सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला सातारा जिल्ह्याला प्रतिभेचा, पुरोगामी विचारांचा आणि प्रगतीचा वारसा आहे. विचारांचा वारसा घेऊन चालणारा हा मतदारसंघ असून एकमेकांशी समन्वय साधून नेत्यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
सातारा जिल्ह्याला प्रतिभेचा, पुरोगामी विचारांचा आणि प्रगतीचा वारसा आहे. विचारांचा वारसा घेऊन चालणारा हा मतदारसंघ असून एकमेकांशी समन्वय साधून नेत्यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.
घोणशी (ता.कराड) येथे खासदार श्रीनिवास पाटील व माजी मंत्री आ.बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या अतंर्गत रस्त्यांचे क्रॉंकिटीकरण करणे कामाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पी.डी.पाटील बॅंकेचे संचालक सागर पाटील, पं.स.सदस्य प्रणव ताटे, संरपच सुवर्णा अडसुळे, सह्यादी कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सारंग पाटील म्हणाले, परंपरेने आपल्याला समृध्द वारसा मिळाला आहे, ही विचारांची, तत्वाची परंपरा जबाबदारीने पुढे नेली पाहिजे. स्व.चव्हाण साहेबांचे विचार पी.डी.पाटील साहेब, खा.श्रीनिवास पाटील यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. समाजसेवीची संधी मिळाल्यास ती लोकासांठीच कारणी लागली पाहिजे. खा.श्रीनिवास पाटील साहेब व आ. बाळासाहेब पाटील साहेब हे लोकाभिमुख नेतृत्व आहेत. ते निष्ठा जपून एकमेकांशी समन्वय साधून चाललेले नेते आहेत. त्यांच्यासारखे आभ्यासू लोकप्रतिनिधी लाभल्याने येथील विकासाला गती मिळाली आहे. गावागोवी विकासकामे साकारत असताना खा.पाटील यांनी महामार्गावरील मोठ्या पुलांच्या कामासह मार्गाचा दर्जा सुधारला. डोंगरी गावात मोबाईल टॉवर मंजूर केले. अनेक वर्षापासून रखडलेले रेल्वेचे प्रश्न सोडवले, रेल्वे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून दिला.
सागर पाटील म्हणाले, दोन्ही नेत्यांनी ह्या मतदारसंघात निधी कमी पडू दिलेला नाही, येथून पुढील काळात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहाल अशी आशा आहे.
माणिकराव पाटील म्हणाले, विभागात अनेक विकासकामे मार्गी लागली असून दोन्ही नेत्याकडून मागेल ती कामे नागरिकांना मिळत आहेत.
प्रणव ताटे म्हणाले, गावागावांचा विकास करण्यासाठी नेते कटिबद्ध असून त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुराव्यासह प्रयत्नशील राहिले पाहिजे.
प्रारंभी स्वागत संजय पिसाळ यांनी केले.
आभार शशिकांत वायदंडे यांनी मानले. यावेळी सोसायटीचे चेअरमन विलास पवार, सागर पाटील, तुषार पवार, संभाजी पिसाळ, माणिकराव थोरात, अमोल पिसाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment