Posts

Showing posts from March, 2023

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड इन्शुरन्स क्षेत्रातील उत्तुंग भरारी* सौ माधवी कुलकर्णी

Image
*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड इन्शुरन्स क्षेत्रातील उत्तुंग भरारी* सौ माधवी कुलकर्णी  कराड बैल बाजार रोड येथील माधवी कन्सल्टन्सीच्या सौ.माधवी कुलकर्णी यांची इन्शुरन्स क्षेत्रातील उत्तुंग भरारी.  जेव्हा प्रश्न सुरक्षिततेचा येतो त्यावेळी ग्राहक माधवी  कन्सल्टन्सी वर विश्वास ठेवतात. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १०,००० समाधानी ग्राहक, क्लेमसाठी १००% सहकार्य तसेच तीन कोटींचा व्यवसाय करणाऱ्या जनरल, हेल्थ व लाईफ या तिन्ही इन्शुरन्स प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या माधवी कन्सल्टन्सीचाच विचार ग्राहक प्राधान्याने करतात.          म्हणूनच या आर्थिक वर्षामध्ये तीन कोटींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व ग्राहकांनी अभिनंदन केले व समाधान व्यक्त केले.

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)  आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. गरीब, गरजू रुग्णांना सुमारे ५ लाखापर्यंतचे उपचाराचे कवच देणाऱ्या या योजनेच्या गोल्डन कार्डचे वितरण आणि ग्रामीण रुग्णसेवेसाठी अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन आज अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात कराड शहरातील मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. #PMJAY #AyushmanBharatYojana #ABPMJAY #HealthInsuranceCard #kimskarad  #KrishnaHospital #karad  #BJP4Maharashtra

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड- पुणे -*लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत सजली 'भावसरगम'

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड- - *लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत सजली 'भावसरगम' स्वरमैफल*  *पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांचे  'भावसरगम' स्वरमैफलीत सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाचा समारोप* पुणे : मोगरा फुलला... माझे राणी माझे मोगा... अशा एकाहून एक सरस मराठी गीतांप्रमाणेच हात नका लावू माझ्या साडीला... या अजरामर झालेल्या लावणीसह विविध गीते सादर करीत युवा कलाकारांच्या साथीने ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदी अर्थात भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुण्यामध्ये सादर केलेल्या कार्यक्रमात रसिकांकडून मिळणारी दाद आणि कार्यक्रमादरम्यान अनुभवलेले विविध किस्से देखील त्यांनी  उपस्थितांना सांगितले.  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायिका व

*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड कोणेगांव ता.कराड येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या 'जानशावली बाबा' देवस्थानच्या उरूस उत्सवास

Image
*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड  कोणेगांव ता.कराड येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या 'जानशावली बाबा' देवस्थानच्या उरूस उत्सवास सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे माजी सभापती मा. मानसिंगराव जगदाळे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन, दर्शन घेलते.* याप्रसंगी शिवाजीराव पाटील, आनंदराव चव्हाण, नानासो चव्हाण, राजकुमार पाटील, सचिन चव्हाण. सतिष चव्हाण, मनोजकुमार पाटील, उत्तम भोपते, निवास चव्हाण, वसंत चव्हाण, राजेंद्र पवार, अजय भोपते, मनोजकुमार पाटील, रोहित चव्हाण, मन्सूर शेख, पोलीस पाटील गौस शेख, आझाद शेख, सलीम शेख, जावेद शेख, फारुख शेख तसेच भाविक - भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

सह्याद्री न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) पाटणतालुक्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा

