चित्र म्हणजे मनान निर्विकार होणे :शिंदेदीपलक्ष्मी पतसंस्थेत चित्रकला कार्यशाळा उत्साहात

चित्र म्हणजे मनान निर्विकार होणे :शिंदे

दीपलक्ष्मी पतसंस्थेत चित्रकला कार्यशाळा उत्साहात

सातारा दि ८ ( प्रतिनिधी )

चित्रकलेचा विचार, चित्रकाराच्या मानसिकतेतून केला तर समोर असणाऱ्या रित्या कॅनव्हास वर भरलेलं ,कोंडलेलं, दबलेलं मन कॅनव्हास वर झोकून देऊन स्वतः निर्विकार होणे असते ,असे उद्गार जेष्ठ चित्रकार अभिजीत शिंदे यांनी काढले .

साहित्य कला वर्तक (साकव) तर्फे दीपलक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 यावेळी जेष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे,सचिन प्रभुणे, बाबा भोरे ,डॉक्टर राजश्री देशपांडे, एॅड. सीमांतिनी नुलकर ,मुकुंद फडके यांनी अभिजीत शिंदे यांच्याबरोबर संवाद साधत चित्रकले संदर्भातील मूलभूत सिद्धांत बाबत चर्चा केली. मधुसूदन पतकी यांनी सूत्रनिवेदन केले 

 अभिजीत शिंदे पुढे म्हणाले, प्रत्येक कलाकृतीत ताल ,तोल आणि लय याचा अविष्कार पाहायला मिळतो. याचा प्ररमोच्चबिंदू म्हणजे गोल्डन रेशो असतो. ज्या बिंदूमध्ये ताल तोल आणि लय याचे नितांत सुंदर मिश्रण झालेले आपल्याला पाहायला मिळते. अर्थात हे चित्र पाहताना लहान मुलाच्या निर्भेळ मानसिकतेतून पाहिले. पाहिजे मन जेवढे ताजेतवाने, टटवीत, प्रसन्न आणि त्यावर कोणतेही पूर्वाश्रमीचे संस्कार नसतील तर त्या चित्राचा आस्वाद आपल्याला अधिक घेता येतो. चित्र पाहणे किंवा काढणे यासाठी आपण स्वतःशी प्रामाणिक राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः चित्रकाराला प्रामाणिक राहून स्पष्टपणे जे आहे ते मांडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात विचार ,अनुभव, संवेदना, भावभावना या सगळ्याचाच समुच्चय होत असतो. सृजनशीलते मध्ये बंडखोरी अनिवार्य असते.  या बंडखोरीतूनच सर्जनशीलतेचा क्षण चित्रकाराला चित्र स्पष्ट करण्यास प्रेरणा देत असतो. यासाठी पूर्वग्रह बाजूला सारणे आवश्यक आहे. मळलेल्या पायवाटेवरून जाण्यापेक्षा स्वतःची पायवाट तयार करणे म्हणजेच शैली निर्माण करणे.हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा शैलीतून तयार केलेले चित्र म्हणजे निर्मितीचे समाधान होय. असेही शिंदे पुढे म्हणाले.
 
 याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकला शिक्षक श्री. तारू ,सागर गायकवाड, प्राचार्य विजय धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.