सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लवकरच सातारा औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित होणार

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लवकरच सातारा औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित होणार

 सरकारी दूध संघाच्या 10 एकर जागेपैकी चार एकर जागा मंजूर ,माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांची माहिती 

सातारा दिनांक 9 प्रतिनिधी कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क 9021358931

पोवई नाक्यावरील तब्बल पन्नास वर्ष भाड्याच्या इमारतीत असणारे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय लवकरच सातारा औद्योगिक वसाहतीतील सरकारी दूध महामंडळाच्या जागी स्थलांतरित होणार आहे . येथील चार एकर भूखंडाचा ताबा सातारा एमआयडीसी औद्योगिक विभागाने कामगार आयुक्त कार्यालयाला दिला आहे . येथे कामगार सुरक्षा मंडळ तसेच सर्व प्रकारच्या कामगारांसाठी ईएसआय हॉस्पिटल उभारले जाणार आहे अशी माहिती माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली 

यावेळी त्यांचे चिरंजीव अभिजीत येळगावकर उपस्थित होते . येळगावकर पुढे म्हणाले शासकीय दूध योजना यांच्या नावे असणारा सातारा एमआयडीसी मधील 29 हजार 997 चौरस मीटर पैकी चार हजार चौरस मीटर जागा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयासाठी देण्यात आलेली आहे सहाय्यक कामगार आयुक्त रे मु भिसले यांनी यासंदर्भात प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता . उद्योग कामगार मंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . त्यानुसार कामगार भवनांचे काम लवकरच सुरू होणार असून यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे हे कार्यालय प्रशस्त असणारा असून दोन मजले असतानाही पहिल्या मजल्यावर प्रादेशिक कामगार आयुक्त कार्यालय तसेच कामगार भावनांसाठी स्वतंत्र जागा सर्व प्रकारच्या कामगार वर्गासाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष अशा विविध सोयी येथे असणार आहेत तसेच कामगारांसाठी स्वतंत्र ईएसआय हॉस्पिटल सुद्धा लवकरच येथे उभारण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले 

दूध महासंघाच्या ताब्यातील दहा एकर जागेपैकी साधारण चार एकर जागा ही सहाय्य कामगार आयुक्त कार्यालयाचे नावे करण्यात आले आहे या संदर्भातील आदेश कामगार मंत्री उदय सामंत यांनी सचिवांना दिलेले आहेत तसेच येथील प्लॉटचा ताबा अधिकृतरित्या सहाय्यक कामगार आयुक्तांकडे देण्यात आलेला आहे . सातारा जिल्ह्यात येथील एमआयडीसीच्या ठिकाणी कामगार भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल येळगावकर यांनी उदय सामंत यांचे आभार मानले

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.