चचेगाव - विंग - काले रस्ता सुधारणेसाठी १३ कोटींचा निधी मंजूर

चचेगाव - विंग - काले रस्ता सुधारणेसाठी १३ कोटींचा निधी मंजूर

शेखर चरेगावकर व डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश
 सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्यूज नेटवर्क अस्लम मुल्ला

कराड, ता. १४ : महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर व भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून चचेगाव - विंग - धोंडेवाडी - बेंदमाळा – डाळींबीची बाग - काले रस्ता या १५ किलोमीटरच्या प्रमुख जिल्हा मार्ग रस्ता सुधारणेसाठी १३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या निधीमुळे ग्रामीण विकासाला गती मिळणार आहे.

कराड दक्षिण मतदारसंघातील चचेगाव - विंग - धोंडेवाडी - बेंदमाळा - डाळींबीची बाग - काले रस्ता प्रजिमा १२० या मार्गासाठी शेखर चरेगावकर व डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण व उच्चशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ना. चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराड दक्षिण मतदारसंघातील या रस्त्याच्या विकासासाठी निधीची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या रस्ता सुधारणेच्या कामासाठी १३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

या निधीच्या मंजुरीमुळे या भागातील ग्रामस्थांना चचेगाव – विंग मार्गे काले गावाकडे जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता उपलब्ध होणार आहे. तसेच निधीमुळे ग्रामीण विकासाला गती प्राप्त होणार आहे. हा निधी मंजूर झाल्याबद्दल या गावातील ग्रामस्थांमधून केंद्र व राज्य शासनासह शेखर चरेगावकर व डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. 

फोटो :

डॉ. अतुलबाबा भोसले व शेखर चरेगावकर

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.