सह्याद्रि सहकारी साखर ; कारखान्याचा सन २०२२-२३ हा ४९ वा गळीत हंगाम अंतिम टप्यात
कराड : सह्याद्रि सहकारी साखर ; कारखान्याचा सन २०२२-२३ हा ४९ वा गळीत हंगाम अंतिम टप्प्यावर आला असून, ऊसाने भरलेली वाहने गुलालाची उधळण आणि ढोल ताशांसह मिरवणूकीने गाळपासाठी कारखान्याकडे दाखल होत आहेत.
आज कारखान्याच्या यशवंतनगर शेती विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नडशी या गावातून उसाने भरलेली वाहने कारखान्याकडे दाखल झाली. म्हसवड सेंटर वरून आलेल्या ऊसतोड कामगारांनी स्वखर्चाने डॉल्बी लावून अत्यंत उस्फुर्तपणे नाचून आनंद व्यक्त केला.
गेल्या चार महिन्यांपासून आपले कुटुंबिय व नातेवाईक यांना सोडून कारखान्याकडे ऊसतोड करण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांना हंगाम संपल्यावर गावाकडे जाण्याची ओढ असल्याने उसतोड कामगार आनंदित आहेत.
Comments
Post a Comment