सातारा मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजनांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई
सातारा सहयाद्री वार्ता नेटवर्क कराड अस्लम मुल्ला मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजनांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज आढावा बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.*
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजना यांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथून पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. याआधी याच आठवड्यात गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे यासंदर्भात मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने सर्व खबरदारीचे उपाय योजले असून संभाव्य आपत्ती रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सतर्क आहे, असे यावेळी मा. ना. शंभूराद देसाई साहेबांनी स्पष्ट केले. तसेच आजच्या बैठकीत त्यांनी सर्व उपाययोजनांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.
मुसळधार पाऊस ध्यानात घेऊन जिल्ह्यातील दुर्गम भाग, तसेच डोंगरी भागांतील गावांचा रस्ते संपर्क विस्कळीत होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, अशी सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्यातील धबधबे, नदी अशा ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. काही वेळा या ठिकाणी हुल्लडबाजीदेखील होत असते. मात्र, सध्याच्या स्थितीत अशा ठिकाणी पर्यटक संख्या नियंत्रणात राहील, तसेच हुल्लडबाजीतून गंभीर घटना घडणार नाही, यादृष्टीने खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्याबाबत पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि वन विभागाच्या समन्वयाने उपाययोजना करण्याची सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी केली. याशिवाय नाले-गटारे स्वच्छ ठेवणे आणि डीडीटी फवारणी करणे, तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर दोन आरोग्य अधिकारी व अन्य मनुष्यबळ कायम सक्रीय राहील, असे नियोजन करण्याचे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले. धोकादायक व दरडप्रवण भागांतील नागरिकांना आवश्यकता वाटल्यास समाजमंदिरे, शाळा व मंगल कार्यालय आदी ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करण्याची, तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिले.
या बैठकीस खासदार मा. श्रीनिवासजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, तसेच संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
Comments
Post a Comment