मुंबई येथे दलित पँथरच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या
मुंबई येथे दलित पँथरच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दलित पँथरचे संस्थापक कवी पद्मश्री कालकथित नामदेव ढसाळ यांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि उपस्थितांशी संवाद साधला.
गेली पाच दशके दलित पँथरची वाटचाल जोमाने सुरू आहे, याचा आनंद आहे, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात आकारास आलेली शिवसेना-दलित पँथरची शिवशक्ती-भीमशक्ती यापुढेही कायम राहील. तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सर्व समाजघटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. सुखदेवतात्या सोनवणे, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष मा. आबासाहेब पाटील यांच्यासह दलित पँथरचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment