कराड विटा मार्गावर उसाच्या शेतालगत आडोशास एकत्रित जमून सशस्त्र दरोड्याची तयारी करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून पोलिसांनी
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
कराड विटा मार्गावर उसाच्या शेतालगत आडोशास एकत्रित जमून सशस्त्र दरोड्याची तयारी करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून पोलिसांनी 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतूसे, मिरची पुड, कोयता असा एकूण 9 लाख 11 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरील संशयिता विरुद्ध कराड शहर पोलीस ठाणेस दरोडा टाकण्याचे पूर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे व पत्ता पुढीप्रमाणे ः- सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी, ता.कराड जि.सातारा), अमित हणमंत कदम (रा. अंतवडी, ता.कराड जि.सातारा), अखिलेश सुरज नलवडे (रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड), धनंजय मारुती वाटकर (रा. सैदापूर- कराड), वाहीद बाबासाो मुल्ला (रा. विंग, ता. कराड जि. सातारा), रिजवान रज्जाक नदाफ (रा. मलकापूर- कराड), चेतन शाम देवकुळे (रा. बुधवार पेठ, महात्मा फुलेनगर कराड), बजरंग सुरेश माने (रा. बुधवार पेठ- कराड), हर्ष अनिल चंदवाणी (रा. मलकापूर- कराड), तुषार पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची- कराड) यांचा संशयित म्हणून समावेश आहे.
कराड येथे उपविभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सदरील घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहरात कोबिंग ऑपरेशन राबवित असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून मौजे राजमाची गावचे हद्दीत कराड ते विटा रोडवर जानाई मळाई मंदिराजवळ रस्त्याचे बाजूला असलेल्या उसाच्या शेताच्या जवळ काही इसम जमून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने पोलिसांच्या पथकाने याबाबत माहिती देवुन वरील अधिकारी व पोलीस अंमलदार असे 2 पंचासह प्राप्त माहितीच्या लगेच रवाना झाले. नमुद ठिकाणी आल्यानंतर पथकास उसाच्या शेतालगत आडोशास सुमारे 8 ते 10 इसम उभे असल्याचे दिसले. नमुद इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची चाहुल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमुद इसमांना ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून 9 लाख 11 हजार 900 रुपये किमतीच्या 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतूसे, मिरची पुड, कोयता असा मुद्देमाल जप्त केला असून त्यांचे विरुद्ध कराड शहर पोलीस ठाणेस दरोडा टाकण्याचे पूर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांचे सूचनाप्रमाणे अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षण रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, उदय दळवी, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, निलेश काटकर, मोहन पवार, प्रविण कांबळे, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल प्रचार, सचिन ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, वैभव सावंत, कापरे, संभाजी साळूंखे, पंकज बेसके, येळवे, कुलदिप कोळी, अमित बाघमारे, सज्जन जगताप, सचिन निकम, सागर बर्गे यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभाग घेतला.
Comments
Post a Comment