शहर काँग्रेसचा 'एक बूथ दहा युथ' उपक्रम प्रभावी - श्रीरंग चव्हाण*

कराड वार्ता सहयाद्री वार्ता 
शहर काँग्रेसचा 'एक बूथ दहा युथ' उपक्रम प्रभावी - श्रीरंग चव्हाण* 

 *कराड :* कराड शहर काँग्रेसचा एक बूथ दहा युथ हा उपक्रम आगामी निवडणुकामध्ये प्रभावी ठरणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस तथा जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी केले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार काम सुरु आहे. प्रत्येक तालुक्यात बूथ कमिटी पासून मंडल कमिटी पर्यंत संघटना बांधणी सुरु आहे. यामध्येच कराड शहर काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऋतुराज मोरे यांच्या प्रयत्नातून व युवकांच्या बांधणीमुळे आज कराड शहरात काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत असल्याचे दिसते. हे त्यांनी यशस्वीपणे राबविलेल्या एक बूथ दहा युथ या उपक्रमामुळेच. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव व प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी संपूर्ण जिल्ह्याचा तीन दिवस दौरा करून सर्व तालुक्याचा संघटनात्मक आढावा घेतला तिसऱ्या दिवशी नुकताच त्यांचा कराड दौरा संपन्न झाला असून या दौऱ्यात त्यांनी कराड शहर ब्लॉक कमिटीचा आढावा घेतला. यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी शहरातील काँग्रेस चा संघटनात्मक आढावा सांगितला. तसेच बूथ अधिक सक्षम करून बूथ निहाय कार्यकर्ता संघटन केले जाऊन मतदार जागृती करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हि आढावा बैठक जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, कराड शहर कॉग्रेस कमिटी अध्यक्ष ऋतुराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, सातारा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस अमोल नलवडे , माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, फारूक पटवेकर, साहेबराव शेवाळे, नितीन ओसवाल, गणेश सातारकर, मुबिन मुजावर, अमिर कटापुरे, योगेश लादे, ललित राजापुरे, गणेश गायकवाड आदिसह कराड शहर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.