कराड व मलकापूर च्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज
*कराड व मलकापूर च्या स्वच्छ पाण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उठविला आवाज
*कराड:* टेंभू योजनेच्या बंधार्यामुळे बॅक वॉटरची फुग कराड शहर ते वारुंजी पर्यंत असते. हे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने त्या ठिकाणी खड्डा पडतो व पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कराड व मलकापूर शहराचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कराड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. पण दोन्ही शहराचे सोडलेल्या सांडपाण्यामुळे व टेंभूचे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही व काही वेळेला रोगराई सुद्धा पसरते, पुराच्या वेळी पाणी अत्यंत खराब येत असल्याचे दिसते यामुळे वारुंजी येथे बंधार्याचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण केले जावे जेणेकरून कोयना नदीचे स्वच्छ पाणी नगरपालिकेकडून उचलले जाईल व ते पाणी दोन्ही शहरांना मिळेल. तसेच टेंभू योजनेच्या फुगीचे पाणी वारुंजी बंधार्याच्या पुढे अडविले जाईल. असा कराड शहरासाठी महत्वाचा प्रश्न आज विधानसभेतील चर्चेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
तसेच टेंभू योजनेमध्ये अनेक शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत तसेच त्यांना पूर्ण मोबदला सुद्धा अजून मिळालेला नाही तर अशा शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा अशी सुद्धा मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.
Comments
Post a Comment