जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता

जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता

१२३ दिवसांत ६,३३,२०७ मेट्रीक टन ऊसगाळप; ७,०४,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन

कराड, ता. २२ : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेडच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला.

धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण १२३ दिवसांच्या गळीत हंगामात ६ लाख ३३ हजार २०७ मेट्रीक टन ऊस गाळप केले असून, ७ लाख ४ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी साखर उतारा १२.४९ टक्के इतका राहिलेला आहे. हंगाम सांगता सोहळ्याच्या निमित्ताने कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात सर्वाधिक ऊसवाहतूक करणार्‍या तोडणी वाहतूकदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये कृष्णा काशीद, नवनाथ आरसुळ, भाऊसाहेब काशीद, बजरंग धोत्रे, अशोक पवार, किशोर मुळक, संतोष ढाकणे, सुंदर पोळ, हनुमान भिगले, बाबू शेंबडे या तोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला. 

प्रारंभी कारखान्यातील मिल फिटर गजानन पाटील आणि सौ. स्वाती पाटील या दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. कार्यक्रमाला जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, उपसरव्यवस्थापक (टेक्निकल) आर. आर. इजाते, चीफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, मनुष्यबळ विकास अधिकारी संजय भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, डेप्युटी चीफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, डिस्टीलरी विभागप्रमुख व्ही.  जी.  म्हसवडे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिंदे, सुरक्षा अधिकारी विठ्ठल भोसले, केनयार्ड सुपरवायझर एस. एम. सोमदे, ए. एम. गोरे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त