सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित पोलीस स्टेशनचा प्रश्न लवकरच सोडविणार : आयजी सुनिल फुलारी

जिल्ह्यातील प्रस्तावित पोलीस स्टेशनचा प्रश्न लवकरच सोडविणार : आयजी सुनिल फुलारी

सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्यूज नेटवर्क अस्लम मुल्ला
 सातारा शहरालगत असणाऱ्या एमआयडीसीत लहान मोठे चोऱ्या होवू लागल्या आहेत. त्याचा परिणाम उद्योगधंदे वाढीवर होत आहे. त्याचबरोबर तेथील स्थानिकांचे मुलभूत प्रश्न सुटण्यात यावे, लोकांचा वेळ अन पैसा वाचावा यासाठी पोलिस ठाणे करण्याबाबत यापूर्वीच प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तो यापुढे गतीमान करण्यात येईल, याचबरोबर जिल्ह्यातील अजून दोन तीन पोलिस ठाण्याबाबत डिव्हीजनचे प्रस्ताव पेंडीग आहेत, ते ही लवकरच मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

सातारा पोलिस दलाची वार्षिक तपासणी करण्याबाबत सातारा येथे आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, एकंदरीत आयजीकडून जिल्ह्याचे पोलीस व्यवस्थापन कसे चालते, गुन्हे दाखल करणे, प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे, कायदा व सुव्यवस्था, व्हीआयपी सिक्युरीटी, कम्युनिटी पोलिसिंग, नागरिका सोबतचे संवाद व वाहतूक व्यवस्थापन अन वेळोवेळी येणारे इतर प्रश्न या सगळ्यांचा आढावा यामध्ये आज घेण्यात आला आहे.

पोलिसांचे पारंपारीक कौशल्य व तपास तसेच मुद्देमाल रिकव्हरी करणे, नागरिकांच्या तक्रारची दखल घेणे, तपास पुर्ण करुन न्यायालयात चार्जसिट दाखल करणे, त्याचबरोबर सायबरचे तपास कसे करावेत, त्यांना शास्त्रोक्त पुरावे कसे जोडावेत, कन्वेशन रेट कसा वाढेल? जे गुन्हे पेंडीग असतात. पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी कसा होईल याचा निपटारा तसेच जो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असतो. तो विविध कायद्याच्या तरतुदीनुसार विल्हेवाट कसा लावयचा, फिर्यादीस मुद्देमाल कसा परत मिळेल? त्यामधील अडचणी कशा दूर करायच्या? कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषक तसेच प्रशासकीय लेखाविषक बाबी तसेच त्यांचा सुसंवाद कसा आहे? हे कर्मचाऱ्यापासून पोलिस अधिकाऱ्यांपासून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहिले जात असतात.

उंब्रज, कराड तसेच सातारा येथील वाहतूक शाखेचे कामकाज पाहिले आहे. विविध उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कामकाज पाहिले आहे. एकंदरीत या सर्वांचा फायदा हा शासन आपल्या दारी या योजनेचा फायदा पोलिसांनी घेवून त्या जनतेपर्यंत सुविधा नेल्या पाहिजेत. सर्व पोलिस ठाणे हे मॉडेल असले पाहिजेत. चोरट्याकडून जप्त केलेला मुद्देमाल जनतेला परत मिळण्यासाठी पोलिसांनीही तत्पर असले पाहिजे. याशिवाय कोणाचा मोबाईल, कोणाची कागदपत्रे गहाळ होत असतात. त्याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल करावी किंवा पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी नागरिकांशी चांगला संवाद करत त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले पाहिजे. यासाठी आम्ही सतत कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात आग्रही राहत आहोत.

जनतेची पिळवणूक होवू नये, तपासामध्ये खेळखंडोबा होणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न आहे. पण तरीही यामध्ये कामचुकारपणा केला कोणी तर त्याला योग्य ती शिक्षा केली जाते. एकंदरीत सध्या कामकाज चांगले असले तरी अजून ते गतीमान होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आज बहुतेक वेळा तक्रार देण्याबाबत ती कोणाला सांगावी हे नागरिकांना लक्षात येत नसते. त्यामुळे समाजातील अवैध धंदे, संघटीत, आर्थिक गुन्हेगारी, महिलांविषयीचे छेडखानी अन इतर गुन्हे याबाबत तात्काळ कळवले तर पोलिस अधिक्षकही लवकरच कारवाई करतील. त्यामुळे अवैध धंदे अन निर्मुलन होवू शकेल.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारी उघडकीस आणता येवू शकेल.सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जे प्रसारीत होत असते. त्यामध्ये काही जण समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करत असतील तर त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रात ८० गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही गुन्ह्यांचा तपास पुर्ण झाला आहे तर उर्वरीत गुन्ह्यांचा तपास चालू आहे.

सातारा जिल्ह्यात ही समाजात तेढ निर्माण करणारे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये त्यांना अटकही करण्यात आले आहे. काहींचा तपासामध्ये अडथळे येत असले तरी सातारा पोलिस दल तिथपर्यंत पोहोचलेले आहे. त्याच्यात कोणाची ही गय केली जाणार नाही. सोशल मिडीयात घटना घडल्यानंतर कारवाई लगेच होणे अपेक्षीत आहे. यावर बोलताना फुलारी म्हणाले की, कोणतीही गोष्ट क्रिएट झाल्यानंतरच त्याचा उगम शोधता येवू शकतो. पण सोशल मिडीयातील घटना लगेच शोधून काढण्याबाबत अजून तंत्रज्ञान विकसीत झालेले नाही. सायबर पेट्रोलिंग अन सायबर सेल मात्र सोशल मिडीयावर लक्ष केंद्रीत ठेवून असते. डिजीटल जाळे आज व्यापक बनले आहे. त्यामुळे याबाबतचे गुन्हे उघडकीस होणारे डेव्हलप अजून विकसीत व्हायचे आहे. ते राष्ट्रीयस्तरावर काम चालू असते.

निर्भया पथकाचे काम चांगले होण्यासाठी काय प्रयत्न करता येवू शकतील? यावर फुलारी म्हणाले, महाविद्यालयात आत मध्ये मुले सुरक्षित असतात. पण बाहेर निर्भया पथकाचे वेळापत्रकानुसार पोलिसांचे काम महत्वाचे आहे. साताऱ्यात गुंडगिरी आहे. त्याचा बिमोड करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी उघडकीस आणण्याचा रेट हा ९२ टक्के झाला आहे. तो वाढण्यासाठी अजून प्रयत्न होतील. याबाबत सातारा पोलिसांना काही सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. असे सुनील फुलारी यांनी सांगितले.

कम्युनिटी पोलिस उपक्रमांतर्गत घे भरारी उपक्रम आहेत. यामध्ये १६ ते १९ वयोगटात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी अन इतर भरकटलेल्या बालकांचे पुनर्वसन करणे, उचीत शिक्षण देण, पालकांसमवेत जोडून देणे, रोजगाराची संधी मिळवून देणे हे या योजनेचे उद्दीष्ट आता सताारा पोलिस अधिक्षक समीर शेख अन त्यांचे सहकारी चांगले प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या पाच सहा महिन्यात कमी आले आहे. पुनर्वसन आणि सुधारणा याबाबतची जबाबदारी सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी चांगली घेतली असल्याचे आयजी सुनील फुलारी यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.