पुणे - सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला

पुणे - सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला

समाजाला संत गाडगेबाबा यांनी  स्वच्छतेविषयी दिलेली शिकवण पुढे चालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत 'चा नारा दिला आहे.  
या मोहिमेतून समाजात जनजागृती करण्यासाठी पुण्यातील भाजपा  कार्यकर्ते गिरीश खत्री यांच्या पुढाकाराने, 'नमो स्वच्छतेचा करंडक  ' हि मोहीम राबवण्यात आली.

शहरातील ९० गृहनिर्माण सोसायटी मधील १२०० घरामध्ये २५ हजार लोंकांपर्यंत ४५ दिवस स्वच्छतेविषयी या मोहिमेतून  जनजागृती करण्यात आली.
या स्पर्धेचे हे २ रे वर्ष आहे .

 इतर धार्मिक उत्सवाप्रमाणे स्वच्छता हाही एक उत्सव व्हावा या उद्देशाने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला .

 यावेळी स्वच्छता चळवळीत सहभागी झालेल्या गृहनिर्माण संस्थांना आणि दिव्यांगांना मंत्री चंद्रकांत पाटील , संगीतकार डॉ .सलील कुलकर्णी  यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.