Posts

Showing posts from June, 2023

सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत, संगम सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. मुंढे, वनवासमाची ता.कराड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सह्याद्रि शेतकरी विकास पॅनलने १७/० असा विजय संपादन केला.याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन केले*

Image
*सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत, संगम सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. मुंढे, वनवासमाची ता.कराड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सह्याद्रि शेतकरी विकास पॅनलने १७/० असा विजय संपादन केला.याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील साहेब  यांनी सर्वांचे अभिनंदन केले* त्याबद्दल नवनिर्वाचित संचालक संभाजी शंकरराव साळवे, प्रशांत संभाजीराव चव्हाण,  संभाजी काशिनाथ जमाले, आनंदा शंकर संकपाळ, अनिल हिंदुराव सुर्वे, मुबारक अब्बास भालदार, संभाजी नारायण चव्हाण, बजरंग विठ्ठल शिंदे,  कृष्णत नामदेव जमदाडे,  अंकुश शामराव यादव, शैलेश मोहन भोपते, अधिकराव शिवाजी पाटील, अलका विष्णू चव्हाण, कमल कुशाबा सावंत, शशिकांत यमाजी माळी, अभिजीत अशोक लवटे, संतोष बाबुराव शिंदे यांनी ग्रामस्थांसमवेत खासदार श्रीनिवास पाटील साहेब पाटील यांच्या गोटे ता. कराड येथील लोकसेवा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली यावेळी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आनंदराव जागरु जमाले, सागर पाटील, रमेश लवटे, मोहम्मद आवटे, भीमराव जमाले, अशोक माळी, बाजीराव चव्हाण, वसंत माळी, अ

*कराडवासियांच्या मागणीचा आदर करून जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह*

Image
*कराडवासियांच्या मागणीचा आदर करून जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह*    *कराड शहर काँग्रेसच्या मागणीला यश*   *कराड :* कराड शहरातील 24 तास पाणी योजनेच्या मिटर प्रमाणे पाणी बिलांच्या वसुलीवरील स्थगिती कायम ठेवताना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी जुन्या दराप्रमाणे वार्षिक पाणीपट्टी वसुली करण्यास नगरपालिकेस आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचीच मागणी आंदोलनातून कराड शहर काँग्रेस कमिटी ने शहर वासियांच्या वतीने केली होती. यामुळे कराड शहर काँग्रेस कमिटीच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.  *यानिमित्त कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे म्हणाले की,*  कराड शहरात मीटरने पाणी पट्टी आकारणी बाबत 1 एप्रिल 2022 रोजी पासून शहरात अंमलबजावणी केली होती परंतु याबाबत शहर वासियांच्या अनेक तक्रारी होत होत्या. मिटरने बिल आकारणी केल्यामुळे भरमसाठ बिल येतात, पाण्याचे मिटर हवेनेच फिरते तर हवेचे बिल का द्यायचे? अशा अनेक तक्रारी असून सुद्धा कराड नगरपालिका मिटरने बिल आकरत होती यामुळे शहरातील नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या मागण्या मधून एक कॉमन मागणी

कराडवासियांच्या मागणीचा आदर करून जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह कराड शहर काँग्रेसच्या पाठपुरावाला यश

Image
कराडवासियांच्या मागणीचा आदर करून जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह कराड शहर काँग्रेसच्या पाठपुरावाला यश कराड : कराड शहरातील 24 तास पाणी योजनेच्या मिटर प्रमाणे पाणी बिलांच्या वसुलीवरील स्थगिती कायम ठेवताना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी जुन्या दराप्रमाणे वार्षिक पाणीपट्टी वसुली करण्यास नगरपालिकेस आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचीच मागणी आंदोलनातून कराड शहर काँग्रेस कमिटी ने शहर वासियांच्या वतीने केली होती. यामुळे कराड शहर काँग्रेस कमिटीच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. यानिमित्त कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे म्हणाले की, कराड शहरात मीटरने पाणी पट्टी आकारणी बाबत 1 एप्रिल 2022 रोजी पासून शहरात अंमलबजावणी केली होती परंतु याबाबत शहर वासियांच्या अनेक तक्रारी होत होत्या. मिटरने बिल आकारणी केल्यामुळे भरमसाठ बिल येतात,पाण्याचे मिटर हवेनेच फिरते तर हवेचे बिल का द्यायचे ? अशा अनेक तक्रारी असून सुद्धा कराड नगरपालिका मिटरने बिल आकरत होती  यामुळे शहरातील नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या मागण्या मधून एक कॉमन मागणी होती की,जो

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या पाणीपट्टी वाढीला स्थगिती भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांची माहिती

