शरद पवारांच्या पक्षावर दरोडा घालणाऱ्यांचा धिक्कारराष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला निषेध

शरद पवारांच्या पक्षावर दरोडा घालणाऱ्यांचा धिक्कार

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला निषेध

..
सातारा / प्रतिनिधी

आले शंभर गेले शंभर पवारसाहेबच एक नंबर, पवारसाहेब अंगार है.. बाकी सब भंगार है., या भाजपाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, पवार साहेबांच्या पक्षावर दरोडा घालणाऱ्या पक्षाचा धिक्कार, असो अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात महिलांनी निषेध आंदोलन केले. या आंदोलनामध्ये हातात काळ्या रेबीन बांधून निवडणूक आयोगाने दिलेल्या निणर्याचा निषेध नोदंवण्यात आला. यावेळी प्रा. कविता म्हेत्रे यांनी जोरदारपणे भाजपावर टीका केली.
सातारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, संमिद्रा जाधव, मोहिनी मिसाळ, प्रज्ञा गायकवाड, नूपुर नारनवर, सौ. मेघा नलावडे, डॉ. प्रियांका माने, रुपाली ननावरे, अनुराधा तरटे, नलिनी जाधव, तेजस्विनी केसरकर, शैलजा कदम आदी महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा निषेध नोदंवला.

प्रा. कविता म्हेत्रे या म्हणाल्या, निवडणूक आयोग हा भाजपाच्या हातातला बाहुले झालेला आहे. पवारसाहेबांनी पक्षाची स्थापना केली. पक्ष वाढवला आणि स्वत: ते हजर होते सर्व कायदेशीर बाबीमध्ये असे असताना सुप्रिम कोर्टाचे असे निर्देश आहेत की, आमदारांच्या खासदारांच्या संख्येवरुन ठरणार नाही तर तो ऑर्गनायझेशनवरुन ठरणार पक्ष कुणाचा आहे तो. असे असताना सुद्धा भाजपाला विकले गेलेला निवडणूक आयोग. पवारसाहेबांनी पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेला पक्ष नको त्याच्या गद्दारांच्या घशात घातला आहे. निवडणूक आयोगाचा येथे आम्ही निषेध करतो आहे. निवडणूक आयोगाच्या पाठीशी कोण आहे अदृश्य शक्ती भाजप आणि केंद्रात बसलेले मोदी आणि शहा हे लोकशाहीची हत्या करत आहेत. संविधानाचा खून करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या पक्षाचे चिन्हही काढले
गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकमार पाटील यांनी पक्ष कार्यालयावर लावलेले चिन्ह काढले चिन्ह काढताना राष्ट्रवादीच्या विद्यार्थी सेलचे पाटखळचे नेते अतुल शिंदे यांना अश्रू अनावर झाल्याचे अनेकांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.