कराड दक्षिणेतील १३१ कोटी ५५ लाखांच्या १०० विकासकामांचे बुधवारी भूमीपूजन

कराड दक्षिणेतील १३१ कोटी ५५ लाखांच्या १०० विकासकामांचे बुधवारी भूमीपूजन
 सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कराडच्या दौऱ्यावर; विविध कार्यक्रमांचे आयोजन

कराड, ता. ६ : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण बुधवारी (ता. ७) कराड दक्षिण मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कराड दक्षिणमध्ये भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे १३१ कोटी ५५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच ना. चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी (ता. ७) सायंकाळी ५ वाजता कापील वि. का. स. सेवा सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यास ना. रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते शताब्दी महोत्सव गौरव विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच कापील (ता. कराड) येथे डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या आटके – कटपानमळा ते कापील रस्ता सुधारणा (३ कोटी ५० लाख), गोळेश्वर पाण्याची टाकी ते कापील स्मशानभूमीपर्यंत रस्ता सुधारणा (५० लाख), कापील गावठाणाअंतर्गत रस्ता सुधारणा (१० लाख), कापील येथे सामाजिक सभागृह बांधणे (१० लाख) अशा एकूण ४ कोटी २० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण ना. चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 

त्यानंतर वाठार (ता. कराड) येथे सायंकाळी ७ वाजता ना. चव्हाण यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील १३१ कोटी ५५ लाख रुपयांच्या १०० विकासकामांचे भूमिपूजन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वाठार येथील म्हसोबा मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची सुधारणा (२ कोटी ५० लाख), वाठार ते कालवडे रस्ता सुधारणा (१ कोटी ५० लाख) व २५-१५ योजनेमधून अंतर्गत रस्ते सुधारणा (१० लाख) अशा एकूण ४ कोटी १० लाखांच्या विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण ना. चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण व ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या निधीतून आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणमध्ये मंजूर झालेल्या १३१ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचे ई-भूमिपूजन ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा व इतर मार्ग रस्त्यांची सुधारणा, नदीलगत संरक्षण भिंत उभारणी, पुलांचे बांधकाम व गटर बांधकाम करणे (७४ कोटी ८० लक्ष), ग्रामीण मार्ग रस्त्यांची सुधारणा (३४ कोटी २५ लक्ष), ३०-५४ मार्ग व पूल विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत रस्त्यांची सुधारणा (१२ कोटी ५० लक्ष), राज्य महामार्ग रस्त्यांची सुधारणे करणे (५ कोटी), २५-१५ योजनेअंतर्गत रस्त्यांची सुधारणा, सभामंडप उभारणी, स्मशानभूमी शेड उभारणी (५ कोटी) अशा सुमारे १०० विकासकामांचा समावेश आहे. 

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, बबनराव शिंदे, धोंडिराम जाधव, श्रीरंग देसाई, निवासराव थोरात, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, गुणवंतराव पाटील, बाजीराव निकम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांना कराड दक्षिणमधील ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी केले आहे. 


Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.