Posts

Showing posts from October, 2023

-पुणे *ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या*

Image
-पुणे  *ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या*   *माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा ९ वा वर्धापन दिन कार्यक्रम*  पुणे :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे, ज्याचे पोट खाली आहे, जो गरीब आहे त्याला आरक्षण द्या. जातीवर आधारीत आरक्षण देऊ नका. बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकले असते तर आज कुणबी मराठा ओबीसी मराठा धनगर समाज हे रस्त्यावर आले नसते. परंतु राज्यकर्त्यांनी त्यावेळी ऐकले नाही. बाळासाहेबांच्या विचारांची जर पूर्वीच अंमलबजावणी झाली असती तर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण झाली नसती, असे मत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार  रामदास कदम यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते. सन्मान सोहळ्यात कष्ट

कराड नाकर्तेपणा लपवण्यासाठी इतरांनी साकारलेल्या कामांची भूमिपूजने करू नयेत.रामकृष्ण वेताळ.

Image
कराड नाकर्तेपणा लपवण्यासाठी इतरांनी साकारलेल्या कामांची भूमिपूजने करू नयेत.रामकृष्ण वेताळ. ओगलेवाडीः अनेक वर्ष आमदार आणि मंत्री, पालकमंत्री असूनही कराड उत्तरेसाठी निधी आणता आला नाही. म्हणून इतरांनी निधी आणलेल्या कामांची उद्घाटने आणि भूमिपूजन करून श्रेय लाटण्याचा प्रकार कराड उत्तर मतदारसंघात सुरू आहे. लोकांना सर्व समजत असल्याने हा प्रकार थांबवावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले आहे.        प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मरळी भगतवाडी रस्ता, शिवडे भवानवाडी रस्ता,गजानन हाऊसिंग सोसायटी गणपती मंदिर ते विरवडे करवडी रस्ता आणि सुरली पाटी ते कामथी पाचुंद रस्ता, या रस्त्यासाठी तत्कालीन जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार  नुतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, नेते मनोज घोरपडे आणि प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ व  भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत.     या रस्त्यासाठी सुमारे 15 कोटी रुपये निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. परंतु स्वतः काही करता आले नसल्याने

सातारारत्न पुरस्काराने डॉ.सुनील तांबवेकर सन्मानित

Image
डॉक्टर.सुनील एकनाथ तांबवेकर यांना सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित करताना डॉ.राजेंद्र भोसले, महंत सुंदरगिरी महाराज, प्रा.यशवंत पाटणे, नाना निकम,  बाबुराव माने व इतर मान्यवर. सातारारत्न पुरस्काराने डॉ.सुनील तांबवेकर सन्मानित कराड, दि.२६: मुंबई येथील आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल, सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय, के.ई.एम.रुग्णालय, परळ, मुंबई येथील सिनियर असिस्टंट प्रोफेसर, स्त्रीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, प्रसूती शास्त्र तज्ञ व एंडोस्कोपिक सर्जन डॉ.सुनील एकनाथ तांबवेकर यांना सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.सुनील तांबवेकर हे मुळचे घोगाव, ता.कराड येथील रहिवासी आहेत. सातारा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. दादर येथील शिवाजी मंदिर येथे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई आणि परिसरातील सातारकरांसाठी असलेल्या संकल्पित सातारा भवनचे शानदार उद् घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सेवागिरी

कराड | कराड शहरातील मुजावर कॉलनीत बुधवारी सकाळी भीषण स्फोट झाला

Image
कराड | कराड शहरातील मुजावर कॉलनीत बुधवारी सकाळी भीषण स्फोट झाला . या स्फोटामुळे घराची भिंत सुमारे 25 फूट वरती उडून समोरील घराच्या पत्र्यावरती पडली. स्फोटात शरीफ मुल्ला यांच्यासह शेजारील कुटूंबातील लोक जखमी झाले आहेत. स्फोट एवढा जबरदस्त होता की 6 घराच्या भिंतींचीही पडझड झाली असून 6 दुचाकी गाडीचेही नुकसान झाले आहे. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शरीफ मुल्ला कुटूंबासह राहतात. बुधवारी सकाळी त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मुल्ला कुटूंबियांना बचावासाठी धावण्याची संधीच मिळाली नाही. स्फोटात मुल्ला कुटूंबातील पाचजण जखमी झाले. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की संपूर्ण मुजावर कॉलनी परिसर हादरून गेला. अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनी धावपळ करत आग आटोक्यात आणली. जखमींना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात असले तरी हा भीषण स्फोट व झालेले नुकसान पाहता तर्कवितर्कांना उधाण आले असून नेमका स्फोट कसा झाला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

Karad योगा विश्वविक्रमवीर डाॅ.जान्हवी इंगळे यांनाप्राचार्य यशवंत पाटणे,सिने अभिनते किरण माने यांच्या हस्ते मानाचा प्रतिष्ठेचा

Image
Karad योगा विश्वविक्रमवीर डाॅ.जान्हवी इंगळे यांना प्राचार्य यशवंत पाटणे,सिने अभिनते किरण माने   यांच्या हस्ते   मानाचा प्रतिष्ठेचा  🏅राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवार्ड २०२३🏅 पुरस्कार यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉल कराड येथे प्रदान करण्यात आला.. यावेळी  मा. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे सुप्रसिद्ध व्याख्याते आणि विचारवंत मा. किरण माने सुप्रसिद्ध अभिनेते मा.पै. आप्पासाहेब कदम महाराष्ट्र केसरी पैलवान मा. पंजाबराव देसाई (तात्या) सदस्य, पंचायत समिती ह.भ.प.विजय महाराज रामिष्टे संस्थापक अध्यक्ष, श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था सचिन पाटील अभिनेता / लेखक उपस्थित होते

आज कराड उत्तरचे युवा नेते मा. रामकृष्ण वेताळ साहेब,यांनी कराड आगार प्रमुख व्यवस्थापक कुलदीप डुबल व वाहतूक नियंत्रक श्री कचरे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या समस्या

Image
*विद्यार्थी समस्यांचा पाठपुरावा करून सहकार्याचा शब्द पाळला* .     कराड वार्ता न्यूज सह्याद्रि वार्ता न्यूज नेटवर्क कराड असलम मुल्ला *आज कराड तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या समस्या लक्षात घेऊन आणि त्यांच्या शिक्षणामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार आज कराड उत्तरचे युवा नेते मा. रामकृष्ण वेताळ साहेब,यांनी  कराड आगार प्रमुख व्यवस्थापक कुलदीप डुबल व वाहतूक नियंत्रक श्री कचरे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि कराड - मसूर - उंब्रज, कराड मसूर -  उंब्रज - चाफळ, कराड - उंब्रज -  तारळे, कराड - पाचुंद - शाळगाव - पुसेसावळी ,उंब्रज - मसूर -  पुसेसावळी, कराड- कालगाव- तारगाव, या शटल सेवा सुरू करण्याविषयी निवेदन दिले .अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. अधिकाऱ्यांनीही या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे विद्यार्थी बांधवांची प्रवासाची सोय होऊन त्यांचे शिक्षण सुलभ होणार आहे*.        *यावेळी भाजपा जिल्हा सचिव दिपालीताई खोत, सरचिटणीस शंकरराव शेजवळ, विस्तारक सुनील शिंदे, सरचिटणीस शहाजी मोहित

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न*

Image
*पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न* *कराड वार्ता न्युज नेटवर्क सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला सातारा जिल्ह्यातील २० केंद्रांचे उद्घाटन; पाटण तालुक्यात मल्हारपेठ व तारळे येथे कौशल्य विकास केंद्र* गुरुवार, १९ ऑक्टोबर २०२३ राज्यातील ५११ ग्रामीण भागातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी  मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन संपन्न झाले. यात सातारा जिल्ह्यातील २० केंद्रांचाही समावेश आहे. कोडोली ग्रामपंचायतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास मुंबई येथून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. अजितदादा पवार साहेब व मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांसह पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिले. यावेळी सातारा जिल्ह्यातील  सातारा तालुक्यातील कोडोली, लिंब व नागठाणे, कराड तालुक्यातील विंग, सैदापूर, उंब्रज, रेठरे बु., खंडाळा तालुक्यात शिरवळ व पारगाव, खटाव

कराड नगरपरिषद प्लास्टिक कॅरीबॅग निर्मूलन मोहीम*

Image
कराड नगरपरिषद, कराड ULB Code-802870 Clean karad,Green karad ♻️ स्वच्छ भारत अभियान 2.0 ♻️ स्वच्छ सर्वेक्षण 2024 🌲🌏माझी वसुंधरा अभियान 4.0🌏🌲 🇮🇳 आझादी का अमृत महोत्सव @75🇮🇳 🚯स्वच्छ अमृत महोत्सव🚯  *प्लास्टिक कॅरीबॅग निर्मूलन मोहीम*  मा. मुख्याधिकारी श्री.शंकर खंदारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कराड नगरपरिषद तर्फे प्लास्टिक कॅरीबॅग निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई या परिसरात राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये परिसरात असणाऱ्या व्यापाऱ्यांची एकल वापर प्लास्टिक ( single use plastic ban) याची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण पाच किलो (5kg) एवढे प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकल वापर प्लास्टिक ( single use plastic ban) याची जनजागृती करण्यात आली ULB CODE 802870 Clean karad, Green karad #Swachhsurvekshankara2023 #MajhiVasundharaAbhiyaan #KaradMunicipalCouncil #MajhiVasundharaAbhiyan #MajhiVasundhara #gogreen #MyCleanIndia #GreenBuildingCertified #greenfestival #SolidLiquidWasteManagement #Swac

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.

