सर्व श्रमिक संघटनेची साताऱ्यात निदर्शनं

सर्व श्रमिक संघटनेची साताऱ्यात निदर्शनं

सातारा दि ८ ( प्रतिनिधी )

इपीएस ९५ योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, किमान ९ हजार रुपये पेन्शन दरमहा मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

इपीएस ९५ योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, किमान ९ हजार रुपये पेन्शन दरमहा मिळावी, पेन्शनला महागाई भत्ता देण्यात यावा. पेन्शनर व जोडीदाराला रेशन, प्रवास सवलत व वैद्यकीय सुविधा मोफत देण्यात यावी. प्रोराटा हिशोबाची पद्धत रद्द करावी. ११.४ कलम रद्द करून ११.३ कलम पुनर्स्थापित करण्यात यावे. पेन्शन पत्र वेतनासाठी असणारी ६० महिने सरासरीच्या पद्धत रद्द करण्यात यावी. इपीएस विभागीय कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत यासह अन्य मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली. 

यावेळी प्रमोद परमने, शंकर पाटील, धनाजी देशमुख, बजरंग वंजारी, उदय कदम, विजय शिंदे, उत्तम फडतरे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.