माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

माजी सहकार मंत्री आमदार  बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

दिनांक 24 मार्च 2023 रोजी राज्य शासनाने व आयोगाने दखल घेऊन निरीक्षक वैद्यमापनशास्त्र गट 'ब' या जाहिरातीसाठी शुद्धिपत्रक  केले जाहीर .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रदर्शित केलेल्या भरती मधील निरीक्षक वैद्यमापनशास्त्र या पदासाठी शैक्षणिक अर्हता   संदर्भात प्रशासकीय त्रुटीमुळे अनेक समतुल्य पदवीधारकांचे अर्ज आयोग स्वीकारत नव्हते. त्यामुळे लाखो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहत होते, ही गोष्ट विद्यार्थी शिष्टमंडळ तसेच राजन काळे, प्रताप मस्कर, वैभव चाळके, आकाश ठोंबरे,  अनिल डाकवे, संदीप सावंत, संजय मानुसरे, सरपंच संजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांना भेटून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून प्रशासकीय कामांमध्ये झालेली त्रुटी दूर करून संबंधित आयोगाला समतुल्य   पात्र विद्यार्थ्यांचे फॉर्म स्वीकारण्यास भाग पाडले. याबाबतचे शुद्धीपत्रक शासनाच्या अधिकृत पेजवरून प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा निरीक्षक वैद्य मापन शास्त्र गट ब संवर्गाच्या अर्हतेबाबतचा  मार्ग मोकळा होणार आहे,  याबद्दल सर्व समतुल्य विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून आमदार बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त

*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश " राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क