सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811 मलकापूर आगाशिवनगर येथे जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य अखंडीत ठेवण्यासाठी येथील *शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानच्या* वतीने शिवजयंती व रमजान महोत्सवाचे आयोजन केले.

मलकापूर आगाशिवनगर येथे जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य अखंडीत ठेवण्यासाठी येथील *शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानच्या* वतीने शिवजयंती व रमजान महोत्सवाचे आयोजन केले. त्यावेळी परिसरातील मुस्लिम बांधव व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षस्थानी राजू भाई मुल्ला नगरसेवक मलकापूर नगर परिषद हे होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली दलित मित्र भगवानराव जाधव यांनी शिवजयंती व रमजान ईद चे महत्व सांगून प्रास्ताविक केले आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरंपैकी अजितदादा सांडगे, आदिल भैया, डॉ.सारिका ताई गावडे यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख मान्यवरांपैकी सुरज शेवाळे भाजपा शहराध्यक्ष, बापू जंत्रे भाजपा उपाध्यक्ष, डॉ.सारिका ताई गावडे भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, राहुल दादा यादव जिल्हा संघटक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, आदिल भैया मोमीन, डॉ.सतीश थोरवडे, वसीम भैया हे उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या शुभ हस्ते  पाणपोई उद्घाटन करण्यात आले आणि शीरखुर्मा व जिलेबी चे वाटप  करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यावेळी शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गायकवाड, स्वप्निल जाधव, शंकर बेले, सुधीर जाधव, नितीन जाधव, विनायक चव्हाण, सागर वाघमारे, सागर वीर कायदे सदस्य उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त