सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड सोनी सबवरील मालिका ‘ध्रुव तारा - समय सदी से परे’मध्‍ये ध्रुव ताराला पोलिसांपासून वाचवेल का?

सोनी सबवरील मालिका ‘ध्रुव तारा - समय सदी से परे’मध्‍ये ध्रुव ताराला पोलिसांपासून वाचवेल का? 
सोनी सबवरील ‘ध्रुव तारा - समय सदी से परे’ या मालिकेने ध्रुव (ईशान धवन) आणि ताराप्रिया (रिया शमा्र) यांच्‍यामधील अनोख्‍या रोमँटिक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्व प्रेक्षकांनी या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. आपल्‍या स्‍वत:च्‍या काळात परत जाण्‍यामध्‍ये अनेक संकटांचा सामना करत असलेल्‍या ताराच्‍या व्‍यथेने प्रेक्षकांना त्‍यांच्‍या आसनांवर खिळवून ठेवले आहे. आगामी एपिसोड्समध्‍ये ध्रुव पुन्‍हा एकदा आणखी एका मोठ्या संकटात ताराच्‍या मदतीस धावून येणार आहे.  
सुशीला (नीलिमा सिंग) ध्रुव कॅनडाला जाण्‍यापूर्वी त्‍याचा विवाह करण्‍याचे ठरवते, ज्‍यामुळे आणखी एक मोठी समस्‍या निर्माण होते. ध्रुव सतत सुशीलाला सांगतो की, त्‍याची विवाह करण्‍याची इच्‍छा नाही. याबाबत तिच्‍या मनात शंका निर्माण होतात आणि ती त्‍याला तिने निवडलेल्‍या मुलीला भेटण्‍यास दबाव टाकते. आपला मुद्दा सिद्ध करण्‍याचा प्रयत्‍न करत असताना अखेर ध्रुवला नवरंग व्‍हॅन दिसते आणि तो आनंदित होतो. त्‍याला ताराला याबाबत सर्वकाही सांगायचे असते, पण त्‍याला समजते की तारा कायमची घर सोडून गेली आहे. दुसरीकडे, गुंडांपासून एका मुलीला वाचवण्‍याचा प्रयत्‍न करताना तारा संकटात सापडते आणि पोलिस तिला अटक करतात. 
ताराचे जीवन धोक्‍यात असल्याचे ध्रुवला समजेल का? तो तिला वाचवेल का? 
ध्रुवची भूमिका साकारणारा ईशान धवन म्‍हणाला, ‘‘ध्रुवला ताराबाबत अधिक समजण्‍यासह कथानक रोमांचक होत आहे आणि दोघांमध्‍ये नाते निर्माण होत असल्‍यासारखे वाटत आहे. तारा आणखी एका संकटात सापडली असल्‍यामुळे ध्रुव यावेळी तिला कसे वाचवतो हे पाहणे रोचक असणार आहे. हा ध्रुव व ताराच्‍या जीवनातील नवीन अध्‍यायाचे संकेत आहे का? मी तुम्‍हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, आगामी आठवडा रोमांचक ट्विस्‍ट्सनी भरलेला आहे, तर मग पाहायला विसरू नका ‘ध्रुव तारा’ फक्‍त सोनी सबवर.’’ 
पाहत राहा ‘ध्रुव तारा - समय सदी से परे’ दर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्‍त सोनी सबवर

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.