*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश " राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क

*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश  "  राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क 

बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये रात्री उशीरा जागण्याचा कल वाढत असल्याचं दिसून येत असल्याने त्यात सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप होत नाही आणि परिणामी मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत असल्याने तसेच अनेक पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात यामुळे खूपच त्रास व गैरसोयी ला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाजबाबा सुतार यांनी या समस्येला प्रकाश झोतात आणले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शिक्षणमंत्री दिपक केसरकर साहेब यांकडे सदर गैरसोय दुर करावी म्हणून निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली होती तसेच मेलद्वारे स्मरण करून देऊन पाठपुरावा केला होता. राज्य शासनाकडे या आशयाचे मागणीचे अनेक संस्था व नागरिक पालक सुद्धा टाहो फोडत होते. 

 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाजबाबा सुतार व जनतेतून होत असलेल्या मागणीची दखल घेऊन नुकतेच राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी मुंबईतील 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी राज्यपाल बैस यांनीही शाळेच्या वेळा बदलण्याची सुचना केली होती व त्यांच्या सूचनेनुसार आता.

 हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होणे, धुक्यांचा त्रास लवकर डबा तयार करणे आदी मोठी गैरसोय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाजबाबा सुतार यांच्यामुळे दुर झाल्याने विद्यार्थी व पालकांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असुन नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश मिळालेने त्यांचे सर्वत्र कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.