सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : याशनी नागराजन नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पदभार स्वीकारला

सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार :  याशनी नागराजन 
नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पदभार स्वीकारला 

सातारा कराड वार्ता न्युज सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला
 : सातारा जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे.  आरोग्य, शिक्षण यामध्ये स्मार्ट पीएचसी, मॉडेल स्कूलसाठी विशेष काम केले जाईल.लोकांमध्ये मिसळून, सातारकरांना काय हवे आहे, त्यानुसार काम करण्यास प्राधान्य देणार आहे.सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.

सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मंगळवारी सकाळी पावणे नऊलाच जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर अकराच्या सुमारास अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन विविध विभागांचा आढावाही घेतला.राज्य शासनाने सोमवारी राज्यातील काही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झाली आहे. तर त्यांच्या जागी याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली आहे. नागराजन या २०२० च्या आयएएस अधिकारी आहेत. त्या यवतमाळ जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तसेच पांढरकवडा येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी होत्या.बदली झाल्यानंतर मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना तसेच सातारा जिल्हातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटनांनी स्वागत केले. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.पत्रकारांनीही त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या अनुषंगाने, जिल्ह्यातील स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांना सोबत घेवून जिल्ह्यात काम करण्याचा मानस व्यक्त केला.

याशनी नागराजन म्हणाल्या, महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा आग्रगण्य आहे. पश्चिम महाराष्ट्र खूप चांगला आहे. सातारा जिल्ह्याच्या काही भागात पाणीटंचाईची समस्या आहे. त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम करणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगली येथे मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी तयार केल्या. त्या धर्तीवर ते सातारामध्येही करत आहेत.त्याअनुषंगाने काम करणार आहे.सातारकरांना काय अपेक्षित आहे, हे जाणून घेवून त्या धर्तीवर काम करणार आहे. त्यांसाठी लोकांमध्ये मिसळून त्यांच्या चर्चा केली जाईल.

लोकांसाठी असलेल्या शासकीय योजनांची मिशन मोडवर अंमलबजावणी करुन प्रत्येक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न राहिल.सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक आहे. अनेक योजनांमध्ये केंद्र, राज्य स्तरावर सन्मान मिळविला आहे. तो नावलौकिक वाढवण्यासाठी काम केले जाईल.

महिलांसाठी योजना राबवण्याबाबतही विचाराधीन आहे. येथील प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेवून काम करणार आहे. कोणी जाणून बजून दुर्लक्ष केले, चूक केली तर त्याची दखल घेवून योग्यवेळी कारवाईही केली जाईल. अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाज सांभाळून फिल्ड वर्क करणे गरजेचे असून, फिल्ड वर्कला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.