Image
सह्याद्री न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)  पाटणतालुक्यात  प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरात १२ वाजून ३० मिनिटांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळा हजारो भविकांच्या उपस्थितीत सत् सीता राम कि जय रामा हो रामाच्या जय गजरात ढोल तास गुलाल खोबऱ्यांची उधळन करत प्रचंड उत्साह आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.त्यानंतर राम दर्शनासाठी भाविकांनी गदीँ केली होती.    गुरुवारी सकाळी पहाटे पासूनच  श्रीराम मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी  उपस्थिती लावली होती.या यात्रेत नवमी .दशमी आणि एकादशी हे तीन मुख्य दिवस असून या यात्रेला गुडीपाडव्या पासून पारंभ होवून ती पुढे १० दिवस चालते जन्मकाळानंतर भाविकांना समर्थ सभागृहात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.कुष्णत क्षीरसागर यांचे काल्याचे कीर्तन झाले. या जन्मउत्सव विधीचे पौरोहित्य सोहम कुलकरणी यांनी केले.पाळणा गीता नतंर श्री रामाला भूषण स्वामी यांच्या ओट्यात देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रसाद स्वामी उपस्थित होते.कार्यक्रमानतंर दोन्ही प्रवेवद्वारांवर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.पहाटेपासून काकड आरती १३ मंदिर प्रदक्षिणा आणि अन्य धार्मिक कार्यक्रम सुरु

सह्याद्री वार्ता न्यूज नेटवर्क कराड (असलं मुल्ला) शेणोली ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

Image
शेणोली येथील कराड तासगाव राज्य महामार्ग रोडवरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या रोड चे काम गेली अनेक दिवस अपूर्ण असलेने. येणाऱ्या व जाणाऱ्या अवजड वाहणामुळे उडणाऱ्या धुलीचा त्रास तेथे राहणाऱ्या ग्रामस्थ. तशेच माध्यमिक शाळेतील मुले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणारे पेशंट यांना होत असून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून. पुलाच्या नजीक गावात येणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे टू व्हिलर गाड्या स्लिप होऊन अपघात होत आहेत. तरी पुलाच्या दोन्ही बाजूकडील व गावात जाणारे रस्ते त्वरित डांबरीकरण करून मिळावे अन्यथा ग्रामस्ताकडून रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन कराडचे तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले. याची दखल घेऊन तहसीलदार यांनी लगेंच संबंधित विभागाशी फोनवरू विचारणा केली असता 10 ते 15 दिवसात काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसें नाही झालेस पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शेणोली गावचे सरपंच विक्रम कणसे. शिवसेना ठाकरे गटाचे  अध्यक्ष अमोल कणसे. राजेंद्र कणसे अप्पा. मछिंद्र गुरव. सुहास कणसे. अंकुश कणसे. निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड सदाशिवगड परिसराच्या वतीने सदाशिवगड आरोग्य केंद्राचे प्रमुख मा.श्री.डॉ.संजय कुंभार यांची कराड तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल व पैलवान कु.वेदांतिका अतुल पवार.महिला कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मध्ये सुवर्णपदके मिळवल्याबद्दल.सदाशिवगड परिसराच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न झाला.

Image
*सदाशिवगड परिसराच्या वतीने सदाशिवगड आरोग्य केंद्राचे प्रमुख मा.श्री.डॉ.संजय कुंभार यांची कराड तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल व पैलवान कु.वेदांतिका अतुल पवार.महिला कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मध्ये सुवर्णपदके मिळवल्याबद्दल.सदाशिवगड परिसराच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न झाला.* *प्रमुख उपस्थिती सन्माननीय कराड उत्तर भारतीय जनता पक्षाचे नेते.मा.श्री.मनोज दादा घोरपडे, वर्धन ऍग्रो साखर कारखान्याचे चेअरमन.मा.श्री.धैर्यशील दादा कदम, प्रदेश भाजपचे सचिव. मा.श्री.रामकृष्ण वेताळ साहेब, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री.सागर जी शिवदास, काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माझी पंचायत समिती सदस्य मा.श्री.दीपक लिमकर,खरेदी विक्री संघाचे संचालक.मा.श्री.प्रकाश पवार, पै.मा.श्री.अतुल पवार,सरपंच. मा. श्री.शिवाजी डुबल  ग्रामपंचायत सदस्य.मा.श्री विनोद डुबल,ग्रामपंचायत सदस्या सौ.संगीता डुबल काकी ,ग्रामपंचायत सदस्य.सौ. सारिका लिमकर,ग्रामपंचायत सदस्या. सौ.राजश्री पवार, डॉ.सौ.सुनीता थोरात, सदाशिवगड सोसायटी संचालक मा.श्री.विजय भोसले युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.श्री.तुषार लोंढे,माजी उपसरपंच मा.श्री.सतीश पवार, भ

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराडडॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले मालखेड  ग्रामपंचायत उपसरपंच युवराज पवार मित्र समूहाच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मा श्री पंकज पाटील अध्यक्ष कराड तालुका पंचायतराज व ग्रामविकास विभाग भारतीय जनता पार्टी ,मा श्री नानासाहेब सावंत माजी पं.स.सदस्य पाटण , मा श्री तानाजी पाटील (आबा) माजी सोसायटी सदस्य साळशिरंबे  ह्यावेळी जेष्ठ नागरिक शिवाजी ठोंबरे व बलवन्त लोकरे सदस्य वि का स सेवा मालखेड तसेच संदिप मोहिते अध्यक्ष शाळा कमिटी निवास लोकरे भीमराव होवाल सदस्य ग्रा पं सदस्य मालखेड संजय पाटील मोहन लोकरे शंकर माने प्रभाकर माने शहाजी भोसले निवास भोसले  हणमंत कोळी मोहन पाटील नारायण जाधव भीमराव माने दत्तात्रय माने प्रताप माने माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी मालखेड राजेश माने प्रकाश लोकरे आनंदा बुरंगे शामराव भोसले ओंकार पाटील  विक्रम सूर्यवंशी अशोक ढाने आशुतोष पवार अनिकेत ठोंबरे उपस्थित होते

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्ककराड कराडच्या वेदांत नांगरेने अल्ट्रामॅन बनुन अमेरिकेत फडकवला भारताचा तिरंगा*

Image
*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्ककराड   कराडच्या वेदांत नांगरेने अल्ट्रामॅन बनुन अमेरिकेत फडकवला भारताचा तिरंगा* नुकत्याच अमेरिका येथील एरिझोना राज्यातील फिनिक्स येथे पार पडलेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेत कराडच्या वेदांत अभय नांगरे , वय 22 याने  भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी  पूर्ण केली व तेथे त्याला अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित करण्यात आले.  सात देशातील 21 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्यापैकी 16 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. यावेळी  स्पर्धेत वेदांत हा एकटाच भारताचे प्रतिनिधित्व  करत होता. अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धेत   तरुण भारतीय  अल्ट्रामॅन बनण्याचा मान वेदांतला मिळाला आहे. ही तीन दिवसांची खडतर अशी  ट्रायथलॉन स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी 10 किलोमीटर पोहणे व 150 किलोमीटर सायकलिंग करायचे असते दुसऱ्या दिवशी 275 किलोमीटर  सायकलिंग करायचे असते तर तिसऱ्या दिवशी 84 किलोमीटर रनिंग करायचे असते. प्रत्येक दिवसाचे अंतर स्पर्धकाला 12  तासाच्या आत पूर्ण करायचे असते.  वेदांतला हे अंतर पार करण्यासाठी तीन दिवसात एकूण 33 तास  46 मि लागले. दहा डिग्री अश्या थंड तापमाना मधून

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराडसातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह  माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही.  गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो. - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब

कराड विटा मार्गावर उसाच्या शेतालगत आडोशास एकत्रित जमून सशस्त्र दरोड्याची तयारी करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून पोलिसांनी

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड कराड विटा मार्गावर उसाच्या शेतालगत आडोशास एकत्रित जमून सशस्त्र दरोड्याची तयारी करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून पोलिसांनी 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतूसे, मिरची पुड, कोयता असा एकूण 9 लाख 11 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरील संशयिता विरुद्ध कराड शहर पोलीस ठाणेस दरोडा टाकण्याचे पूर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे व पत्ता पुढीप्रमाणे ः- सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी, ता.कराड जि.सातारा), अमित हणमंत कदम (रा. अंतवडी, ता.कराड जि.सातारा), अखिलेश सुरज नलवडे (रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड), धनंजय मारुती वाटकर (रा. सैदापूर- कराड), वाहीद बाबासाो मुल्ला (रा. विंग, ता. कराड जि. सातारा), रिजवान रज्जाक नदाफ (रा. मलकापूर- कराड), चेतन शाम देवकुळे (रा. बुधवार पेठ, महात्मा फुलेनगर कराड), बजरंग सुरेश माने (रा. बुधवार पेठ- कराड), हर्ष अनिल चंदवाणी (रा. मलकापूर- कराड), तुषार पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची-

