सह्याद्री न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) पाटणतालुक्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा

सह्याद्री न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)
 पाटणतालुक्यात  प्रसिद्ध तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरात १२ वाजून ३० मिनिटांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळा हजारो भविकांच्या उपस्थितीत सत् सीता राम कि जय रामा हो रामाच्या जय गजरात ढोल तास गुलाल खोबऱ्यांची उधळन करत प्रचंड उत्साह आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.त्यानंतर राम दर्शनासाठी भाविकांनी गदीँ केली होती. 
  गुरुवारी सकाळी पहाटे पासूनच  श्रीराम मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी  उपस्थिती लावली होती.या यात्रेत नवमी .दशमी आणि एकादशी हे तीन मुख्य दिवस असून या यात्रेला गुडीपाडव्या पासून पारंभ होवून ती पुढे १० दिवस चालते जन्मकाळानंतर भाविकांना समर्थ सभागृहात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.कुष्णत क्षीरसागर यांचे काल्याचे कीर्तन झाले. या जन्मउत्सव विधीचे पौरोहित्य सोहम कुलकरणी यांनी केले.पाळणा गीता नतंर श्री रामाला भूषण स्वामी यांच्या ओट्यात देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रसाद स्वामी उपस्थित होते.कार्यक्रमानतंर दोन्ही प्रवेवद्वारांवर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.पहाटेपासून काकड आरती १३ मंदिर प्रदक्षिणा आणि अन्य धार्मिक कार्यक्रम सुरु होते.दशमीला समर्थ वंशज स्वामी भिक्षावळीसाठी जातात.दशमीला सूर्यदयापूवी श्री रामाची विमानरुपी पालखीत प्रतिष्ठापना करुन रथातून मिरवणूक काढली जाते. उत्सवासाठी विविध विक्रेत्यांनी येथे गदीँ केली आहे. भविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय देवस्थान ट्स्ट आणि चाफळ ग्रामपंचायतीने केली आहे. कराड ,पाटण येथून जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत.मल्हारपेठ पोलिस स्टेशनचे सपोनि उत्तम भापकर उपपोलिस निरीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाफळ पोलिस दूरक्षेत्राचे मनोहर सुर्वे सिध्दनाथ शेडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच उत्तरमांड धरणातून यात्रेनिमित्त उत्तरमांड नदीच्या पात्रत पाणी सोडण्यात आले आहे. . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक  भाविक भक्तांनी मंदिरात यात्रेनिमित्त उपस्थिती लावली आहे.शनिवारी सकाळी रथ उत्सव नंतर दुपारी तीन वाजता जंगी कुस्तीचे मैदान झाल्यानंतर उत्सवाची सांगता होते..

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.