Karad *रयत सेवक श्री शशिकांत माळी यांचा सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड असल्सम मुल्ला 9156992811
Karad *रयत सेवक श्री शशिकांत माळी यांचा
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड असल्सम मुल्ला 9156992811 सेवानिवृत्ततीनिमित्त सत्कार* कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज मधील प्रयोगशाळा परिचर श्री शशिकांत यमाजी माळी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सील सदस्य अँड. रवींद्र पवार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने होते. अँड. रवींद्र पवार म्हणाले, शशिकांत माळी यांनी 38 वर्षे 7 महिने अत्यंत प्रामाणिक पणे रयत सेवा करून संस्थेच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलेला आहे. तसेच रयत सेवकांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार रुजलेले आहेत. संस्थेत सेवा करण्याच्या संधीने सोने करणाऱ्या सेवकांचा सत्कार करणे ही संस्थेची संस्कृती आहे. त्यानंतर सत्कारमूर्ती सह त्यांचे सहकारी व प्राध्यापक, कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शशिकांत माळी यांचा मुलगा अँड. दिपक माळी यांनीही मनोगत व्यक्त करून आपले विचार मांडले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस. पाटील सर, प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. किशोरी मॅडम तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment