Posts

Showing posts from March, 2024

*कराड कॉटेज हॉस्पिटल च्या कॅथलॅब स्थलांतर निर्णय स्थगित करावा

Image
 *कराड कॉटेज हॉस्पिटल च्या कॅथलॅब स्थलांतर निर्णय स्थगित करावा  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी  *कराड :* कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्याचा निर्णय मागील काही महिन्यापूर्वी शासनाने घेतला होता. पण दोन दिवसापूर्वी शासन आदेश काढून कॅथलॅब सातारा जिल्हा रुग्णालयात स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा याबाबत पत्र माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना दिले आहे. या पत्रात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी व सूचना केली आहे कि, कराड येथे उपजिल्हा रुग्णालय असून शासनाच्या कॅथलॅब स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे कऱ्हाडसह, सातारा, खटाव, वाळवा, शिराळा, कडेगाव, पाटण या सात तालुक्यांतील रुग्ण उपचाराला मुकणार आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांसह वृद्धापकाळाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत या रुग्णांसाठी कॅथलॅब ची गरज लक्षात घेता, कराड उपजिल्हा रुग्णालयातील मंजूर कॅथलॅब स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने मागे घेण्यात यावा.

कराड दक्षिणमध्ये रस्त्यांचे जाळे होणार आणखी गतिमानकराड दक्षिणमध्ये रस्ते विकासासाठी २३० कोटींचा निधी मंजूर

Image
कराड दक्षिणमध्ये रस्त्यांचे जाळे होणार आणखी गतिमान कराड दक्षिणमध्ये रस्ते विकासासाठी २३० कोटींचा निधी मंजूर डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांतून रस्त्यांचे जाळे होणार आणखी गतिमान कराड, ता. १४ : कराड दक्षिणमध्ये रस्ते विकासाचे जाळे आणखी गतिमान होणार आहे. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हायब्रिड अन्युईटी मॉडेल टप्पा २ अंतर्गत पाटण तालुका हद्द – किरपे – विंग – वाठार – रेठरे – शेणाली स्टेशन (पाटण तालुका हद्द ते शेणोली स्टेशन रस्ता - एकूण लांबी ३८.५० कि.मी.) या रस्त्याच्या सुधारणेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून २३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कराड दक्षिणमधील रस्त्यांच्या विकासासाठी इतक्या मोठ्या निधीला मंजुरी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाजप सरकारकडून या निधीला मंजुरी मिळाली असून, लवकरच या रस्त्याच्या कामांना प्रारंभ होणार आहे.  डिचोली - नवजा – हेळवाक – मोरगिरी – साजूर – तांबवे – विंग – वाठार – रेठरे – शेणाली स्टेशन रा. मा. १४८ कि.मी. ६२/५०० ते १०१ (एकूण लांबी ३८.५० कि.मी.) हा

श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी १० कोटींचा निधी मंजूर

Image
श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी १० कोटींचा निधी मंजूर डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश; रस्ते विकास महामंडळामार्फत होणार विकास कराड, ता. १३ : सैदापूर (ता. कराड) येथील प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी शासनाने मान्यता दिली आहेत. तसेच सुमारे १० कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले आणि श्रीनिवास जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे जिर्णोद्धाराचे काम आता महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळामार्फत करण्यात येणार असून, त्याचा विकास आराखडाही तयार करण्यात आल्याने लवकरच या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास प्रारंभ केला जाणार आहे. कृष्णा-कोयनेच्या तीरावर वसलेल्या सैदापूर गावाच्या पवित्र भूमीत, कृष्णामाईच्या तीरावर पूर्वाभिमुखी असे श्री पावकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. श्री पावकेश्व र मंदिराचे बांधकाम हे साधारण १७ व्या शतकात झालेले असून, मंदिरावर अनेक दुर्मिळ शिल्पकलेचे नमुने पाहावयास मिळतात. या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य असे, की शिवलिंगावर ओतलेले पाणी हे बहुतांश मंदिरांमध्ये गोमुखातून बाहेर जाते.

हवेत तरी कशाला सारंग श्रीनिवास पाटील खासदार ..?* वेध व्यक्तित्वाचा आणि कर्तुत्वाचा

Image
*हवेत तरी कशाला सारंग श्रीनिवास पाटील खासदार ..?*  वेध व्यक्तित्वाचा आणि कर्तुत्वाचा