सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्ककराड कराडच्या वेदांत नांगरेने अल्ट्रामॅन बनुन अमेरिकेत फडकवला भारताचा तिरंगा*

*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्ककराड 
 कराडच्या वेदांत नांगरेने अल्ट्रामॅन बनुन अमेरिकेत फडकवला भारताचा तिरंगा*

नुकत्याच अमेरिका येथील एरिझोना राज्यातील फिनिक्स येथे पार पडलेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेत कराडच्या वेदांत अभय नांगरे , वय 22 याने  भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी  पूर्ण केली व तेथे त्याला अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित करण्यात आले. 
सात देशातील 21 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्यापैकी 16 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
यावेळी  स्पर्धेत वेदांत हा एकटाच भारताचे प्रतिनिधित्व  करत होता. अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धेत
  तरुण भारतीय  अल्ट्रामॅन बनण्याचा मान वेदांतला मिळाला आहे.
ही तीन दिवसांची खडतर अशी 
ट्रायथलॉन स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी 10 किलोमीटर पोहणे व 150 किलोमीटर सायकलिंग करायचे असते दुसऱ्या दिवशी 275 किलोमीटर  सायकलिंग करायचे असते तर तिसऱ्या दिवशी 84 किलोमीटर रनिंग करायचे असते. प्रत्येक दिवसाचे अंतर स्पर्धकाला 12  तासाच्या आत पूर्ण करायचे असते.  वेदांतला हे अंतर पार करण्यासाठी तीन दिवसात एकूण 33 तास  46 मि लागले.
दहा डिग्री अश्या थंड तापमाना मधून सलग साडेचार तास त्याला पोहावे लागले तसेच सायकलिंग व रनींगसाठी थंड वातावरणातून, वाऱ्यातून तसेच कठीण अश्या चढ उतारा वरून त्याला अंतर पूर्ण करावे लागले. 

या स्पर्धेत स्पर्धकाला सपोर्ट साठी त्याच्या  पुढे अथवा मागे कार सहित क्रु मेंबरची गरज असते जे आपल्या स्पर्धकाला योग्य कॅलारीचे खाणे देणे  ,रस्ता दाखविणे याकरता मदत करीत असतात ,यावेळी वेदांत बरोबर त्याची  आई सौ. कल्याणी नांगरे व  वडील श्री अभय नांगरे हे क्रु  मेंबर्स होते. याखेरीज अमेरिकेतील हवाई येथील या स्पर्धेचा अनेक वर्षाचा अनुभव असलेले क्रु म्हणून श्री बिली रिकार्ड्स हे होते. त्यांचे विशेष सहाय्य वेदांतला ही रेस पूर्ण करण्यासाठी झाले. 
या अगोदर वेदांतने जुलै 2022 मध्ये आयर्नमॅन ही स्पर्धा स्वित्झर्लंड
 येथे यशस्वी पूर्ण केली आहे.
अल्ट्रामॅन स्पर्धा अतिशय कठीण अशी समजली जाते .
जिद्द, चिकाटी ,नियोजन, परिश्रम ,त्याग ,योग्य गुरूंचे मार्गदर्शन तसेच इच्छाशक्तीचे जोरावर वेदांत या स्पर्धेमध्ये यश मिळवू शकला.
  
 अल्ट्रामॅन म्हणून  सन्मानित झाल्यावर खासदार  श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांनी वेदांतचे फोन वरून अभिनंदन केले तसेच अनेक भारतातील मित्र, नातेवाईक तसेच अमेरिकेतील अनेक भारतीयांनी वेदांतचे विशेष कौतुक केले.
अमेरिकेतील फिनिक्स मराठी मंडळाने त्याची विशेष मुलाखत घेवून त्याचा गौरव केला.
भारतामधून अमेरिकेत  येवून ही कठीण स्पर्धा यशस्वी केल्याने आम्हाला भारतीय म्हणून वेदांतचा खुप अभिमान आहे अश्या भावना येथे अनेकांनी व्यक्त केल्या.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.