सातारा *एका आईला व पत्नीला करावा लागणार प्रत्येक त्याग रमाई ने बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी केला*

सातारा *एका आईला व पत्नीला करावा लागणार प्रत्येक त्याग रमाई ने बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी केला*

साताऱ्यात रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य रथातून मिरवणूक त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२६व्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्क कार्यालय ते शाहू चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते राजवाडा या मार्गे पोलीस मुख्यालय पोवई नाका या रस्त्यावरून अशृवरूडी रथातून महामाता रमाई यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांची व कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती असंख्य कार्यकर्ते मोटरसायकल व फोर व्हीलर मध्ये उपस्थित होते तसेच भव्य दिव्य अशा रथामध्ये माता रमाई यांची प्रतिमा ठेवून त्यामध्ये रिपाईच्या महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्या बसल्या होत्या माता रमाईच्या नावाच्या जयघोषाच्या घोषणा व बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले की , विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची सहचरणी म्हणून माता रमाई ने मोठा संघर्ष केला मुलांचे मृत्यू गरिबी यासोबतच संसारिक जबाबदाऱ्यासंबळत त्यांनी बाबासाहेबांना विनायतेला शनी गौर्या व लाकडाच्या मुळ्या विकून संसार प्रपंच चालून शिल्लक राहिलेले पैसे पाठवले आणि चळवळीला कधी अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्ष बाबासाहेबांना आधार दिला एका आईला व पत्नीला करावा लागणार प्रत्येक त्याग माता रमाईने बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी केला आज त्यांना अभिवादन करत असताना सांगावसं वाटतंय की गरिबी तरी त्या संसारात होती माझी भीमाला तरी साथ होती त्यागालाही वाटावी लाज नाही असा तुझा त्याग होता तुझ्या आत्या गाणे निर्माण झाला आम्हा साऱ्या लेकरांचा स्वाभिमान महासुर्याची सावली कोट्यावधीची माऊली माता रमाई होती अशा पद्धतीने प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाच्या पतीच्या व भावाच्या पाठीमागे राहो तरच येणाऱ्या काळामध्ये कुणी छत्रपती कुणी शिल्पकार कुणी महामानव असे व्यक्तिमत्व घडतील यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ओव्हाळ जिल्हा सचिव किरण बागडे जिल्हा सरचिटणीस युवकचे राज चव्हाण सातारा तालुका अध्यक्ष रामभाऊ मदळे कराड तालुका अध्यक्ष मुकुंद माने कराड उत्तरचे अध्यक्ष महेंद्र अमर कांबळे तालुका अध्यक्ष अमित मोरे दिगंबर कांबळे विशाल भोसले सचिन बंडलकर लोंढे साहेब दामिनी निंबाळकर स्मिता जगताप सुप्रिया येवले रंजना जाधव राकेश जाधव उत्तरेश्वर ओव्हाळ दादा गायकवाड संजय कांबळे अतुल कांबळे किरण ओव्हाळ आनंदा गाडीवडार  इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.