सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) सातारा -*“ *मोदीजी हटाओ , देश बचाओ , लोकशाही बचाओ “ * असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विविध प्रश्न विचारणारी पत्रे पाठविण्यास सातारा
*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) सातारा -*“ *मोदीजी हटाओ , देश बचाओ , लोकशाही बचाओ “ * असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विविध प्रश्न विचारणारी पत्रे पाठविण्यास सातारा जिल्हाध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली या “ *PostCard Campaign ची सुरूवात करण्यात आली . यावेळी प्रदेश कार्यकारी सदस्य अजितराव पाटील चिखलीकर, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, सातारा महिला काँग्रेसच्या प्रवक्त्या सौ छायदेवी घोरपडे, प्रदेश प्रतिनिधी अन्वर पाशाखन, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, मनोजकुमार तपासे, कल्याणराव पिसाळ,सुशमराजे घोरपडे, रजिया शेख, मालन परळकर आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांनी आज पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले, यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांनी सांगितले की, जिल्हा काँग्रेस कमिटी चे वतीने 1 लाख पत्र पाठवले जाणार आहेत त्याचा शुभारंभ आज करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात खालीलप्रमाणे मुद्दे मांडण्यात आले आहेत.
मोदीजी आपणदिलेल्या आश्वासनांची पुर्तता करणेबाबत आणि आर्थिक घोटाळ्यांबाबत. *
आदरणीय पंतप्रधान ,आपण २०१४ च्या निवडणुकी आधी आणि नंतरही विविध आश्वासने दिली पण त्याची पुर्ताता केलेली नाही . त्याबरोबर देशात दररोज मोठे - मोठे घोटाळे होत असून संबंधीत घोटाळेबाज मोकाट आहेत.
आपण दिलेल्या आश्वासनांची पुर्तता तर करावीच पण घोटाळ्यांना चाप लावून घोटाळे केलेल्यांना कडक शासन करावे अशी आमची अपेक्षा आहे.
परंतु आपण ना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करत आहात , ना घोटाळेबाजांना शासन करताना दिसत आहात.
आम्हास *खालील प्रश्न पडले आहेत त्याची उत्तरे आपण तात्काळ द्यावीत. * अशी आमची भावना आहे.
अदानीच्या आर्थिक भानगड्यांची आपण JPC मार्फत चौकशी कधी पासून सुरू करणार आहात? *केंद्र सरकार अदानीच्या JPC चौकशीपासून पळ का काढत आहे?*
SBI आणि LIC ला * अदानीच्या आर्थिक भानगड्यांमुळे जो *धोका* निर्माण झाला आहे *त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय उपाययोजना केली आहे?*.
निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चौक्सी, विजय मल्ल्या यांना पकडून देशातील न्यायव्यवस्थेसमोर केव्हा हजर करणार आहात? *
अच्छे दिन गौतम व विनोद अदानी यांना आले “ आहेत सामान्य माणसास अच्छे दिन कधी येणार? *
स्वीस बॅंकातील कथित काळा पैसा परत * “ प्रति नागरीक १५ लाख “ रूपये याप्रमाणे वाटणार होता त्याचे काय झाले? *
ED, SEBI, CBI इत्यादी तपास यंत्राणा अदानीची निःपक्षपातीपणे चौकशी सुरू करणार आहे की नाही असा ही प्रश्न विचारला आहे
Comments
Post a Comment