यशिनी नागराजन सातारा जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

यशिनी नागराजन सातारा जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

ज्ञानेश्वर खिलारी यांची इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग पुणे येथे बदली

सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला
: सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची १६ महिन्याच्या सेवेनंतर पुणे येथे बदली करण्यात आली असून इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग येथे संचालक म्हणून त्यांची वर्णी लागली आहे.२०१९ च्या प्रशासकीय सेवेच्या प्रशासकीय अधिकारी यशिनी नागराजन यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदी नियुक्ती झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी श्रीमती नागराजन या पांढरकवडा येथे आयटीडीपीच्या प्रकल्प संचालक तसेच यवतमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्यांचे हे दुसरे पोस्टिंग आहे.यापूर्वी दिल्लीच्या परकीय मंत्रालयांमध्ये वरिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

ज्ञानेश्वर खिलारी यांनी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सातारा जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारला होता.स्मार्ट पीएचसी, ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये सुसूत्रता, अंगणवाडी सेविकांच्या कामकाजांची वेळोवेळी दखल, झिरो पेंडन्सी वर्क, तसेच वेगवेगळ्या विभागाकडून उत्तम प्रकारे कार्य करून घेण्याची हातोटी यामुळे कमी वेळेतच खिलारी यांनी आपल्या कार्याचा दबदबा निर्माण केला होता. जिल्हा परिषदेच्या प्रशासनात समन्वय जिल्हाधिकाऱ्यांची उत्तम टीमवर्क तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून पायाभूत सुविधांची उत्तम निर्मिती यामध्ये खिलारी यांनी विशेष कामगिरी नोंदवली. नुकतेच ते मसूर येथे प्रशासकीय कामकाज प्रशिक्षणासाठी रवाना झाले होते ग्रामविकास मंत्रालयाकडून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाली त्यानुसार खिलारी यांना पुणे येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे संचालक म्हणून नेमण्यात आले आहे.

नवनियुक्त सीईओ याशिनी नागराजन या २०१९ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बॅचच्या अधिकारी आहेत .यापूर्वी त्यांनी यवतमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कामाची नोंद केलेली आहे २०२० च्या परीक्षेत ५७ व्या रँक वरून त्या उत्तीर्ण झाल्या होत्या.त्यांचे वडील थंगावेल नागराजन हे सेवानिवृत्त बांधकाम इंजिनिअर आहेत. तसेच त्यांच्या आई गुवाहाटी येथील उच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ पदावर सक्रिय होत्या. नागराजन यांनी एनआयइ येथून बीटेक ही पदवी प्राप्त केली आणि रिझर्व बँकेमध्ये वर्ग २ चे अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची तीन वेळा परीक्षा दिल्यानंतर २०२० च्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. येत्या दोन दिवसात त्या सातारा जिल्हा परिषदेचा कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे .

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.