Image
डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडच्या पाणीपट्टी वाढीला स्थगिती भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयाचा आदेश कराड, ता. ३० :  कराड नगरपालिकेने पाणीपट्टी आकारणीमध्ये केलेली वाढ रद्द करावी, याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वाढीव पाणीपट्टीला स्थगिती देण्याचा आदेश नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना बजाविला आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराडमधील नागरिकांची वाढीव पाणीपट्टीतून मुक्तता झाली आहे, असे निवेदन भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.  याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात श्री. बागडी यांनी पुढे म्हटले आहे, की गेल्या आठवड्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दक्षिण मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कराड दक्षिणमधील वि

मुबई शिवसेना-भाजप समन्वय समितीची बैठक पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मुंबई येथील पावनगड निवासस्थानी संपन्न*

Image
मुबई शिवसेना-भाजप समन्वय समितीची बैठक पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मुंबई येथील पावनगड निवासस्थानी संपन्न* शिवसेना-भाजप समन्वय समितीची बैठक आज महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मुंबई येथील पावनगड शासकीय निवासस्थानी झाली. संसदीय कार्य मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, वन मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. संजयजी राठोड, शिवसेना प्रवक्ते मा. नरेशजी म्हस्के यांच्यासह पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी सर्वांचे मन:पूर्वक स्वागत केले. यावेळी त्यांच्यात मनमोकळा संवाद झाला.

मुबई कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी निर्देश दिले.

Image
मुबई कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी निर्देश दिले. * पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील सातारा जिल्ह्यातील कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठक संपन्न झाली. कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी संबंधितांना दिल्या. या गावाच्या पुनर्वसनाबाबत मा. वन मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्यासमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यानिमित्ताने व्यक्त केला.  या बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक रामानुजन, सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सहायक वनसंरक्षक गणेश पाटोळे उपस्थित होते.

मुबई सोनी सबवरील ध्रुव तारा मालिकेने केले १०० एपिसोड पूर्ण

Image
मुबई  सोनी सबवरील ध्रुव तारा मालिकेने केले १०० एपिसोड पूर्ण   ध्रुव तारा ही ध्रुव (ईशान धवन) आणि तारा (रिया शर्मा ) या दोन वेगवेगळ्या काळात राहणाऱ्या व्यक्तींची  प्रेमकहाणी आहे. हे वेगळेपण प्रेक्षकांना  आवडले आहे. या मालिकेत यश टोंक (उदय भान), नारायणी शास्त्री (राणी कनुप्रिया) आणि कृष्ण भारद्वाज (महावीर) यांच्याही  लक्षणीय भूमिका  आहेत. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविले आहे.  सोनी सब दर्जेदार  आगळ्या-वेगळ्या मालिका  देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी वाहिनी आहे. ध्रुव तारा ही मालिका संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम मनोरंजन करण्याचे वचनबद्धतेची ग्वाही देते. ध्रुव तारा मालिकेचे  यश केवळ कथेवर नाही तर त्यातील व्यक्ती रेखांमुळे आहे.  बघायला विसरू  नका, ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ दर सोमवार ते शनिवार रात्री ८. ०० वाजता फक्त सोनी सबवर!

पुणे तर गुन्हेगारीकडे वळालो असतो* *जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी मानले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे आभार ; पालकत्व योजनेअंतर्गत दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा*

Image
पुणे तर गुन्हेगारीकडे वळालो असतो*   *जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी मानले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे आभार ;  पालकत्व योजनेअंतर्गत दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा* पुणे : जय गणेश पालकत्व योजनेचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. ज्या परिस्थितीतून मी आलो आहे, योग्य वेळी जर  दगडूशेठ ट्रस्टने मदतीचा हात दिला नसता तर मी पोलीस न होता गुन्हेगारी क्षेत्राकडे नक्कीच वळलो असतो. माझी परिस्थिती बेताची होती त्यामुळे पुढे शिक्षण घेता येईल की नाही असा प्रश्न असताना ट्रस्टने मला चांगले शिक्षण देत माणूस म्हणून घडविण्यास मदत केली, अशी भावना जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेत विद्यार्थी असलेल्या आणि आता भोसरी एमआयडीसी येथे पोलीस म्हणून कार्यरत अनिकेत कांबळे याने व्यक्त केली.   श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेअंतर्गत दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात क

वीर जवान सुरज यादव यांच्या कुटुंबियांचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सांत्वन*

Image
 *वीर जवान सुरज यादव यांच्या कुटुंबियांचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सांत्वन*   *कराड :* येरवळे गावचे सुपुत्र जवान सुरज मधुकर यादव यांचे आसाम येथील दिवापूर येथे सेवा बाजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी येरवळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वीर जवान सुरज यादव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण, येरवळे चे माजी सरपंच सुभाषराव पाटील आदीच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.  यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असून जिल्ह्यातील काही गावे सैनिकांचं गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. सुरज यादव यांचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत. सैन्याप्रती एक सदभावना आपल