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड*कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब*

Image
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड *कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब* *महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज कोयनानगर येथे कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसन प्रश्नी आंदोलक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.*  कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर व कायमस्वरूपी सोडवणे, हा शासनाचा उद्देश आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी एक साचेबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने काम सुरू केले आहे. तसेच ज्या धरणग्रस्तांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही त्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. पुनर्वसन योग्य जमिनीबाबतची यादी तलाठी सजा, ग्रामपंचायत येथे उपलब्ध करावी, तसेच लाभ द्यावयाच्या धरणग्रस्तांची यादी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने युद्ध पातळीवर काम करावे, अशा सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठक

पुणे - सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला

Image
पुणे - सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला समाजाला संत गाडगेबाबा यांनी  स्वच्छतेविषयी दिलेली शिकवण पुढे चालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत 'चा नारा दिला आहे.   या मोहिमेतून समाजात जनजागृती करण्यासाठी पुण्यातील भाजपा  कार्यकर्ते गिरीश खत्री यांच्या पुढाकाराने, 'नमो स्वच्छतेचा करंडक  ' हि मोहीम राबवण्यात आली. शहरातील ९० गृहनिर्माण सोसायटी मधील १२०० घरामध्ये २५ हजार लोंकांपर्यंत ४५ दिवस स्वच्छतेविषयी या मोहिमेतून  जनजागृती करण्यात आली. या स्पर्धेचे हे २ रे वर्ष आहे .  इतर धार्मिक उत्सवाप्रमाणे स्वच्छता हाही एक उत्सव व्हावा या उद्देशाने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला .  यावेळी स्वच्छता चळवळीत सहभागी झालेल्या गृहनिर्माण संस्थांना आणि दिव्यांगांना मंत्री चंद्रकांत पाटील , संगीतकार डॉ .सलील कुलकर्णी  यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

पुणे न्युज सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क*युगुलगीते, अभंग, गवळणीतून पुणेकरांना सांगीतिक

Image
- पुणे न्युज सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क *युगुलगीते, अभंग, गवळणीतून पुणेकरांना सांगीतिक मेजवानी* *गायक ऋषिकेश रानडे, शरयू दाते, धवल चांदवडकर यांचे  सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सव ; रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश* पुणे : लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे... श्रावणात घन निळा बरसला...आम्ही आनंदे नाचू गाऊ...खुलते इथे कळी...राधा ही बावरी...बाई माझ्या गं दुधात नाही पाणी... कानडा राजा पंढरीचा या भक्ती, युगुलगीत, अभंग आणि गवळण अशा विविध गीत प्रकारांच्या सादरीकरणाने गायक ऋषिकेश रानडे, धवल चांदवडकर, शरयू दाते यांनी अप्रतिम सांगितीक मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पाचव्या दिवशी गायक ऋषिकेश रानडे, धवल चांदवडकर, शरयू दाते व सहका-यांनी 'अनुभूती' हा कार्यक्रम सादर केला.  धवल चांदवडकर यांनी 'सूर निरागस हो' या गीताने मैफल

जनहिताय फाऊडेशन*च्या वतीने रूग्णांना फळे वाटप सामाजिक कार्यला मदत

Image
**जनहिताय फाऊडेशन*च्या वतीने रूग्णांना फळे वाटप सामाजिक कार्यला मदत  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना तसेच कर्मचारी,आरोग्य सेविका यांना फळे वाटप करणेत आले, यावेळी जनहिताय फाऊडेशनचे अध्यक्ष मा.बापूसाहेब लांडगे, मा. शांताराम थोरवडे (दादा)  मा.निशांत ढेकळे, मा.राजेंद्र ताटे, मा.पोपट कांबळे, मा.राहुल भोसले (भैया), मा.किशोर आठवले, मा.कांचन थोरवडे, मा.मयूर लोंढे, मा.सुदेश थोरवडे, मा.पंकज काटरे, मा.नितीन थोरवडे, मा.संजय रुद्राक्ष, मा.आप्पा शिंदे व इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फळे वाटप कार्यक्रम पार पाडण्यात आला.

उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत की🚓*

*🚓उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत की🚓*           *सध्या रात्रीची बंद घरे फोडणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झालेली आहे*           त्यामुळे *सर्वांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक* आहे    1) गावातील *मा.सरपंचांनी गावातील CCTV कॅमेरे चालु* ठेवावेत तसेच गावातील *सर्व लाईट चालु ठेवावेत*.(गावातील नागरिकांनी सरपंच यांचेशी संपर्कात राहुन गावातील CCTV कॅमेरे चालु करून घ्यावेत)       2) नागरिकांनी *बंद घरामध्ये मौल्यवान वस्तू ठेवु नयेत* तसेच बाहेर गावी जाताना शेजारी लोकांना लक्ष ठेवण्यास सांगावे.     3) बरेच नागरिक रात्रीची घराबाहेरचे लाईट बंद करत आहेत.कृपया *आपले घरांचे सुरक्षा करीता तरी लाईट चालु* ठेवाव्यात      4) दिवसा गावांमध्ये येणारे *फेरिस्ते व अनोळखी व्यक्ती बाबत माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटील व पोलीस स्टेशन ला द्या*.संशियत व्यक्ती वाटत असल्यास मोबाईल मध्ये फोटो काढा,आधार कार्ड चेक करा.   5) सर्व *दुकानदार व व्यवसायिक यांनी सुध्दा आपले दुकानात व दुकानाचे बाहेरचे दिसेल असे CCTV कॅमेरे* बसवुन घ्यावेत व संध्याकाळची आपले *दुकान बाहेरीची लाईट चालु* ठेवावी    6

सह्याद्रि सहकारी साखर ; कारखान्याचा सन २०२२-२३ हा ४९ वा गळीत हंगाम अंतिम टप्यात

Image
 कराड :                                                          सह्याद्रि सहकारी साखर ; कारखान्याचा सन        २०२२-२३ हा ४९ वा गळीत हंगाम अंतिम टप्प्यावर आला असून, ऊसाने भरलेली वाहने गुलालाची उधळण आणि ढोल ताशांसह मिरवणूकीने गाळपासाठी कारखान्याकडे दाखल होत आहेत. आज कारखान्याच्या यशवंतनगर शेती विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नडशी या गावातून उसाने भरलेली वाहने कारखान्याकडे दाखल झाली. म्हसवड सेंटर वरून आलेल्या ऊसतोड कामगारांनी स्वखर्चाने डॉल्बी लावून अत्यंत उस्फुर्तपणे नाचून आनंद व्यक्त केला.  गेल्या चार महिन्यांपासून आपले कुटुंबिय व नातेवाईक यांना सोडून कारखान्याकडे ऊसतोड करण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांना हंगाम संपल्यावर गावाकडे जाण्याची ओढ असल्याने उसतोड कामगार आनंदित आहेत.

माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Image
माजी सहकार मंत्री आमदार  बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश . दिनांक 24 मार्च 2023 रोजी राज्य शासनाने व आयोगाने दखल घेऊन निरीक्षक वैद्यमापनशास्त्र गट 'ब' या जाहिरातीसाठी शुद्धिपत्रक  केले जाहीर . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रदर्शित केलेल्या भरती मधील निरीक्षक वैद्यमापनशास्त्र या पदासाठी शैक्षणिक अर्हता   संदर्भात प्रशासकीय त्रुटीमुळे अनेक समतुल्य पदवीधारकांचे अर्ज आयोग स्वीकारत नव्हते. त्यामुळे लाखो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहत होते, ही गोष्ट विद्यार्थी शिष्टमंडळ तसेच राजन काळे, प्रताप मस्कर, वैभव चाळके, आकाश ठोंबरे,  अनिल डाकवे, संदीप सावंत, संजय मानुसरे, सरपंच संजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांना भेटून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून प्रशासकीय कामांमध्ये झालेली त्रुटी दूर करून संबंधित आयोगाला समतुल्य   पात्र विद्यार्थ्यांचे फॉर्म स्वीकारण्यास भाग पाडले. याबाबतचे शुद्धीपत्रक शासनाच्या अधिकृत पेजवरून प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक

नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला : खा.श्रीनिवास पाटीललोकसभेत मागणी ; जिल्ह्यातील नद्यांचे संवर्धन गरजेचे

Image
नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला : खा.श्रीनिवास पाटील लोकसभेत मागणी ; जिल्ह्यातील नद्यांचे संवर्धन गरजेचे  कराड : प्रतिनिधी        जल प्रदुषण टाळण्यासाठी आवश्यक पाऊले उचलणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी कोणते उपाय केले आहेत असा प्रश्न उपस्थित करत नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.      लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार श्रीनिवास पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध मुद्द्यांवरती आवाज उठवत असून त्यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी प्रदूषण संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. नदीचे पाणी प्रदूषण समस्या सोडवण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का? असा सवाल त्यांनी केला. खा.पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी उत्तर पाठवले आहे.        केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) राष्ट्रीय पाणी गुणवत्ता निरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ४ हजार ४८४ मॉनिटरिंग स्टेशनच्या नेटवर्कद्वारे देशात वेळोवेळी नद्या आणि इतर जलस्रोता

टेंभु उपसासिंचन योजनेचे पाणी कराड तालुक्यातील शामगांव या गावाला मिळण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी विधानभवनात केली मागणी.

Image
टेंभु उपसासिंचन योजनेचे पाणी कराड तालुक्यातील शामगांव या गावाला मिळण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी विधानभवनात केली मागणी. टेंभु उपसासिंचन योजनेचे पाणी कराड तालुक्यातील टेंभु या गावापासून उचलण्यात येते, ते पाणी पुढे दुष्काळी भागाला जात असताना कराड तालुक्यातील दोन गावांना त्याचा लाभ होतो, परंतु कराड तालुक्यातील शामगांव गावाच्या शेजारी असणाऱ्या बोंबाळेवाडी तलावातून हे पाणी पुढे खानापूर तालुक्यातून पुढे आटपाडीकडे जाते, त्या योजनेचे पाणी शामगांव गावाला उपलब्ध होण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मागणी केली आहे, तरी या गावाला पाणी मिळण्यासाठी ही योजना  हातामध्ये घेणार आहात का असा प्रश्न आमदार बाळासाहेब पाटील यांनी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान उपस्थित केला.

कराड व मलकापूर च्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज

Image
*कराड व मलकापूर च्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज  *कराड:* टेंभू योजनेच्या बंधार्‍यामुळे बॅक वॉटरची फुग कराड शहर ते वारुंजी पर्यंत असते. हे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने त्या ठिकाणी खड्डा पडतो व पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कराड व मलकापूर शहराचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कराड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. पण दोन्ही शहराचे सोडलेल्या सांडपाण्यामुळे  व टेंभूचे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही व काही वेळेला रोगराई सुद्धा पसरते, पुराच्या वेळी पाणी अत्यंत खराब येत असल्याचे दिसते यामुळे वारुंजी येथे बंधार्‍याचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण केले जावे जेणेकरून कोयना नदीचे स्वच्छ पाणी नगरपालिकेकडून उचलले जाईल व ते पाणी दोन्ही शहरांना मिळेल. तसेच टेंभू योजनेच्या फुगीचे पाणी वारुंजी बंधार्‍याच्या पुढे अडविले जाईल. असा कराड शहरासाठी महत्वाचा प्रश्न आज विधानसभेतील चर्चेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच टेंभू योजनेमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्य

