सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड*कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब*
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
*कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब*
*महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज कोयनानगर येथे कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसन प्रश्नी आंदोलक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.*
कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर व कायमस्वरूपी सोडवणे, हा शासनाचा उद्देश आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी एक साचेबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने काम सुरू केले आहे. तसेच ज्या धरणग्रस्तांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही त्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. पुनर्वसन योग्य जमिनीबाबतची यादी तलाठी सजा, ग्रामपंचायत येथे उपलब्ध करावी, तसेच लाभ द्यावयाच्या धरणग्रस्तांची यादी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने युद्ध पातळीवर काम करावे, अशा सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीनंतर मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत एक महिन्याच्या आत बैठक लावणार असल्याचे त्यांनी यावेळी आश्वस्त केले. त्याबाबतचे पत्र मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आंदोलनकर्त्यांना देऊन या प्रश्नाविषयी सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. यास आंदोलनाचे नेते मा. भारत पाटणकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उद्या आंदोलन स्थगित करण्याचे मान्य केले.
Comments
Post a Comment