पक्षनेते अजित पवार*  *विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट* *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी* मुंबई, दि. ३१ मे - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आज भेट घेऊन केली.  दरम्यान मुंबई पोलिस आयुक्तालया

सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ मालिकेत, तारा आपल्या भावाच्या शस्त्रक्रियेत डॉ. ध्रुवला मदत करून, डॉक्टर बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार

Image
सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ मालिकेत, तारा आपल्या भावाच्या शस्त्रक्रियेत डॉ. ध्रुवला मदत करून, डॉक्टर बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार का? सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ ही एक सुंदर प्रेमकथा आहे, जी २१ व्या शतकातील ध्रुव (ईशान धवन) आणि १७ व्या शतकातील ताराप्रिया (रिया शर्मा) यांच्यातील विलक्षण प्रेम दर्शवते. या मालिकेचे आकर्षक कथानक, मंत्रमुग्ध करणारा साऊंडट्रॅक आणि ध्रुव व तारा यांच्यात फुलणारा रोमान्स यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ताराने आपल्या भावाच्या म्हणजे महावीरच्या (कृष्णा भारद्वाज) शस्त्रक्रियेत आपल्याला मदत करावी असा आग्रह करणारा ध्रुव प्रेक्षकांना आगामी भागांत दिसेल. तर, तारा ‘हे पाऊल उचलावे का’ या दुविधेत दिसेल. घटनांच्या नाट्यमय वळणावर, ताराला आपली मदतनीस बनवण्यावरून ध्रुव राज सभेसमोर वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. एकंदरित, त्या दोघांच्या अडचणीत भर पडणार आहे, कारण राज सभेतील सर्वजण या कल्पनेला विरोध करत आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तलयासमोर राष्ट्रवादीची निदर्शने

Image
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज  मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी केली  विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी या भेटीवेळी उपस्थित होते

*'चला या ...मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया';मोहीमेची सुरुवात आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत...*

Image
*'चला या ...मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया';मोहीमेची सुरुवात आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत...* *सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची ५० हजार पुस्तिका काढून लोकांपर्यंत पोचवणार...* मुंबई दि. २९ मे - सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा निकाल सोप्या भाषेत समजावून सांगण्याची मोहीम माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आजपासून सुरू केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने 'चला या... मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया' या टॅगलाईनखाली जितेंद्र आव्हाड यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहीमेची सुरुवात केली.  यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सोप्या भाषेत निकालाचे विश्लेषण करून सांगितले. शिवाय व्हीप कुणाचा लागू होतो आणि हे सरकार कसे असंविधानिक आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचे सांगितले. मनातील शंकाही यावेळी विचारण्यात आल्या त्याला सोप्या भाषेत जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. आपल्याला ही लढाई लढावी लागेल ती लढायला आपण सज्ज झाले प

कराड येथे *बळीराजा शेतकरी संघटना* यांची कार्यकारणी बैठक संपन्न झाली असून सदर बैठकीमध्ये नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्ती निवडी करण्यात आल्या आहेत. त्या खालील प्रमाणे

Image
कराड येथे *बळीराजा शेतकरी संघटना* यांची कार्यकारणी बैठक संपन्न झाली असून सदर बैठकीमध्ये नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्ती निवडी करण्यात आल्या आहेत. त्या खालील प्रमाणे १) *श्री पंजाबराव पाटील* बळीराजा शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष २) श्री नितीन पाटील बळीराजा शेतकरी संघटना प्रदेश आध्यक्ष  ३)श्री ज्ञानेश्वर जवळेकर बळीराजा शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष ४)श्री चंद्रकांत यादव बळीराजा शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष ५)श्री गणेश शेवाळे बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष ६)श्री किसनराव खोचरे बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ७)श्री सुनील कोळी बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सातारा ८)श्री संजय घाडगे बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सातारा ९) पोपट जाधव बळीराजा शेतकरी संघटना कराड तालुका अध्यक्ष १०) अविनाश फुके बळीराजा शेतकरी संघटना कराड तालुका कार्याध्यक्ष ११) अरुण चव्हाण  बळीराजा शेतकरी संघटना युवा अध्यक्ष कराड १२) नितीन शिंदे बळीराजा शेतकरी संघटना युवा उपाध्यक्ष कराड १३) श्रीमती मीनाताई पवार बळीराजा शेतकरी संघटना कराड महिला अ

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-* *जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी*