यशोवृक्ष अग्रो प्रायव्हेट लिमिटेड सोनालीका ट्रॅक्टर कराड यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त ट्रॅक्टर विक्रीचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न

Image
यशोवृक्ष अग्रो प्रायव्हेट लिमिटेड  सोनालीका ट्रॅक्टर कराड  यांच्या वतीने  गुढीपाडव्यानिमित्त ट्रॅक्टर विक्रीचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न सोनालीला ट्रॅक्टर कराड यांच्या वतीने ट्रॅक्टर विक्रीचा भव्य शुभारंभ मा.मानसिंगराव नाईक भाऊ तसेच पांडुरंग सहकारी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर  डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यशोवृक्ष चे डायरेक्ट अनुप कुलकर्णी तसेच युवा उद्योजक अच्युत कुलकर्णी  यांच्या वतीने  कराड या ठिकाणी उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला... त्याचबरोबर या कार्यक्रमात प्रसंगी शेतकरी बांधव सर्व कर्मचारी वृंद सोनालीका ट्रॅक्टर कंपनीचे अधिकारी वर्ग  व सर्व हितचिंतक  यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी  नाटोली गावचे सरपंच सुहास पाटील भाऊ.. प्रचिती  दूध संघाचे संचालक अनिल पाटील साहेब.. ज्येष्ठ गुरुवर्य  चव्हाण सर धामणी गावचे  ज्येष्ठ नागरिक  रयत सहकारी कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील . उद्योजक चंद्रकांत कदम, पंकज पाटील फौजी प्रकाश कुलकर्णी.. व कराड जनता बँकेचे  शाखाप्रमुख  पी आर कुलकर्णी उपस्थित होते. *शेतकऱ्यांना मिळणारी सुविधा* शेतकऱ्यांसाठी

जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता

Image
जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता १२३ दिवसांत ६,३३,२०७ मेट्रीक टन ऊसगाळप; ७,०४,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन कराड, ता. २२ : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेडच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला. धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण १२३ दिवसांच्या गळीत हंगामात ६ लाख ३३ हजार २०७ मेट्रीक टन ऊस गाळप केले असून, ७ लाख ४ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी साखर उतारा १२.४९ टक्के इतका राहिलेला आहे. हंगाम सांगता सोहळ्याच्या निमित्ताने कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात सर्वाधिक ऊसवाहतूक करणार्‍या तोडणी वाहतूकदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये कृष्णा काशीद, नवनाथ आरसुळ, भाऊसाहेब काशीद, बजरंग धोत्रे, अशोक पवार, किशोर मुळक, संतोष ढाकणे, सुंदर पोळ, हनुमान भिगले, बाबू शेंबडे या तोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला.  प्रारंभी कारखान्यातील मिल फ

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम रात्री उशिरा सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित व लक्ष लागून राहिलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. दि. 27 मार्च ते दि.3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. प्रत्यक्ष मतदान दि. 28 एप्रिलला होऊन त्यानंतर तीन दिवसांत निकाल जाहीर होतील. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे    27 मार्च ते 3 एप्रिल अर्ज दाखल करणे. 5 एप्रिल अर्जाची छाननी होणार. 6 एप्रिल ते 20 अर्ज माघारीचा कालावधी. 21 एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार. 28 एप्रिल मतदान होणार असून तीन दिवसांनी मतमोजणी व निकाल.

वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना

Image
वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना   मराठी माध्यमाच्या १९९६-९७ च्या बॅचच्या पुढाकार ः शिवाजी शिक्षण संस्थेकडूनही सर्वतोपरी सहकार्याचे जंयत पाटील अश्वासन  कऱ्हा़ड, ता. २० ः वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या १९९६-९७ च्या मराठी माध्यमाच्या अखेरच्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी २५ वर्षानी घेतलेल्या गेट टुगदेरच्या कार्यक्रमात कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्याची घोषणा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जंयत पाटील यांनी केली.  वेणूताई चव्हाण महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून तब्बल २५ वर्षांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी प्राचार्या प. ता. थोरात, माजी प्रचार्य बी. ए. कालेकर, विद्यमान प्राचार्य एल. बी. जाधव, प्रा. सुनील फलटणकर, प्रा. व्ही. व्ही जगदाळे, प्रा. बी. जाधव, प्रा. घोरपडे, प्रा. सौ. नागरे-पाटील, जिवाजी कांबळे, तानाजी काटकर आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थीत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. दिवसभर चालेल्या कार्यक्रमात अनेकविध कार्यक्रमांचे आय़ोजन केले होते. मृत झालेल्यांना श्रध्दांजली, गुरूजना

शिक्षकांना अशैक्षणिक कामे नकोत : खा.श्रीनिवास पाटील

Image
शिक्षकांना अशैक्षणिक कामे नकोत : खा.श्रीनिवास पाटील कराड : प्रतिनिधी       शाळेत जेवण बनवण्यासह निवडणूक संदर्भातील कामे, सर्वेक्षण, माहिती संकलीत करणे, वेळोवेळी येणाऱ्या सरकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे यासारखी अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.       लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खा.श्रीनिवास पाटील यांनी अशैक्षणिक कामामध्ये शिक्षकांनी घालवलेला वेळ हा अवाजवी असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा भार कमी करण्यासाठी सरकारने कोणती पाऊले उचलली आहेत असा तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पाठवले आहे.      राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तसेच बालकांचा मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायदा २००९ मधील तरतुदींनुसार तसेच वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, शिक्षकांना शक्य तितक्या अ-शैक्षणिक कर्तव्यांसाठी तैनात केले जाणार नाही. बा

राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये

Image
राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मागणी  ·       हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विशेष बैठकीचे मंत्र्यांचे आश्वासन  कराड: कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कराड-चिपळूण रेल्वे मार्ग राजकीय टोलवा-टोलवीमध्ये बारगळू नये तसेच या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले होते, शासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असतानाच भूमिपूजन होत असते तरीसुद्धा हा प्रकल्प कसा काय बारगळला? यामुळे कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद केली जावी व हा प्रकल्प तात्काळ मार्गी लागावा अशी मागणी आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.  अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र व कोकण या दोन विभागांना जोडणारा रेल्वे मार्ग कराड ते चिपळूण या प्रकल्पाची संकल्पना अनेक वर्षे चर्चेमध्ये आहे. तत्कालीन आघाडी सरकारने प्रकल्पाच्या खर्चामध्ये रेल्वे व राज्य सरकार ५० -५० टक्के वाटा घेणार अशी भूमिका घेतल

प्रवीणसिंह परदेशी भा.प्र.से. जेष्ठ सनदी अधिकारी यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी निवड

Image
प्रवीणसिंह परदेशी भा.प्र.से. जेष्ठ सनदी अधिकारी यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी निवड प्रवीणसिंह परदेशी भा.प्र.से. निवृत्त जेष्ठ सनदी अधिकारी यांची भारतातील सर्वात प्राचीन व प्रख्यात अश्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ते सध्या या संस्थेचे  उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.  BNHS चा गव्हर्निंग कौन्सिलने आता त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य रोहन भाटे , उषा लचुंगपा, डॉ.अनिश अंधेरिया , केदार गोरे , पिटर लोबो , कुलोज्योती लाखर , डॉ रघुनंदन चुंडावत , डॉ. आसद रहमानी ,  डॉ.शुभालक्ष्मी, डॉ. परवेश पांड्या, उपाध्यक्ष श्लोका नाथ,  कोषाध्यक्ष कुंजन गांधी यांनी परदेशी यांची एकमताने निवड केली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS), भारतातील  वन्यजीव संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून ती 1883 पासून  मागील १४० वर्षांपासून निसर्ग संवर्धनासाठी भारतात व भारताबाहेर मोठे काम करीत आहे.अनेक पक्षी व वन्यजीव संशोधन, निसर्ग शिक्षण आणि जनजागृतीवर आधारित कृतीद्व