उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत की🚓*

*🚓उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत की🚓*

          *सध्या रात्रीची बंद घरे फोडणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झालेली आहे* 

         त्यामुळे *सर्वांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक* आहे

   1) गावातील *मा.सरपंचांनी गावातील CCTV कॅमेरे चालु* ठेवावेत तसेच गावातील *सर्व लाईट चालु ठेवावेत*.(गावातील नागरिकांनी सरपंच यांचेशी संपर्कात राहुन गावातील CCTV कॅमेरे चालु करून घ्यावेत) 

     2) नागरिकांनी *बंद घरामध्ये मौल्यवान वस्तू ठेवु नयेत* तसेच बाहेर गावी जाताना शेजारी लोकांना लक्ष ठेवण्यास सांगावे.

    3) बरेच नागरिक रात्रीची घराबाहेरचे लाईट बंद करत आहेत.कृपया *आपले घरांचे सुरक्षा करीता तरी लाईट चालु* ठेवाव्यात 

    4) दिवसा गावांमध्ये येणारे *फेरिस्ते व अनोळखी व्यक्ती बाबत माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटील व पोलीस स्टेशन ला द्या*.संशियत व्यक्ती वाटत असल्यास मोबाईल मध्ये फोटो काढा,आधार कार्ड चेक करा.

  5) सर्व *दुकानदार व व्यवसायिक यांनी सुध्दा आपले दुकानात व दुकानाचे बाहेरचे दिसेल असे CCTV कॅमेरे* बसवुन घ्यावेत व संध्याकाळची आपले *दुकान बाहेरीची लाईट चालु* ठेवावी

   6) गावातील पोलीस पाटील यांचे संपर्कात राहुन गावातील तरुण मुलांनी *आठवड्यातून एक दिवस गावांमध्ये गावाचे सुरक्षा करती गस्ती साठी पोलीसांना सहकार्य* करावे.

    7) सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.कुठे कोणी *संशयित दिसल्यास ,बिगर नंबरची गाडी दिसल्यास* तात्काळ पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा 

        कृपया सर्व नागरिकांनी आपले दैनंदिन काम करत असताना  *संशयित व्यक्ती बाबत माहिती वेळेत पोलीस स्टेशन ला दिल्यास पुढच्या बरेच घटना टळु* शकतात

        *तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे*

         *(अजय गोरड)*
     *सहा.पोलीस निरीक्षक*
     *उंब्रज पोलीस स्टेशन*
     *मो.न.9623961000*

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.