पुणे दगडूशेठ गणपती मंदिरात अतिरुद्र महायज्ञाला प्रारंभ**श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह १२५ ब्रह्मवृंदांचे पौरोहित्य*
पुणे दगडूशेठ गणपती मंदिरात अतिरुद्र महायज्ञाला प्रारंभ*
*श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह १२५ ब्रह्मवृंदांचे पौरोहित्य*
पुणे : महा सुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम, विष्णू सहस्त्रनाम अर्चना, रुद्र होम आणि गणेश याग यांसह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी व अकरा दिवसीय अतिरुद्र महायज्ञाला दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ झाला. जगाच्या कल्याणा करिता, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि आरोग्यसंपन्न समाजाकरीता एकाच वेळी १२५ ब्रह्मवृंद सहभागी होत, हा याग करीत आहेत. शनिवार, दिनांक १५ जुलै पर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरु आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अतिरुद्र महायज्ञ मंदिरात करण्यात येत आहे. राजू सांकला व रंजना सांकला यांच्या हस्ते संकल्प झाला. वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह १२५ ब्रह्मवृंद होम, विधी करीत आहेत. रुद्र होम, गणेश याग यांसह विविध अभिषेक असे धार्मिक विधी याअंतर्गत केले जात आहेत. गणपती मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारुन हे अतिरुद्र होम करण्यात येत आहेत.
मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे आरोग्यसंपन्न समाजाकरीता प्रार्थना करण्यात येत आहे. त्यातील अतिरुद्र होम हा या धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदू आहे. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल याकाळात वापरले जात आहे. तसेच २१ आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात येत आहे. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात येत आहे.
पुढील अकरा दिवसात मेधा दक्षिणा मूर्ती होम, स्वयंवर पार्वती होम, महालक्ष्मी होम श्री सुक्त, नवग्रह होम, अरुणाप्रश्न याग, महालक्ष्मी होम श्री सुक्त, ३३ कोटी देवता याग करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी मंदिरात अतिरुद्र महायज्ञ व विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
* फोटो ओळ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरामध्ये अतिरुद्र महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वेदमूर्ती नटराजशास्त्री व १२५ ब्रह्मवृंद सहभागी झाले आहेत.
Comments
Post a Comment