*कराड नगर परिषद शाळा क्र. ३ चा पालक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन् सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला

*कराड नगर परिषद शाळा क्र. ३ चा पालक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन् सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला

आज कराड येथील नगर परिषद शाळा क्र. ३ कडून यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे आयोजित पालक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी कराड नगर परिषदेच्या ग्रंथालयाचीही पाहणी केली. १८५७ साली स्थापन झालेले हे ग्रंथालय नीटनेटके असून त्यात विविध विषयांवरील सुमारे १ लाख १८ हजार पुस्तके आहेत. ग्रंथसमृद्ध असे हे ग्रंथालय पाहून आनंद वाटल्याची भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी शाळा क्र. ३ च्या वाटचालीचा आढावा घेऊन उपस्थित पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, कराड नगर परिषदेची ही शाळा क्र. ३ महाराष्ट्रातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली आयएसओ मानांकन प्राप्त शाळा आहे, याचे समाधान आहे. तसेच शाळेच्या अंतर्गत विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे, याबद्दल कराड नगर परिषद आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी अभिनंदन केले. तसेच या शाळेचा समावेश जिल्हा आदर्श शाळा योजनेत केला जाईल आणि शाळेसाठी आवश्यक ते सहकार्य पालकमंत्री म्हणून नेहमीच राहील, असेही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी आश्वस्त केले.

याप्रसंगी दी कराड अर्बन को.ऑप. बँक लि. कराडचे अध्यक्ष मा. सुभाषराव एरम, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व शाळा क्र. ३ चे आधारस्तंभ मा. राजेंद्रसिंह यादव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.