पुणे व्यापारी देशाचा आर्थिक कणा**पद्मविभूषण डॉ. के.एच. संचेती यांचे मत : स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदान*

Image
पुणे व्यापारी देशाचा आर्थिक कणा* *पद्मविभूषण डॉ. के.एच. संचेती यांचे मत : स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदान*  पुणे :  व्यापारी म्हणजे केवळ पैसे कमावणारा माणूस असा समाजामध्ये चुकीचा समज निर्माण झाला आहे, परंतु समाजाला उपलब्ध नसणारी साधने वेळेत उपलब्ध करून देऊन व्यापारी हा एक प्रकारे समाजसेवेचे काम करत असतो. व्यापारी हा केवळ स्वतःच किंवा ग्राहकांचा विकास करत नाही, तर व्यापारी हे खऱ्या अर्थाने देशाचा आर्थिक कणा आहेत, असे मत पद्मविभूषण ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉ. के.एच. संचेती यांनी व्यक्त केले.  स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात डॉ. संचेती बोलत होते. माजी आमदार मेधा कुलकर्णी, असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोधनी , उपाध्यक्ष सचिन जोशी, सचिव गणपतराज जैन, खजिनदार मोहन कुडचे, नितीन पंडित, मदनसिंह रजपूत, सूर्यकांत पाठक, किशोर चांडक, अनिल प्रभुणे,  सुरेश नेऊरगावकर आदी उपस्थित ह

कराड छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमीत्त आज कराड येथे शाहू चौकातील त्यांच्या पुतळ्यास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा.आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Image
कराड छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमीत्त आज कराड येथे शाहू चौकातील त्यांच्या पुतळ्यास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा.आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, शिवाजी पवार, उदय हिंगमीरे, पोपटराव साळुंखे, दादासो शिंगण, सतीष भोंगाळे, सचिन पवार, समाधान चव्हाण, बाबासाहेब कळके, मोहसीन अंबेकरी, अजय सुर्यवंशी, मंगेश वास्के, रविंद्र मुंढेकर, निखिल ठोंबरे, राकेश पवार, निलेश झेंडे, भारत थोरवडे, शोएब सुतार, अधिकराव जाधव, भारत जाधव, जाबिर वायकर, राहुल भोसले तसेच इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी केली जात आहे, महाराष्ट्राला समतेचा  विचार त्यांनी दिला.सर्व जातीधर्माला, समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्यांची होती, आदर्श राजे म्ह

पुणे*श्री श्री जगन्नाथ रथयात्रेच्या दर्शनाला पुणेकरांची मोठी गर्दी*

Image
पुणे*श्री श्री जगन्नाथ रथयात्रेच्या दर्शनाला पुणेकरांची मोठी गर्दी* *आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल ८० हजार भाविकांना महाप्रसाद* पुणे : हरे राम हरे कृष्णा...जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा... चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.   टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी प.पू.लोकनाथ स्वामी महाराज, प.पू.प्रबोधानंद सरस्वती स्वामी महाराज, प.पू.श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज, रथयात्रेचे मार्गदर्शक व इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष रेवतीपती दास, रथयात्रा समन्वयक अनंत गोप दास, मंदिराचे उपाध्यक

शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाची,मुलुख मैदानी तोफ,सामना वृत्तपत्राचे संपादक,सन्माननीय खासदार संजय राऊत यांनी,आज आमचे सुपने ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट

Image
शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाची,मुलुख मैदानी तोफ,सामना वृत्तपत्राचे संपादक,सन्माननीय खासदार संजय राऊत यांनी,आज आमचे सुपने ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली,आणि गावाचे नियोजनबद्ध रचना आणि,गावातील रस्ते पाहून समाधान व्यक्त केले,भविष्यात गावचे विकास कामासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले,यावेळी जिल्हा प्रमुख हर्षद कदम,शिवसेना नेते नितीन बानुगडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती,कार्यक्रमास ग्रामपंचायत चे पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

मल्हारपेठ येथील विविध विकासकामांचे उद्घाटन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खा. श्री. संजय राऊत

Image
मल्हारपेठ येथील विविध विकासकामांचे उद्घाटन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खा. श्री. संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. सत्यजितसिंह पाटणकर , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते श्री. नितीन बानूगडे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री.हर्षद कदम आणि महाविकास आघाडीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.        यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. आनंदराव पवार, पाटण अर्बन बँकेचे संचालक श्री. समीर कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. गुरुदेव शेडगे, सरपंच सौ. धनश्रीताई कदम, श्री. सुरेश पाटील व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बुथ कमिटी मेळावासह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला 9156992811