Image
*पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-*  *जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी* सातारा दि. 28 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि.23 जून 2023  या कालावधीत सातारा जिल्हयामधुन मार्गक्रमण करणार आहे. हा  सोहळा शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधाचे  नियोजन करुन  हा आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.       सातारा जिल्हयातील निरा नदी ते साधुबुवाचा ओढा या पालखी मार्गाची, पालखी मार्गावरील विसावा, दुपारचे भोजन स्थळ, पालखी तळ याचा पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  ज्ञानेश्वर खिलारी , पोलीस अधिक्षक समीर शेख,राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे संजय कदम आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. जयवंशी म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज,  रस्ते, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून

कराड येथे मंगळवारी स्त्रीशक्ती समाधान शिबिर

कराड येथे मंगळवारी स्त्रीशक्ती समाधान शिबिर कराड, दि.28: महिला व बाल विकास विभागाच्या वतीने कराड तालुक्यासाठी दि.30 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर बचत भवन (दैत्य निवारणी मंदिर शेजारी,) या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. कराड तालुक्यातील महिलांकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. कराड तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुप्रिया पवार व नागेश ठोंबरे यांनी केले आहे.

कराड तहसील कार्यालयातील सेतूची सेवा पुन्हा सुरळीत चालू*

Image
*कराड तहसील कार्यालयातील सेतूची सेवा पुन्हा सुरळीत चालू* कराड तहसील कार्यालयातील सेतुची सेवा काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होती ती सेवा पुन्हा सुरळीत चालू झाली आहे. शाळा व कॉलेज सुरूहोणार असल्याने विद्यार्थ्यांना अडमिशनसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले नॉन क्रिमीलर, उत्पनाचा दाखला,जात पडताळणी, चारित्र्य पडताळणी,रहिवाशी दाखला काढून घेण्यात यावे अशा मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांना व पालकांना करण्यात आले असून दाखले काढण्यासाठी  सेतू कार्यालयाशी संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा

*कराडच्या आजी माजी डिवायएसपींनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांची घेतली भेट*

Image
 *कराडच्या आजी माजी डिवायएसपींनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांची घेतली भेट*   *कराड :* कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्त झालेले श्री. अमोल ठाकूर यांनी व आधीचे डि.वाय.एस.पीं. डॉ रणजित पाटील या दोघांनीही आज कराड दक्षिणचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नवनियुक्त डि.वाय.एस.पीं.चे स्वागत केले. तसेच मावळते डि.वाय.एस.पीं. डॉ रणजित पाटील यांनी कराड विभागात आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक करीत त्यांचे धन्यवाद करीत सत्कार केला. आजी माजी डि.वाय.एस.पीं.यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन कराड तालुक्यातील परिस्थिती बाबत चर्चा केली. यावेळी नवीन डि.वाय.एस.पीं.ना सहकार्य कायमच राहील असे आ. चव्हाण यांनी आश्वासित केले.

.कोरेगांव येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच हिंद नगरवाचनालयाचे, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.*

Image
* .कोरेगांव येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच हिंद नगरवाचनालयाचे, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.* यावेळी अर्थसंकल्प अनुदान मार्च २०२१ अंतर्गत शिरगांव पेरले पाडळी वाठार सुर्ली रहिमतपूर प्र.जि.मा. ३९ कि.मी. २८/६०० ते ३३/०५० चे रुंदीकरण व सुधारणा करणे (भाग- सुर्ली ते रहिमतपूर) रक्कम रु.६.०० कोटी, ब्रम्हपूरी अंगापूर फत्त्यापूर वेणेगांव कालगांव रस्ता प्र.जि.मा. ११० कि.मी ०/००० ते ५/४०० चे रुंदीकरण व सुधारणा करणे (भाग- रहिमतपूर ते ब्रम्हपूरी) रक्कम रु.८.०० कोटी या कामांचे भूमिपूजन, आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत नगरपरिषदेस घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी दोन घंटागाड्यांचे लोकार्पण व जिल्हा नियोजन विकास निधीतून मंडलअधिकारी व तलाठी कार्यालय बांधकाम करणे या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सातारा जिल्हा रा

*रहिमतपूर ता.कोरेगांव येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ

Image
*रहिमतपूर ता.कोरेगांव येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच हिंद नगरवाचनालयाचे, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.* यावेळी अर्थसंकल्प अनुदान मार्च २०२१ अंतर्गत शिरगांव पेरले पाडळी वाठार सुर्ली रहिमतपूर प्र.जि.मा. ३९ कि.मी. २८/६०० ते ३३/०५० चे रुंदीकरण व सुधारणा करणे (भाग- सुर्ली ते रहिमतपूर) रक्कम रु.६.०० कोटी, ब्रम्हपूरी अंगापूर फत्त्यापूर वेणेगांव कालगांव रस्ता प्र.जि.मा. ११० कि.मी ०/००० ते ५/४०० चे रुंदीकरण व सुधारणा करणे (भाग- रहिमतपूर ते ब्रम्हपूरी) रक्कम रु.८.०० कोटी या कामांचे भूमिपूजन, आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत नगरपरिषदेस घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी दोन घंटागाड्यांचे लोकार्पण व जिल्हा नियोजन विकास निधीतून मंडलअधिकारी व तलाठी कार्यालय बांधकाम करणे या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याप्

महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा,ठाणे उत्कृष्ट संसदपटू नामदार श्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या

Image
*महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा,ठाणे उत्कृष्ट संसदपटू नामदार श्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तारळेभागातील कळंबे डफळवाडी रस्ता 30 लाख रुपये, जळव ते जिमणवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी साकव पुल 70 लाख रुपये, बामणेवाडी जांभे रस्ता 20 लाख रुपये, जळव अंतर्गत रस्ता 15 लाख रुपये, मरळोशी अंतर्गत रस्ता 20 लाख रुपये, मरळोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता 10 लाख रुपये, शिवपुरी ढोरोशी 20 लाख रुपये, सुंदरनगर अंतर्गत रस्ता 25 लाख रुपये, आंबळे आवर्डे रस्ता सुधारणा करणे 95 लाख रुपये, आंबळे पद्मावती मंदिर रस्ता 15 लाख रुपये, आंबळे अंतर्गत रस्ता 10 लाख रुपये असे जवळपास 3 कोटी 20 लाख रुपये विविध कामांवर मंजूर करण्यात आले होते या कामांचा भुमीपुजन सोहळा आज तारळेविभागातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्या त्या गावातील सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे चेरमन व्हाईसचेरमन,संचालक मंडळ ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला*

*मौजे साप.ता.कोरेगांव येथे नव्याने मंजूर झालेल्या मंडलाअधिकारी कार्यालयाचे व नवीन जागेत तलाठी कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी सहकार व पणन पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.*

Image
*मौजे साप.ता.कोरेगांव येथे नव्याने मंजूर  झालेल्या मंडलाअधिकारी कार्यालयाचे व नवीन जागेत तलाठी कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी सहकार व पणन पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.* सदर मंडलाधिकार्यालयाचा उपयोग साप गावसह वेळू, पिंपरी, बेलेवाडी, पवारवाडी आदी गावांना होणार असून, या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळेल असा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संभाजीरव गायकवाड, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, काकासो गायकवाड, राहुल निकम, ननावरे सर, वसंतराव कणसे, दुर्योधन निकम, विष्णू गायकवाड, सरपंच सुरेंद्र कांबळे, उपसरपंच किरण जाधव, दिलीप कदम, दिलीप पवार, जालिंदर कदम, घनश्याम कदम, इंद्रोजीराव कदम, उत्तमराव जाधव, विजयराव जाधव, संभाजी जाधव, रामचंद्र जाधव, राजेंद्र गायकवाड, अमर शेडगे, सुखदेव कदम तसेच साप, वेळू, पिंपरी, बेलेवाडी, पवारवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

युवापिढीत उद्योजकतेची भावना रुजविण्याची गरज : डॉ. पंडित विद्यासागर

Image
युवापिढीत उद्योजकतेची भावना रुजविण्याची गरज : डॉ. पंडित विद्यासागर कृष्णा विश्व विद्यापीठात राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेस प्रारंभ; देशभरातून ४०० जणांचा सहभाग कराड, ता. २० : भारताने विज्ञान-तंत्रज्ञानाचे धोरण स्वीकारल्याने भारताचा विकास होऊ शकला. येत्या काळात याच धोरणाला पुढे नेत युवापिढीत उद्योजकतेची भावना रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. कृष्णा विश्व विद्यापीठ संलग्न कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा विद्यापीठात ‘जैवतंत्रज्ञान विकास’ या विषयावर आधारित दोनदिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रामीण आणि शहरी भारतातील विद्यार्थ्यांसाठी उद्योग - अकादमी संमेलन’ या शीर्षकाखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन डॉ. विद्यासाग

कराड येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

Image
कराड  येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. कराड येथील प्रशासकीय इमारतीत लाच घेण्याचे प्रकार आता सर्रास समोर येवू लागले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे काम हे आता पैसे दिल्याशिवाय होत नसल्याची भावना आता लोकांच्यात निर्माण होवू लागली आहे. आज केलेल्या कारवाईत रामचंद्र श्रीरंग पाटील (वय - 70 वर्षे, नोकरी - लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत आ फीस कराड) व दिनकर रामचंद्र ठोंबरे (वय- 70 वर्षे, नोकरी- लिपीक, भूसंपादन शाखा, प्रांत फीस कराड) या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघाकरिता प्रत्येकी 10 हजार रूपयांची मागणी करून असे 20 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात सापडले. येरवळे (ता. कराड) गावच्या नऊ शेतकरी यांचेकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावा प्रतिज्ञापत्र घेतलेले होते. त्या प्रतिज्ञापत्रा मूल्यांकन प्रक्रिये बाबत पाठपुरावा करण्याकरीता तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कराड कार्यालय येथे गेले असता, त्यांना आरोपी लोकसेवक एक व दोन यांनी मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याकरि

नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे

Image
नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे                                                                                                              जिल्हाधिकारी सातारा दि. 19 : सातारा जिल्ह्यातील ज्या नागरिकांची आधार कार्ड तयार होऊन दहा वर्ष पूर्ण झाली आहेत अशा नागरिकांनी आपल्या आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आधार विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.  सातारा जिल्ह्यामध्ये आधार अद्ययावतीकरण करण्याची मोहिम वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी याबाबत वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत वितरीत केलेल्या 93 आणि महिला व बालविकास विभागाच्या 56 आधार केंद्र चालकांचा आढावा घेण्यात आला असून त्यांना शिबिरांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने त्यामध्ये अनेक बदल होतात जसे पत्ता, नागरिकांचे बोटांची ठसे, नावामध्ये दुरुस्त्या, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ. भारतीय विशेष ओळख प्राधिकरण

वाण्याचीवाडी ता.कराड ग्रामपंचायतीच्या

Image
*वाण्याचीवाडी ता.कराड ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री  माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती पॅनलचे उमेदवार शरद किसन चव्हाण हे लोकनियुक्त सरपंच तसेच सतीश हणमंत पवार हे सदस्यपदी बहुमताने विजयी झाले, याबद्दल त्यांनी ग्रामस्थांसमवेत आमदार बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली, यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.*  याप्रसंगी शिवाजी सुतार, प्रमोद उमरदंड, शंकर धस, संजय चव्हाण, अनंत सुतार, राहुल जाधव, सचिन मोरे,  भानुदास साळुंखे, सचिन साळुंखे, बबन साळुंखे, गनिबा फकीर, मकबूल फकीर, महादेव चव्हाण, सुदाम चव्हाण, विजय चव्हाण, सुरेश निकम, संतोष निकम, लक्ष्मण साळुंखे, शंकर साळुंखे, भानुदास सावंत, विजय पवार, निलेश पवार, प्रकाश चव्हाण, सदाशिव चव्हाण, हणमंत माने, वसंत चव्हाण, अनिल खोत, मधुकर खोत, उदय धस,  विशाल चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

पावसाळ्यापुर्वी नदीतीरावरील खाजगी उपसा सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत आवाहन

Image
पावसाळ्यापुर्वी नदीतीरावरील खाजगी उपसा सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत आवाहन   सातारा दि.18:   कोयना, तारळी, उत्तरमांड, वांग, उत्तरवांग नद्या तसेच या नद्यावरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, व महिंद चाफळ चाळकेवाडी लघू पाटबंधारे तलाव इत्यादी ठिकाणी यापूर्वी अतिवृष्टीने उदभवलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांच्या पंपाचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेले आहे.  यंदाचा  पावसाळा सुरु होण्यापूर्वी खाजगी उपसा सिंचन योजनेचे पंप शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वखर्चाने सुरक्षित स्थळी तात्पुरत्या स्वरुपात हलवणेत यावेत, असे आवाहन उप कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी केले आहे.  पावसाळ्यात शेतकऱ्याच्या पंपाचे नुकसान झाल्यास त्यांची जबाबदारी शेतकऱ्यांची असेल  त्यास पाटबंधारे कार्यालय जबाबदार राहणार नाही असे कोयना सिंचन विभागाने प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे. 000

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाचा हातमाग तोडून तिच्या आयुष्यात उत्पात करणे चालू ठेवले आहे दिलीपने!

Image
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाचा हातमाग तोडून तिच्या आयुष्यात उत्पात करणे चालू ठेवले आहे दिलीपने! सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) या अत्यंत कणखर आणि स्वतंत्र स्त्रीची कहाणी आहे, जी आपल्या धडाडीने आणि जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोनाने सर्वांना जिंकून घेते. सिंगल मदर असलेली पुष्पा केवळ आपल्या मुलांचा सांभाळ करत नाही, तर स्वतःच्या स्वप्नांचा देखील पाठपुरावा करते. आपल्या माजी-पतीच्या (जयेश मोरे) धूर्त करस्थानांना तोंड देण्यासकट अनेक आव्हाने तिने पेलली आहेत आणि नव्या उमेदीने ती भविष्याला सामोरी जात आहे. स्वतः बोर्डाची परीक्षा देणे असो किंवा आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जन असो, ती डगमगत नाही.