सह्याद्री वार्ता न्यूज नेटवर्क कराड (असलं मुल्ला) शेणोली ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

शेणोली येथील कराड तासगाव राज्य महामार्ग रोडवरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या रोड चे काम गेली अनेक दिवस अपूर्ण असलेने. येणाऱ्या व जाणाऱ्या अवजड वाहणामुळे उडणाऱ्या धुलीचा त्रास तेथे राहणाऱ्या ग्रामस्थ. तशेच माध्यमिक शाळेतील मुले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणारे पेशंट यांना होत असून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून. पुलाच्या नजीक गावात येणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे टू व्हिलर गाड्या स्लिप होऊन अपघात होत आहेत. तरी पुलाच्या दोन्ही बाजूकडील व गावात जाणारे रस्ते त्वरित डांबरीकरण करून मिळावे अन्यथा ग्रामस्ताकडून रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन कराडचे तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले.
याची दखल घेऊन तहसीलदार यांनी लगेंच संबंधित विभागाशी फोनवरू विचारणा केली असता 10 ते 15 दिवसात काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसें नाही झालेस पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी शेणोली गावचे सरपंच विक्रम कणसे. शिवसेना ठाकरे गटाचे  अध्यक्ष अमोल कणसे. राजेंद्र कणसे अप्पा. मछिंद्र गुरव. सुहास कणसे. अंकुश कणसे.
निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.