Image
*कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बुथ कमिटी मेळावा सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला 9156992811  राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधानपरिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड व सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मंगल कार्यालय, मसूर फाटा, उंब्रज येथे मोठ्या  उत्साहात संपन्न झाला.* कराड उत्तर मतदारसंघात बूथ कमिट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले, प्रत्येक बुथ कमिटी सदस्याने आपल्या बुथ मधील मतदार नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन वरिष्ठांमार्फत त्या सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. बूथ कमिटीने बूथ स्तरावर अधिक व्यापक व सक्रियपणे काम करून पक्ष संघटन मजबूत केले पाहिजे,  तसेच पक्षाचे कार्य व ध्येयधोरणे  सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवन्याचे काम बूथ कमिटी मार्फत करणे आवश्यक आहे, अशा प्रकारचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प

पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदिच्छा भेट घेतली!*

Image
*पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदिच्छा भेट घेतली!* भाजपचे आमदार मा. गोपीचंद पडळकर यांनी आज दौलतनगर-मरळी येथे येऊन महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांचे स्वागत केले. तसेच याप्रसंगी त्यांच्यात मनमोकळा संवाद झाला. सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811

पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी वन विभागातील वनमजुरांच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेतली.*

Image
*पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी वन विभागातील वनमजुरांच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेतली.* वन विभागातील वनमजुरांच्या विविध मागण्यांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज दौलतनगर-मरळी येथे आढावा बैठक घेतली. यावेळी वनमजुरांच्या विविध मागण्या व समस्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात राज्याचे वनमंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, हे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीस सातारा जिल्हा उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प-कराडचे उपसंचालक उत्तम सावंत, सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी हरिशचंद्र वाघमोडे, कराडचे सहाय्यक वनसंरक्षक तुषार ढमढेरे यांच्यासह संबंधित अधिकारी, तसेच संबंधित ग्रामस्थ आणि वनमजूर उपस्थित होते. सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811

कराड अजय सुर्यवंशी मित्रपरिवार.युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने प्रेमिलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालय (विजयनगर)

Image
.कराड अजय सुर्यवंशी मित्रपरिवार.युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने प्रेमिलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालय (विजयनगर)  शाळेमध्ये शालेय वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थिती प्रदीप भाऊ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सुपने,          सुरज घोलप(बाबा) सागर लाखे,अविनाश कांबळे, श्रेयस पाठक, विक्रम सूर्यवंशी, संदीप बडेकर, आकाश माने, तेजस सुर्यवंशी, हे उपस्थित होते*

फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारतींचे भूमिपूजन मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते व पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत संपन्न*

Image
*फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारतींचे भूमिपूजन मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते व पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत संपन्न* फलटण तालुक्यात आज माऊलींच्या पालखी आगमनाच्या पवित्र दिवशी फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारतींचे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यास त्यांच्यासमवेत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब उपस्थित राहिले.  महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत फलटण तालुक्यातील या ३ पोलीस ठाण्यांच्या नूतन इमारती उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाने १३ कोटी ६४ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. प्रत्येकी ८५० चौरस मीटर क्षेत्रफळाचे दुमजली पोलीस ठाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास सज्ज होतील. या पोलीस ठाण्यांमुळे सुमारे ३ लाख ७० हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. १८ महिन्यांच्या कालावधीत अत्याधुनिक सुविधां

सातारा २१जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो...सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811

Image
सातारा २१जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो...सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811 २१ जून २०१५ ला पहिल्या योग दिवस साजरा केला...या दिवशी चे अजून एक विशेष वैशिष्ट्य या दिवशी दिवस मोठा असतो...आणि या दिवसापासून दक्षिणायन सुरू होते...या वर्षी चा ९वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे...योगा ला पाच हजार वर्षांचा प्राचीन इतिहास आहे.आदिगुरू भगवान शिव यांना  प्रथम योगी मानले जाते...तसेच महर्षी प़तंजली यांना जनक बोलले जाते.. महर्षी पतंजली यांनी अष्टांग योग ची निर्मिती करुन... योग दर्शन या ग्रंथात १९५ योगसूत्रा मध्ये बांधला आहे... अष्टांग योग चे आठ अंगे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या बद्दल या ग्रंथात वर्णन केले आहे.. संपूर्ण जग योग कडे वळत असून रोजच्या जीवनात योगा करत आहे...आज ठिक ठिकाणी उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला.... सातारा जिल्ह्याच्या पहिल्या जागतिक विश्वविक्रमवीर डाॅ.जान्हवी इंगळे यांनी सातारा पोलीस मुख्यालय येथे योग दिवसा निमित्त मार्गदर्शन केले... यावेळी सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.