Image
माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील साहेब माजी मंत्री सहकार, पणन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांचे प्रयत्नाने कराड-उत्तरसाठी महाविकास आघाडी शासनाच्या काळातील 62 कोटींच्या मंजूर कामांवरील स्थगीती आदेश उठविण्यात आला . आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश  कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.   मूसर प्रतिनिधी- कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब पाटील यांनी सुमारे 79 कोटी रूपयांच्या विविध विभागाकडील कामांना मंजूरी मिळवली होती. त्यास शिंदे-फडणवीस सरकारने दि.18/07/2022 व 21/07/2022 च्या शासन आदेशाने स्थगीती दिली होती. त्याविरूध्द आमदार बाळासाहेब पाटील यांनी मा.उङ्ख न्यायालयामध्ये रिटपिटीशन याचिका दाखल केलेल्या होत्या. त्याचा निकाल आमदार बाळासाहेब पाटील यांच्या बाजूने लागला होता व मा.उङ्ख न्यायालयाने सरकारला या कामांवरील स्थगीती उठवणेबाबत आदेश दिलेला होता. त्यामधून शासनाने केवळ 17 कोटींच्या कामांची स्थगीती उठवलेली होती. उर्वरीत 62 कोटींच्या कामांवरील स्थगीती कायम होती. त्या

आमदार श्री.बाळासाहेब पाटील साहेब माजी मंत्री सहकार, पणन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांचे प्रयत्नाने कराड-उत्तरसाठी महाविकास आघाडी शासनाच्या काळातील 62 कोटींच्या मंजूर कामांवरील स्थगीती आदेश उठविण्यात आला.

Image
आमदार श्री.बाळासाहेब पाटील साहेब माजी मंत्री सहकार, पणन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांचे प्रयत्नाने कराड-उत्तरसाठी महाविकास आघाडी शासनाच्या काळातील 62 कोटींच्या मंजूर कामांवरील स्थगीती आदेश उठविण्यात आला. कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.   मूसर प्रतिनिधी- कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब पाटील यांनी सुमारे 79 कोटी रूपयांच्या विविध विभागाकडील कामांना मंजूरी मिळवली होती. त्यास शिंदे-फडणवीस सरकारने दि.18/07/2022 व 21/07/2022 च्या शासन आदेशाने स्थगीती दिली होती. त्याविरूध्द आमदार बाळासाहेब पाटील यांनी मा.उङ्ख न्यायालयामध्ये रिटपिटीशन याचिका दाखल केलेल्या होत्या. त्याचा निकाल आमदार बाळासाहेब पाटील यांच्या बाजूने लागला होता व मा.उङ्ख न्यायालयाने सरकारला या कामांवरील स्थगीती उठवणेबाबत आदेश दिलेला होता. त्यामधून शासनाने केवळ 17 कोटींच्या कामांची स्थगीती उठवलेली होती. उर

कराड : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी कराड भाजपा शहराध्यक्ष श्री एकनाथ बागडी यांची निवड

Image
कराड : भारतीय जनता पार्टी  कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी कराड भाजपा शहराध्यक्ष श्री एकनाथ बागडी  यांची निवड झाली असून. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा  प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात,मा.विक्रांतजी पाटील मा.मुरलीअण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनात भाजपा कामगार   मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांनी श्री विजयजी हरगुडे कामगार मोर्चा ची राज्य कार्यकारिणी मुंबई  येथे भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर केली आहे.एकनाथ बागडी यांची कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे, आमदार जयकुमार गोरे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुलबाबा भोसले,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य भरतनाना पाटील, मा.रामभाऊ वेताळ, जिल्हापरिषद सदस्य सागर शिवदास,यांनी अभिनंदन व सत्कार केला. एकनाथ बागडी यांनी भारतीय जनता पार्टी कराड शहरामध्ये 15 वर्षे अत्यंत निष्ठेने व मोठ्या जोमाने काम सुरू ठेवले आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार व पक्षाने केलेले काम अत्

भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी रामकृष्ण वेताळ

Image
भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी रामकृष्ण वेताळ कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांची निवड झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपा  प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात, विक्रांत पाटील  यांच्या मार्गदर्शनात भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी किसान मोर्चा ची राज्य कार्यकारिणी मुंबई  येथे  भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर केली आहे. भारतीय जनता पार्टी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रामकृष्ण वेताळ यांनी गेली २० वर्षे अत्यंत निष्ठेने व मोठ्या जोमाने काम सुरू ठेवले आहे .भाजपा किसान मोर्चाचे ते प्रदेश सचिव म्हणून याचबरोबर सध्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख म्हणून देखील ते काम करीत आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार व पक्षाने केलेले काम अत्यंत निष्ठेने ते लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत रामकृष्ण वेताळ यांची किसान मोर्चा प्रदेश